पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपसंहार. (३६१) हेब यांचे निवेदन जर खरें आहे; तर मग लोकस्वस्थतेच्या संबंधानें बडोद्याच्या राज्यांत त्यांच्या कारकीर्दीत जास्त ते काय झाले ते कळत नाहीं. बडोद्याच्या गादीवर जे राजे झा- ले त्यांत मल्हारराव महाराज यांच्या कारकीर्दीतील अव्यवस्था अतीनिकृष्ट होती असें मानिले आहे. हें कांहींसे काळाचेंही वैचित्र्य आहे. मल्हारराव महाराज यांनी पन्नास वर्षे अगोदर जन्म घेऊन बडोद्याचें राज्य केले असते तर आज त्यांच्या कपाळीं जो अपयशाचा टिका लागला आहे तो लागला नसता; असो. त्यांच्या निकृष्ट राज्यकारभारांत तरी असे कोणते दंगे, धोपे, छूट, चोऱ्या, आणि खून मारामाच्या जास्त झाल्या की, त्यांवरून बडोद्याच्या राज्या खालचा प्रदेश हा लूट, चोप्या, दरोडे, आणि खून मारामाऱ्या यांचें एक वसतिस्थानच बनून रा- हिलें होतें असें मानावें. आणि राजा सर टी यांचे कारभ.रांत कोणत्या कमी झाल्या कीं त्यावरून बडोद्याची प्रजा . अगदीं दुःखमुक्त झाली असें मानावे. कर्नल फेर यांनीं मल्हारराव महाराज यांच्या राज्यकारभा- रावर पुष्कळ आरोप आणिले होते, त्यांत विजापूरच्या ठाकुराच्या बंडापासून आ णि लष्करी लोकांच्या बेदिली पासून राज्यांत भयंकर बखेडे होतील असेही आरोप होते. परंतु ते सर रिचर्ड मीडच्या कमिशनापुढे अगदी लटके पडले. यावरून लोकस्वस्थतेच्या संबंधानें बडोद्याच्या मागील राज्यकारभारावर दोष ठेवण्यासारखें कांहीं एक नाहीं. आतां राजा सर टी माधवराव साहेब यांनीं जी व्यवस्था के- ली आहे, ती फार उत्तम आहे, परंतु पूर्वी लोकांचें जिवीत, मालमत्ता आणि अब्रू, यांचे संरक्षण करण्याकरितां जशी काय कांहींच व्यवस्था नव्हती, राज्यांतील दंगे- खोर लोकांस पुढारी मिळवून वारंवार बंडें होत होतीं, आणि सरहद्दीवरील छुटारू लोक बडोद्याचा प्रदेश लुटून प्रजेस नेहमीं उपद्रव देत होते, अशा भावार्थाचे जे त्यांचे लेख आहेत ते पराकाष्ठेचे अतिशयोक्तीचे असून स्वाभिमानपरिपूर्ण आहेत. त्यांच्या ह्मणण्याप्रमाणें बडोद्याच्या राज्यांत जर नेहमीं दंगे धोपे होत होते असें मा- नले तर इंग्रज सरकारांनीं नेटीव राजास आश्रय दिल्या पासून देशांतील लढाया आणि दंगे धोपे बंद झाले असे राजा सर टी माधवरावच कबूल करतात त्याची गती काय ? इंग्रज सरकारच्या आश्रयापसून जी फळे प्राप्त झालीं तीं सर टी० माधवराव यांच्या कारकीर्दी पूर्वी बडोद्याच्या राज्यास मिळत नव्हतीं कीं, काय ? सारांश या संबंधानें राजा सर टी० माधवराव साहेब यांचें वृत्त निवेदन सर्वांशांनीं खरें आहे असें ह्मणणे मोठे कठीण आहे. ते देशी राजांचे सानुराग मित्र असून परम हितच्छु आहेत यास्तव नेटीव राजांच्या राज्यकारभारावर नसते दोष स्थापन न करितां वाजवी पेक्षा जास्त यशाची अपेक्षाही त्यांनी करूं नये हे त्यास विशेष भूषणीय आहे. ० आजपर्यंत बडोद्याचे राजे आपले स्वतःचें, आपल्या मित्रांचें आणि अनुयायां- चें माल पराकाष्ठेचे हित पाहत होतें असें दिवाणसाहेब ह्मणतात. हें त्यांचे ह्मणणे सर्वांशी खरें आहे असे क्षणभर गृहीत करून त्याविषयी आपण थोडासा विचार क