पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३६० ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास- सून ती तशीच राखून ठेवणे पहिल्या पेक्षा जास्त सोपे झाले आहे. हे सम १८७७ ७८ सालच्या रिपोर्टाच्या ४४ कलमाचे तात्पर्य आहे. सन १८७८-७९ सालच्या रिपोर्टाच्या ४८च्या कळमांतील लेखाचा अलंकार ह्याहून ही विशेष मौजेचा आहे. बद्धमुलदुःखें आणि अव्यवस्था ह्यास राज्यांत पाऊल ठेवण्यास था- राच राहिला नाही सबब 'लोक स्वस्थता' या सदराबद्दल या पुढे काँही उल्लेख करण्याचें प्रयोजनच रहात नाहीं. असा प्रथमारंभीं प्रतिज्ञालेख असून पुढे वृत्तकथन केले आहे ते असे. सगळ्या देशाला असे वाटू लागले आहे कीं, नवी व्यवस्थाही एक टिकाऊ सुधारणुक आहे. माजी राजाचे अनुयायी निराश होऊन बारावाटानीं परागंदा झाले आहेत. देशांतील लुटारू आणि दंगेरवार लोकांस असे समजलें आहे की न्यायी, सर्वव्यापक आणि बळकट सरकारच्या राज्यांत दंगे उद्भवण्याकरितां आपल्या मद- तीची कोणी ही अपेक्षा करणार नाहीं, आणि कोणत्याही दुष्ट कृत्याबद्दल आप- ल्यास क्षमा मिळावयाची नाहीं. सरहद्दीवरील मुलुखांतील छुटारू लोकांची अशी खातर जमा झाली आहे कीं, बडोद्याचा मुळख इतःपर छूट, चोऱ्या करण्याचे नि भय स्थान राहिले नाहीं; कारण गुन्हेगार लोकांस शासन होण्याकरितां हवाळी करण्याची पद्धत सुरू झाली आहे. निवेदन साहेब यांनी आपल्या तिचा वृत्तात आणि अलंकार याचा बद्धमुलदुःखे सहज ण्यास थारा राहिला नाहीं, असे त्यांच्या लेखांत वाक्य आहे. पण ती बद्धमुल दुःखें कोणती हे कांहीं ते सांगत नाहींत. तेव्हां त्यांनी मानलेला दुःखें कोणती आणि आतां ती अगदी निर्मुळ झाला असे आपल्यास समजावे तरी कसें. देशांतील शांतते च्या संबंधानें हा त्यांचा लेख आहे. तेव्हां खुन लूट, चोऱ्या, मारामाच्या, दरोडे बंडे, व इतर दुसरे अपराध हे नेहेमी अप्रतिबंध चालूं असणे आणि त्यापासून प्रजेचें जीवित अब्रू, आणि मालमत्ता, सुरक्षित नसणें हीं बद्धमूलदुःख आणि त्या द:खापासून बचाव करण्याविषयीं जेथें कांहींच व्यवस्था नाहीं तो बद्धमूळ अव्यव स्था आणि तशा प्रकारच्या दु:खापासून मजा अगदी निर्मुक्त झाली बद्धमुलदुःखास आणि अव्यवस्थेस राज्यांत पाउल ठेवण्यास थारा राहिल नहीं, असा त्यांच्या ह्मणण्याचा अर्थ करवत नाहीं; कारण छत्तीस खून तीन हजार सातशे तेवीस चोऱ्या, पाचशे त्रिहात्तर लुटी, एकतीस दरोडे, आणि त्या खेरीज दु- सरें मिळून नऊ हजार सातरों एक अपराध, सवाहजार चारशे सत्ता वीस मनुष्या- पासून त्यांच्या कारकीर्दीत घडले आहेत असे त्यांच्याच रिपोर्टात लिहले आहे. आणि ते कमी जास्त प्रमाणाने घडावयाचेच. यावरून त्यांनी दुःख आणि अव्यवस्था ब द्धमुल निराळींच कल्पिली आहेत असे दिसतें. देशी राजांनी इंग्रजसरकारचा आ श्रय केल्यापासून लढाया आणि दंगें धोपे बंद झाले, हें राजा सर टी. माधवराव सा. ह्या प्रमाणे सर टी. माधवराव प्रकारची आहे अतिशयोक्ति, दिसून येतें. ता कोणत्या भिमानता, कारकीर्दीत राष्ट्रांत शांत. केला आहे. यांत स्वा. भाग बराच आहे असे यांस राज्यांत पाऊल ठेव.