पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपसंहार. (३५९) झाला की, लागलीच तो आपल्या पूर्व गतीने गमन करूं लागतो. त्याप्रमाणे ह्या नगास सुधारणुकीचें चलन उप्तन्न झाले असून ते वर्धमान गतींत गमन करीत आ हे, आणि जेथपर्यंत त्याची अवधी आहे, तेथपर्यंत ते असेच चालावयाचें. आपोआ. प कांहींच होत नाहीं हे खरे आहे व आपण जे कांहीं काळशक्तीच्या सामर्थ्यान केले, तें जर आपण होऊन जगापुढे आणले नाही, तर लोकांस कळण्यास नाही; परंतु केलेले कृत्य निवेदन करतांना आपण फार विनीत आणि मर्यादशील असले पाहिजे आणि स्वमहत्व वृद्धि करण्यास लोकांस अवकाश ठेवला पाहिजे हे उत्तम जर आपणच आपली मशंसा करून घेतली तर लोकांच्या वांव्यास स्तुति करण्यास राहते तरी काय ? सन १८७७-७८ आणि १८७८-७९ या दोन साळांच्या वार्षिक रिपोटांत आपल्या कारकीर्दीत राज्यांत शांतता कोणत्या प्रकारची होती याविषयीं राजा सर टी. माधवराव साहेब यांनी वर्णन केले आहे त्यांतीळ तात्पर्य असे आहे कीं, गायकवाड चें राज्य निरुपद्रवतां आणि सुव्यवस्था ह्या पासून होणाऱ्या सुखाचा आज जा अनुभव घेत आहे, तसा त्यानें पूर्वी कधीं हो घेतला होता, असा काळ शोधून का ढणे फार कठीण आहे मागील फाळच्या व्यवस्थेशीं हल्लींच्या व्यवस्थेची तुलना करू- न पहातां हल्लींची व्यवस्था अगदर्दी पूर्णतेला पावली आहे असे निर्भयपणे झणण्यास कहीं हरकत नाहीं. बडोद्याच्या दरबाराने इंग्रजसरकाराशी संबंध जोडला त्या दि वसापासून ते आंतील आणि बाहेरील उपद्रवापासून मुक्त झाले. गायकवाडाने आ- णि इतर देशी राजांनीं ही गोष्ट चांगली मनांत ठसवून ठेविली पाहिजे कीं, इंग्रज सरकारांनी जर त्यांस आश्रय दिला नसता तर परस्परांच्या लढाया आणि राज्यांतील बंडे यांजपासून वारंवार राज्यक्रान्त्या झाल्या असत्या. नेटीव राजांनी आपल्या नशिचाची श्रेष्ठ सरकारच्या नशीबाशी सांगड घालून दिल्याने त्यांस दुसरें टिकाऊं फायदेही पुष्कळ झाले अहेत. राजकीय शहाणपण आणि राजनीती येणेकरून युक्त अशा सुधारलेल्या ब्रिटिश राष्ट्राबरोबर निर्मळ मनाने संबंध ठेविल्याने अपरिमेय फा- यदे झाले असून त्या संयोगाची फळे आतां आपल्यास पूर्वीपेक्षां विपुल मिळू लाग- ली आहेत. राज्य संपत्तीचे राजवाड्यांत एकीकरण करून अपव्यय करण्याचा जो क्रम सुरू होता तो बंद झाला असून आतां सार्वजनिक सुख वाढविण्याकडे आणि राष्ट्राला उन्नत अवस्था प्राप्तहोण्याकरितां त्या संपत्तीचा विनियोग होत आहे. पुष्कळ खर्च करून सर्व राज्यांत मजबत पोलिस स्थापन करण्यांत आले आहे, न्यायाची पुष्कळ कोर्टे स्थापन केली आहेत. म्युनिसिपाल खात्यांत सुधारणा करण्यांत आळीं आहे, लोकपयोगी कामे सुरू झाली आहेत विद्यालये स्थापन केली असून रोग्याल औषधागारें वृद्धिप्रत पावविली आहेत; लोकांस जास्त स्वास्थ्य मिळावें झणून जमाबंदी मध्ये सुधारणा करण्यांत आली आहे. राष्ट्रांतील मोठा समुदाय असे मानितो कीं, आप अरिष्टापासून संरक्षण होतें व आपल्यास वास्तविक फायदा मिळत आहे, आणि उ न्नत दशेस येण्यास आपल्यास पूर्ण मोकळीक आहे. याप्रमाणे राज्वांत शतिता अ