पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३५८) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. कीं होतीं; जमिनीची मोजणी हे ऊन धारे ठरले होते; दिवाणी व फौजदारी कोट स्थापन केली होतीं; म्युनिसिपालिटी स्थापन झाली होती; रेल्वे झाली होती; लोकांचे जीवित, अनू, मालमत्ता, यांच्या संरक्षणासाठी पोलिसचा बंदोबस्त होता; बडोद्यांत एक धर्मादाय दुवाखाना स्थापन केला होता, व त्यास देवी काढण्याचें खाते जोडले होतें; जकातीच्या संबंधानें व्यवस्था होतीच. जंगळ खाते निघाले होतेच; इनामदार लोकांच्या हक्काविषयों चौकशी करण्याकरितां एक खाते स्थापन केले होतें; आफूचा कारखाना होता; स्टांपकागद निघाले होते; रोषन्यूखातें स्थापन झालें होते; दिवाणी मुळकी फौजदारी, रजिस्टर वगैरे संबंधी कायदे रचलें, तपासले व मंजर केले होते; ष मारेवरीज नवे नवे नियम सरक्युलरांनी प्रसिद्ध करण्यांत आले होते; शाळा स्थापन करण्याचा आरंभ झाला होताच; त्यांत बडोद्यांत एक हायस्कूल स्थापन करण्यांत येऊन वेदशास्त्राची शाळाही स्थापन झाली होती. ह्याममाणे शंभर किंवा दोनशे वर्षांपूर्वी जी व्यवस्था अतिशय सुधारणुकीची ह्मणतां आली असती, तशी व्यवस्था बडोद्याच्या राज्यांत स्थापन होऊन चुकली होती. सांप्रतच्या सुधारलेल्या राज्यां तील राजकारभाराशी तुलना करून पाहतां त्यांत पुष्कळ उणीव होती यांनी आपल्या कारकिर्दीत ती दूर करून राजा सरटी माधवराव साहेब त्यांत उत्तम प्रकारची सुधारणा केळी, पाबद्दल ते लोकमशंसेस पात्र आहेत. परंतु त्यांच्या लेखाचा झोंक असा आहे की, जशी ह्या राज्यांत पूर्वीची कोणत्याही प्रका- रची, कोणत्याही रीतींची राज्यव्यवस्था नव्हती. ह्या जगावर मनुष्य माणी प्रथम ज. न्मळा त्यावेळेस तो ज्या स्थितीत होता त्याप्रमाणे बडोद्याचें राज्य अगदर्दी रानटी अवस्थेत होतें. आणि आतां ज्या स्थितीला ते राज्य आले आहे त्याचा उपक्रम कायतो राजा सरदी. माधवराव यांच्या कारकीर्दी पासूनच झाला. अमुक एक पूर्वी- ची व्यवस्था होती आणि तिजमध्ये मीं सुधारणा करून चांगल्या रुपास आणिली अशा अर्थाचे एक वाक्य देखील त्यांच्या कोणत्याही साळया रिपोर्टात सांपडत नाही. त्याहून उलट मागील राजांची व त्यांच्या कारभाऱ्यांची अतिशय गर्हा केलेली अर्शी प्रमाणें पदोपदी सांपडतात. अनुगतिकानें अमुक एक मी केले असें ह्मणणें उलटे त्यांच्या विमल यशास बा. धक होते ज्यांनी मोठे मोठे शोध करून विद्या, शास्त्रे आणि कला उत्पन्न केल्या किंवा लढाया मारून राज्ये मिळविली त्यांनी आह्मी अमुक एक केलें असें ह्मटले तर शोभेळ. वास्तविक पाहिले असतां कालाची शक्ती फार मोठी आहे आणि जें कांहीं होतें में काळ शक्तीचा प्रादुर्भाव आहे. मनुष्यप्राणी हा निमित्त कारणमात्र आहे. सह्याद्री व विंध्याद्री इत्यादि पर्वतांच्या दऱ्यांतून निघालेल्या वाहिन्या किती जरी अवरोध झाला तरी तो दूर करून समुद्रास जाऊन मिळावयाच्याच. पदार्थावर एकवेळ मेरणा होऊन त्यांच्या अंगीं जें चलन होतें, तें सरळ रेषेत नित्य असते. आणि ज्या मार्गात त्या जवर मेरणा घडते, त्याच मार्गांत तो चळन पावतो. मध्यंतरी काहीं अवरोध येतात, व कांहीं काळपर्यंत तो पदार्थ अगदी स्तन्त्र आहे असे वाटते; परंतु अवरोध दूर 5