पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपसंहार. ( ३५७ ) ह्या संस्थानचा राज्यकारभार आजपर्यंत ज्या धोरणावर चालला होता त्याजपेक्षा अगदीं मिन्न अशा धोरणावर हल्ली सुरू झाला आहे. हा प्रकार ह्या संस्थानांत हल्लीं प्रथमच सुरू झाला आहे असें ह्मटले असतां चालेल. आजपर्यंतचें धोरण असे असे कीं, संस्थानिकांस प्राप्त झालेला अधिकार प्रजेच्या हिताकरतां नसून त्याने आपलें स्वतःचें, आपल्या इष्टमितांचें व आपल्या आश्रित जनांचे मात्र सर्व प्रकारें हित साधावें; परंतु हल्लींचे धोरण वरच्यापासून फारच भिन्न आहे. संस्थानांतील सर्व जातींच्या प्रजेचें हरएक प्रकारें सारखें हित साधून त्यांच्या सुखाची वृद्धि करणें हें च संस्थानिकाचे मुख्य कर्तव्यकर्म होय असे हल्लींचें धोरण आहे. ह्या नवीन धोरणा- चर चाललेल्या राज्यकारभारापासून व्यवहारांत प्रत्यक्ष जे परिणाम घडून आले आ- हेत त्यांची खरी योग्यता अर्वाचिन सुधारलेल्या राष्ट्रांत प्रचारांत असलेल्या कार भारांचा ज्यास पुष्कळ दिवस अनुभव आलेला आहे त्यांस लवकर कळून येणारी नाहीं; कारण उलट धोरणावर चाललेल्या राज्यकारभारापासून दुष्ट परिणामांचा त्या- स परिचय नसतो. आतां ह्याप्रमाणें मुख्य धोरणांतच अतिशय मेद पडल्यामुळे सर्व गोष्टींत फेरफार झाला पाहिजे खरा; परंतु जुन्या वहिवाटी एकदम मोडून टाकू- न फेरफार करावयाचा हल्लींच्या मधान मंडळाचा मुळींच विचार नाही. अशा म कारच्या स्थित्यंतरापासून होणारे परिणाम क्षणभंगुर नसून कायमचे व टिकाऊ होण्या- करतां ते क्रमाक्रमानेंच झाले पाहिजे हैं आझी समजतो. ह्या लेखावरून त्यांच्या राज्यकारभाराचें धोरण आणि पूर्वीच्या राज्यकारभारा- विषयीं त्यांचे विचार कोणत्या प्रकारचे आहेत हे समजून येतें. त्यांनी राज्यकारभाराच्या व्यवस्थेबद्दल वार्षिक रिपोर्ट केले आहेत त्यांवरून त्यां चा मुख्य उद्देश कितपत सिद्धीस गेला, व त्यापासून लोकांस कोणतो सुखें व दुःखें झाली हे आपल्यास पहावयाचें त्या रेवरीज आपल्या जवळ दुसरे कांहीं साधन ना- हैं. कारण कीं, एक तर त्यांच्या मंडळीमध्यें ऐक्य फार उत्तम असल्यामुळे त्यांच्या राज्यकारभारांत कांहीं दोष असले तर ते त्यांच्या मंडळींतून बाहेर यावयाचे नाहीत. दुसरें इंग्लंडच्या प्रधान मंडळीच्या कारभारावर प्रतिपक्षाची नजर असते आणि त्यांचे दो- ष काढण्याविषयीं ते प्रतिपक्षी अगदी डोळ्यांत तेल घालून टपत बसलेले असतात. तसा सर० टी० माधवराव यांच्या राज्यकारभारावर नजर ठेवून त्यांचे दोष बाहेर काढणारा असा प्रतिपक्षकार नाहीं कीं, व्याजपासून आपल्यास खरें काय आहे तें फळावें. बडोद्यांत वर्तमानपत्र निवत नाहीं. बाहेरील वर्तमानपत्रांवर विश्वास ठेवावा सर त्यांत कितीएक पराकाष्ठेचे स्तुतिपाठक असून कितीएक फारच विरुद्ध लेख लिहितात. तेव्हां त्यांपैकीं एकावरही पूर्ण विश्वास ठेवून दिवाण साहेब यांचा राज्य फारभार अमुक एक प्रकारचा आहे असा सिद्धांत करता येत नाहीं. यास्तव यां- ध्याच रिपोर्टावरून काय तत्व निघते ते पहावें हाच उत्तम मार्ग होय. बडोद्याची राज्यव्यवस्था उत्तम अवस्थेला पात्र झाली नव्हती हे पूर्वी सांगितलेंच आहे; परंतु कालमानाप्रमाणे व इतरदेशी राजांप्रमाणे सर्व प्रकारची खातीं स्थापित झा