पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३५६) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. देशीय गृहस्थाच्या हातानें बडोद्याचा राज्यकारभार चालविण्यांत येईल ही भाक सत्य करून दिली. तारीख ३ मे सन १८७५ रोजी राजा सर टी बडोद्यास दाखळ झाले, तारीख १० मे रोजी त्यांनीं दिवाणगिरीचा चार्ज घेतला, आणि तारीख १६ मे रोजी त्यांस विधिपूर्वक दिवाणगिरीची वस्त्रे देण्याचा समारंभ झाला. कैलासवासी खंडेराव महाराज यांनी सन १८५७च्या बंढांच्या प्रसंगी इंग्रजसरकारास निर्मळ मनानें सहाय केले त्याबद्दल त्यांचे उपकार फेडावे यासाठी त्यांची राणी जमना. बाई साहेब यांस दत्तक देण्याविषयीं वर किंहिलेल्या जाहीरनाम्पांत जें अभिवचन देण्यांत आलें होतें, तेंही तत्काळ पूर्ण करण्यांत आलें महाराणी जमनाबाई साहेब पुण्याहून तारीख २ मे रोजी बडोद्यांत आल्या, आणि तारीख ३ रोजीं समारंभानि- शीं राजवाड्यांत प्रवेश केला. तारीख २७ मे रोजी काशीराव दादा गायकवाड यांचे मधले चिरंजीव यांस राणीसाहेब यांच्या मांडीवर दत्तक देण्याचा विधी होऊन त्याच दिवशी ह्या अप्रतीम भाग्यशाली पुरुषास विधियुक्त राज्याभिषेक करून बडो- द्यांच्या नृपपदीं स्थापन करण्यांत आले. श्रीमंत महाराज सयाजीराव गायकवाड हे गायकवाडांचे मूळ पुरुष पिलाजीराव गायकवाड यांचे औरस वंशज. हे घराणे खानदेशांतील एका कुग्रामीं फार वर्षांपासून रहात होतें, व त्यांचा गायकवाडाच्या राज्य घराण्याबरोबरचा संबंध काळवशेकरून पुष्कळ वर्षांपासून इतका शिथिल झाला होता की, त्याविषयी यांस विस्मृति पडली होती; परंतु महाराजांच्या माग्यानें अज्ञानरूपीं गाढ निर्हेतून त्यांस हालवून जागृत केले, आणि तुझी काही उगीच हाल चाल करा ह्मणजे झालें, मी तुमची कार्यसिद्धि करून देण्यास तत्पर आहे, अशी त्यांची पाठ थापटून प्रयत्न प्रवृत्त केलें आणि अल्पायासानें महत्कार्याची सिद्धि करून दिली. गोविंदराव गायकवाड व गणपतराव गायकवाड यांच्या वंशजांनी बडोद्याध्या रा. ज्य गादीवर आपले हक्क सांगितले होते, इंग्रज सरकारांनी ते कबूल केलें नाहींत. गोविंदराव यांचे चिरंजीव मुरारराव यांनी आपणास अनावगतमनोरथ पाहून लज्जेनें आत्महत्या करून माण दिला; आणि दुसरे सदाशिवराव यांस काशी- स नेऊन ठेविलें आहे. गणपतराव गायकवाड यांच्या वंशजांनीं समय पाहून वर्तन केल्यानें त्यांची नेमणूक वाढवून देऊन त्यांस सुखाने बडोद्यास राहू दिले असून यांचा सन्मानही चांगला ठेवितात. महाराजांच्या अप्राप्तव्यवहारदशेंत राजा सर टी माधवराव साहेब यांनीं बडोद्याचा राज्यकारभार सुमारे साडे सहा वर्षे केला. त्या राज्यकारभाराची पद्ध त कशी आणि त्यापासून काय परिणाम झाला, याविषयीं थोडासा विचार केला असतां कांहीं वैगुण्य दिसणार नाहीं असे वाटतें. आपण बडोद्याचा राज्यकारभार कोणत्या धोरणावर चालविणार याविषयीं त्यांनीं सन १८७५/७६ च्या प्रथमारंभांच्या रिपोर्टातील लेविसाव्या कलमांत उल्लेख केला आहे. त्याचे भाषांतर येथें देतों तें असें:- -