पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३५४ ) मल्हाररात्र महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. हैं योग्य होतें काय ? व असा अविचार करण्यांत महाराजांचें तरी कांहीं हित होते काय ? अगढ़ीं नाहीं. हित तर एका निराळ्यांच भाग्यशाली पुरुषाचें होतें. खंडेराव महाराज निवर्तले तेव्हां राणी जमनाबाई साहेब गरोदर होत्या आणि त्या प्रसूत होईपर्यंत मल्हारराव महाराज फक्त. राजप्र. तिनिधी मानीले होते. निमित्तच पाहिजे होते तर महाराजांच्या सत्तेस मर्यादा कर ण्यास हे योग्य निमित्त होते, असे असतां ती संधी देखील इंग्रजसरकारच्या अ धिकाऱ्यांनी व्यर्थ घालविली. दिवाणाच्या संबंधानें आपला अधिकार काढून घेत. ल्यामुळे बडोद्याच्या राजावर आपला जो दाब होता तो नाहीसा झाला आहे आणि व्यापासून राज्यकारभारांत फार अव्यवस्था झाली आहे असे इंग्रज सरकारच्या अधिकाऱ्यांस चांगले माहीत होते पण. मल्हारराव महाराज यांस राज्यपद देतांना दिवाणाची नेमणूक आपल्या विचाराने करावी हा देखील त्यांच्या सत्तेस ते प्रतिबंध करीत नाहीत. पाहिजेल त्यांस दिवाण नेमूं देतान, पाहिजेल तशी अव्यवस्था करूं देतात, आणि मग अतिशय अनर्थ गुजरल्यावर त्याबद्दल निवारण करण्याचे उपाय योजण्यास प्रवृत्त होतात, ही कोण राज्यकारभाराची भयंकर पद्धति ! नाना साहेब खानवेलकर यांस दिवाण नेमून राज्यकारभारांत अव्यवस्था केल्याबद्दल मल्हारराव महाराज यांस जबाबदार धरले याचें कारण काय ? तर त्यांस स्वतंत्रपणे दिवाण नेमण्याचा अधिकार दिला होता है; पण दिवाण नेमण्याचा अधिकार देणाराकडे त्याबद्दल कांहींच जबाबदारी येत नाहीं हें काय ? बडोद्याच्या राज्यकारभारांतील अव्यवस्थेबद्दल मल्हारराव महाराजांपेक्षा इंग्रज सरकारच्या अधिकाऱ्यांवर त्यांच्या च. झणण्याप्रमाणे मोठी जबाबदारी होती. देशी राजांच्या राज्यकारभारांत कधीही अं दाधुंदी चालं देणार नाही अशी त्यांची प्रतिज्ञा आहे, तीस त्यांच्या वर्तनानेंच व्य त्यय येतो. वाईट मनुष्यास दिवाण नेमून अव्यवस्था केल्याबद्दल मल्हारराव महाराज यांजवर जबाबदारी येते. आणि इंग्रजसरकारच्या अधिकाऱ्यांनी ज्यास अर्ध वेडा झटले त्या राजपुत्रास राज्यपद दिल्यामुळे झालेल्या अव्यवस्थ बद्दल इंग्रजसरकारच्या अधिकाऱ्यांकडे कांहींच जबाबदारी येत नाही हें कसे ? मल्हारराव महाराज यांनी जर इंग्रजसरकारास असे विचारले कीं, तुमच्या अधिकाऱ्यांनी तर मला माझ्या कृत्याबद्दल पृछानर्ह ठरविले होते तर तुझी मला गा. दीवर बसवून माझा जास्त फजिता का केला ? त्याच वेळेस जमनाबाई यांस दत्तक देऊन मला योग्य नेमणूक करून देऊन मला मोकळे केलें असते ह्मणजे मी तेवढ्यानेंच समाधान पावला असतों. तर इंग्रजसरकार त्यांस काय बरें उत्तर देतील ? बडोद्याच्या राज्यकारभारांत अशी अव्यवस्था व्हावी कीं जेणेकरून आह्मास राज्यकारभारांत मध्यस्ति करण्याची संधी सांपडावी यास्तव आमच्या काम- दारांनीं तुझास राज्यपद दिले, हेंच काय ते निर्मळ मनाचे आणि खरें उत्तर आहे. दिप्तालय विझविण्यासाठी तेल ओतावें त्याप्रमाणें शेवटों कर्नल फेर यांच्या नेम- णुकीचा परिणाम झाला, आणि मल्हारराव महाराज यांचें राज्य एकदांचे जळून रा