पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपसंहार. ( ३५३ ) होते आणि लोक त्यांस अर्ध वेडा ह्मणत असत, हें इंग्रजसरकारच्या अधिकाप्यांस माहीत होतें असें त्यांच्या लेखावरून शाबीत आहे. (सर बारटल फियर यांनी दादाभाई नवरोजी यांस पत्र लिहिले त्याचें तात्पर्य उतरार्धाच्या १५२ पानावर लिहिले आहे तें पाहा). महाराज प्रौढवयांत आल्यावर त्यांजवर दोन आरोप आले, त्याबद्दल इंग्रज- सरकारच्या अधिकाऱ्यांचे असे लेख आहेत कीं, ते मनानें इतके विकळ आहेत की त्यांच्या कृत्याबद्दल त्यांस जबाबदार धरतां येत नाही. * दुसरे त्यांस हेंही माहीत होते की खंडेराव महाराजांकडून त्यांचा विशेष छळ झाला होता व त्यांत त्यांची भाऊ शिंदें वगैरे अनुयायी मंडळी अनुकूळ होती व ते छळ मल्हारराव महाराज यांच्या मनांत सळत होते- आणखी असे ही अनुभवास आले होते की, दिवाणाची नेमणूक करण्याविषयीं खंडेराव महाराज यांस स्वातंत्र्य दिल्याने त्यांनी वाईट मनुष्याची दि- वाणपदावर नेमणूक केल्यामुळे राज्यकारभारांत फार घोटाळा झाला होता. अशा स्थितीत खंडेराव महाराज एकाएकी निवर्तले आणि मल्हारराव महाराज यांस राज्या धिपत्य मिळण्याची वेळ आलो. मल्हारराव महाराज यांचा जन्मतः राज्यगादीवर इक्क होता. इंग्रजसरकाराने ज्याचा हक्क नव्हता असा अयोग्य मनुष्य राजगादीवर आणून बसविल्यामुळे व्याजपासून जे अनर्थ झाले त्याची जबाबदारी इंग्रजसरका- रावर आहे असे झणतां येत नाहीं; परंतु मल्हारराव महाराज यांस राजपद मिळा- ल्यावर त्यांजपासून जे अनर्थ होणार होते ते न होण्याविषयीं अगोदर कांहीं व्यव स्था करणे इंग्रजसरकारच्या अधिकाऱ्यास त्यांच्याच ह्मणण्याप्रमाणे अवश्य होतें कीं नाहीं आणि होते तर ती कां केली नाहीं ? खंडेराव महाराज निवर्त ल्याबरोबर त्या क्षुब्ध आणि क्षुधित नृसिंहाचे बंधन मुक्त करून त्यास एकदम ज्यांचे अपराध त्याचे मनांत जळत होते त्यांजवर कसे सोडून दिले, आणि जो आपल्या कृत्यांबद्दल जबाबदार धरतां येत नाही इतका मनानें विकळ आहे व क्षीण बुद्धीच आहे असे इंग्रजसर कारच्या अधिकाप्यांनी स्पष्टपणें झटळें होतें तोच राजपुत्र त्यां- च्याच दृष्टीने राजपदार्ह कसा झाला ? देशी राज्यांच्या राज्यकारभारांत अव्यवस्था न होऊं देणें हें आमचें मुख्य कर्तव्य असून त्यामुळे तहनामे आणि वचने यांस बाध आला तरी चिंता नाहीं अशी ज्यांची प्रतिज्ञा त्यानीं वीस लक्ष प्रजेचें जीवित, अब्रू आणि मालमत्ता महाराजांच्या स्वाधीन करतांना कांही देखील विचार करूं नये FRON. To. Government of India, Foreign Department. The most Honorable Marquis of Salisbury, Her Majesty's Secretary of State for India. “2 Mulhar Rao Gaekwar succeeded his brother, Khunderao in 1870. His ante- cedents were not favourable. He had been accused of being concerned in a conspi- racy to murder his brother by poison or other means in 1863, and had in consequence been kept in confinement as a State prisoner during his brother's life time. He was then described in the Residency records as being “ intellectually feeble and apparent. ly irresponsible for his actions." " (Baroda Blue Book No. 5 Page 3.)