पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३५२) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास- विचारांतीं असें कळून येतें कीं, बडोद्याच्या राजावर कृपाकरून त्यास स्वतंत्र करणे हा मुळ उद्देश नव्हे व त्यापासून राजाचें व राष्ट्र चे काहीं हित व्हावे हाही हेतु नव्हे. दिवाणाची नेमणूक स्वतंत्रपणे करण्याबद्दल मुंबई सरकारांनी खंडेराव महाराज यांस खलिता लिहिला त्यांत आजपासून राज्यकारभारांत अव्यवस्था झाली असतां त्याबद्दल तुझास आम्ही जबाबदार धरणार असे महाराजांस बजावून ठेविले होवें. याप्रमाणे या घातक स्वातंत्र्याबरोबर राज्यांतील अव्यवस्थेची सर्व जबाबदारी एकट्या राजावर येऊन पडली होती; आणि इंग्रजसरकारांनी, जेव्हां त्यांची इच्छा होईल तेव्हा राजाचें पारिपत्य करण्याचा एक नवा अधिकार संपादन करून ठेविला होता. खंडेराव महाराज यांस या स्वातंत्र्याचा दुष्ट परिणाम अनुभूत होण्यास एक वर्षही लागळें नाहीं. ज्यास दिवाणगिरी देण्यासाठी त्यांनी व्यूह रचला त्या भाऊ शिंद्यास दिवाणगिरविरून काढून टाकणे इंग्रजसरकारांनीं भाग पाडून महाराजांचा पाणउतारा केला आणि गादीवर बसल्यापासून त्यांच्या मनास पहिल्यानेच हा जबर जखम लागली महाराजांनी त्यास पुनः दिवाण नेमण्याविषयीं वारंवार प्रयत्न करून आशाभंगाचे एक मानसिक दुखणें आपल्यास जढवून घेतलें होतें आणि त्यांचा देहान्त करण्यास शारीर रोगास हें मानसिक दुखणें साह्यभूत झालें. यावरून बडोद्याच्या राजास हें स्वातंत्र्य देण्यांत कांहीं स्तुत्य उद्देश होता आणि त्यापासून कांहीं राजहित झालें असें तर दिसत नाही. राजानें अयोग्य मनुष्याची दिवाणपदावर नेमणूक करणे, त्या दिवाणापासून राज्यकार- भारत अव्यवस्था होणे, त्या अव्यवस्थेबद्दल राजावर जबाबदारी येणे आणि त्यापासून त्याचें अनाहत होणें, हे एका मागून एक अगदी नेमळेळे परिणाम होते आणि ते क्र- मेंकरून तसेच घडले. इंग्रजसरकारच्या दूरदर्शी अधिका-यांस ते समजले नव्हते असे नाहीं. परंतु त्यांस एक प्रकारचे नाटक करून मौज पाहावयाची होती. जे स्वातं. त्र्य राज्यकारभारांतील अव्यवस्थेचें मूळ बीज तें राष्ट्राच्या विपक्षाचें ही मूळ बीज; तेव्हां हें स्वातंत्र्य देतांना राष्ट्राच्या हिताकडे पराकाष्ठेचे अलक्ष्य झालें हा अ गदी निरपवाद सिद्धांत आहे. दिवाणाच्या नेमणुकीबद्दल मुंबईसरकारांनी खंडेराव महाराज यांस खलिता लिहि- ला झणून वर लिहिले आहे त्यांत आणखी असे लिहिले होते की, अयोग्य मनुष्यास दिवाणगिरीचा अधिकार देऊन तुझी आपळा राज्यकारभार बिघडविणार नाही अशी आमची खातरी आहे. महाराजांनी भाऊ शिंदें पांस दिवाण नेमून मुंबईसर- कारच्या सूचनेचा तात्काळ अव्हेर केला असता व शिंदे याच्या दिवाणगिरींत राज्य- कारभारांत पराकाष्ठेची अव्यवस्था झाली असतां इंग्रज सरकाराच्या अधिकाऱ्यांनी त्या गोष्टीकडे एकसारखी डोळे झांक केली होती ती होतीच, व निंबाजी ढवळ्यासारख्या निरक्षर मनुष्यास महाराजांनीं अक्टिंग दिवाण नेमळे त्यांस त्यांची अनुमती होतीच. आतां मल्हारराव महाराज यांच्या संबंधानें इंग्रजसरकारच्या अधिकाऱ्यांचें वर्तन कसे होते त्याविषयीं आपणास विचार करावयाचा आहे. हा विचार आपल्यास इंग्रजसरकारच्या अधिकाऱ्यांच्याच दृष्टीने केला पाहिजे. महाराज लहानपणीं छांदिष्ट