पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपसंहार. ( ३५१ ) इंग्रज सरकारच्या राज्याची स्थिति आणि त्यांच्या अधिकाऱ्यांची सुशिक्षित अवस्था ध्यानांत घेऊन त्याविषयी आपल्यास विचार केला पाहिजे. देशी राजांच्या राज्य कारभारांत अव्यवस्था असणे ही गोष्ट आपल्या राज्यास कांही काळापूर्वी हितावह होती, परंतु आतां तो काळ गेला व देशी राजांच्या सत्तेस मर्यादा केली पाहिजे अ- से इंग्रज सरकारचे अधिकारी ह्मणं लागले, तेव्हां त्यांनी बडोद्याच्या राजांशीं कोण- त्या प्रकारचें वर्तन केले आणि त्या वर्तनापासून राजांचे व राष्ट्राचें कांहीं हित झाले किंवा अनहित झाले हा ह्या विचारांत मुख्य मुद्दा आहे. ठकर साहेब यांनी सर रिचर्ड मीडच्या कमिशनाच्या रिपोर्टावर मिनिट लिहिले आहे सांतील एकुणिसाव्या कलमाचा सारांश या ग्रंथाच्या उत्तरार्धाच्या पांचव्या पानांत आहे, तो व लाई नार्थ ब्रुक यांनी महाराजांस खलिता लिहिला, त्यांतील तात्पर्य उत्तरार्धाच्या ६२ व्यापा- नांत आहे तें वाचकांनी पुनः वाचावे ह्मणजे इंग्रजसरकारचे अधिकारी देशी राजां- च्या राज्यकारभारावर आपला केवढा जबर हक्क सांगतात ते कळून येईल. देशी राजांच्या राज्य कारभारांत आम्हीं कधीं अंदाधुंदी चालू देणार नाहीं अशी त्यांची प्रतिज्ञा असून मल्हारराव महाराज यांनी आपला राज्यकारभार वाईट रीतीनें चाल- विला ह्मणून त्यास पदच्युत केलें यास्तव प्रतिज्ञानुरूप त्यांनी बडोद्याच्या दरबाराशी वर्त्तन केले किंवा कसे त्याचा आतां आपण थोडासा विचार करूं. खंडेराव महाराजांच्या कारकीर्दीत राज्यकारभाराच्या पद्धतीत बरीच फेरबद्दल हो- ऊन हें राज्य कांहीं सुधारणुकीच्या पंथास लागढ़ें होतें; परंतु भाऊ शिंदे दिवाण झा. ल्यापासून राज्यकारभारांत कांहींशीं झालेची सुधारणा लयास जाऊन जास्त अव्यवस्था झाली. या अव्यवस्थेचें बीज काय तर खंडेराव महाराज यांस पाहिजेल तो दिवाण नेमण्या- विषयीं स्वतंत्रता मिळाली हैं. हें खातंत्र्य सर बार्टल फ्रियर हे मुंबईचे गवरनर अणि कर्नल आर्थर साहेब बडोद्याचे अक्टिंग रेसिडेंट असतां खंडेराव महाराज यांस प्राप्त झाले. बडोद्याच्या राजाने इंग्रजसरकारास पसंत पडेल असा दिवाण नेमावा अशी जी त्याच्या सत्तेस मर्यादा घालून ठेविली होती व त्या मर्यादेंतून आपल्यास मुक्त करावें याविषयीं खंडेराव महाराज यांचे तीर्थरूप सयाजीबोवा यांनी पराकाष्ठेचा प्रयत्न के ला असताही इंग्रजसरकारच्या माजी अधिकाऱ्यांनी ती गोष्ट कबूल केली नाहीं त्याचा हेतु योग्य मनुष्याची दिवाणपदावर नेमणूक करणे राजास भाग पडावें, हा. त्या ' खेरीज दुसरा कोणताही हेतु नव्हता. राजास पाहिजेल तेव्हां दिवाणास काढून टा- कण्याचा अधिकार होता, फक्त त्याच्या जागीं जो नवा दिवाण नेमावयाचा तो इंग्रज- सरकारांस पसंत पडेल असा नेमावा इतकीच काय ती आट होती. आतां त्या आटींतून खंडेराव महाराज यांस मुक्त करण्यांत स्तुत्य उद्देश तो कोणता आणि त्या. पासून राजाचें व राष्ट्राचें कांहीं हित किंवा अनहित झाले याचा आतां विचार क. रावयाचा. बडोद्याच्या राजास या संबंधाने स्वतंत्र केळे हा स्तुत्य उद्देश असें प्रथम दर्शनी दिसून येतें. कारण देशीराजांची सत्ता हळुहळु कमी करून त्यांस अगदी संपुष्टात आणून ठेवावयाचें अशा विचाराच्या काळांत ही गोष्ट घडली. परंतु पोक्त