पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(४२) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. त्यांचा वास्तविक संकल्प बळवंतराव यांस दिवाणगिरी द्यावयाचा होता, परंतु कर्नल बार यांचे अनुमत न पडल्यामुळे ती गोष्ट सिद्धीस गेली नाहीं, तथापि महाराजानी त्यास आपल्या राज्यांत एक मोठा अधिकारी बनविला. कांही संबंध नव्हता. राहुरकर याने नायब दिवाणागरीचे काम करावे असे महाराज यानी ठरविले, परंतु तें काम चालविण्यास त्याचे आंगीं सामर्थ्य नव्हते म्हणून महाराजानी त्याचे हाताखाली बळवंतराव देव यांची योजना केली. बळवंतराव देव यांचा महाराजांबरोबर पूर्वीचा महाराज राज्याधिकारी झाल्यावर काय ती एक दोन वेळांच हुशारीविषयों महा- महाराजांनी त्यांस एके दिवशीं प्रातःकाळीं बोलावून असे सांगितले कीं, ‘बळवंतराव राहुरकर याजमध्ये कांहीं ज्ञान नाहीं, परंतु मी त्यास वचन दिले आहे ते मला पुरे करावयाचे आहे, आणि तो माझा अति अवडता आहे. मला त्याची कीर्ति वाढवावयाची आहे, सबब त्यास मी आज तुमच्या पदरांत घालीत आहे. तर तुम्ही त्याची कीर्ति वाढेल अशा रीतीनें व न्यायाने राज्यकारभार चालवा.' त्यांची भेट झाली होती, परंतु इतर लोकांचे द्वारे त्यांच्या राजांस कळलें होतें. व त्या वेळेपासून बळवंतराव राहुरकर याच्या कारभाराची सुरुवात झाली, आणि त्याच दिवशीं बरिष्ट अदालत स्थापन करून सर्व कामदारांस असा हुकूम कळविला कीं, आजपासून त्यानी वरिष्ट अदालतीच्या हुकुमाप्रमाणे चालावे. या नवीन योजनेपासून दिवाण व त्यांचे नायब दिवाण भाऊ खेडकर यांचे वजन अगदी कमी झाले. फक्त रेसिडेन्सीबरोबरच्या व्यवहारांत मात्र वरिष्ठ अदालतीचे अधि कारी मन घालीत नव्हते; कारण गोपाळराव मैराळ यांचा अधिकार कमी करणें हें कर्नल बार साहेब यांस आवडत नाहीं असे त्यांस माहित होतें. कमी झाले रावसाहेब बा होते, परंतु बार नांवाबरोबर बापू- पूभाई दयाशंकर यांचे महत्वही या नवीन योजनेपासून साहेब यांस वाईट वाटू नये म्हणून बळवंतराव राहुरकर यांचे भाई यांचे नांवड होतें, व त्याखेरीज गोविंदराव मामा आणि मार्तंडराव अण्णा संगमनेरकर हेही वरिष्ट अदालतीच्या कामदारांत मोडत होते, परंतु त्यांचे हातांत कांही- एक सत्ता नव्हती. सर्व राज्यकारभार बळवंतराव देव यांच्या तंत्राने बळवंतराव राहुरकर चालवीत होते. " वरिष्ट अदालतीत कामाच्या सोयीसाठी तीन शाखा केल्या होत्या. एक फौजदारी, दुसरी दिवाणी व तिसरी मुलकी. या तिन्हीही खात्यांवर एक एक कामदार नेमून त्याचे हाताखाकून मिले होते, आणि कामाची व्यवस्था कशी ठेवावी याबद्दल त्यांस नियम करून दिले होते. त्याप्रमाणे ते कामदार कामे तयार करून फैसल्यासाठी मुख्य कामदार यांचे समोर आणीत आणि त्यांचा न्यायाने निवाडा होत असे. बळवंतराव राहुरकर याच्या स्वकीय ज्ञानाप्रमाणे पाहतां या खटाटोपीपासून तो काय चांगला परिणाम झाला असेल असा सहज संशय घेतां येईल, परंतु तो अधिकारावर होता तोपर्यंत वरिष्ट अदालतीचें काम उत्तम चालले होते यांत कांहीं संशय नाहीं.