पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ९. मल्हारराव महाराजांच्या राज्यकारभाराची नवीन व्यवस्था. मल्हारराव महाराज यानीं आपल्यास राज्याभिषेक करून घेतला त्याबद्दल संक्षिप्त हकीकत - बळवंतराव राहुरकर यांस नायव दिवाण नेमलें- बळवंतराव देव यांचा दरबारांत प्रवेश-व- रिष्ट कोर्टाची स्थापना-कामाकाजांच्या व्यवस्था-गो- पाळराव मैराळ यांचा मृत्यु व त्यांच्या घराण्याची संक्षिप्त हकीकत. मल्हारराव महाराज यांस राज्यपदाच्या चिरस्थायीपणाविषयीं जो संदेह होता तो जमना- बाई साहेब यांस कन्या झाल्यामुळे मिटला. त्यांनी ज्या लोकांकडून त्यांस अपकार झाले होते त्यांचे आपले इच्छेप्रमाणे पारिपत्य केले, व आपल्या मंडळीस त्यांस जसे उचित वाटले तसें द्रव्य, दागिने आणि इतर वस्तु देऊन मोठमोठया नेमणुका करून दिल्या, व इनाम व वर्षासने करून देऊन महाराज त्यांचे अनृणी झाले. याप्रमाणें महाराजांच्या समजुती- प्रमाणे त्यांस कांहीं कर्तव्यकर्मे अवश्य होती ती त्यांनी सर्व उरकून घेतली होती, आणि आतां त्यांस आपल्या राज्याची स्थिति कशी आहे, प्रजेस सुखदुःखे काय आहेत, याबद्दल चौकशी करून योग्य रीतीची व्यवस्था करण्यास त्यांचे मन स्वस्थ झाले होतें. जमनाबाई साहेब प्रसूत झाल्यानंतर ही गोष्ट त्यांचे मनांत बरीच वागली होती असे त्यांच्या पुढील वर्तनावरून दिसतें. सन १८७१ च्या आगस्ट महिन्यांत महाराजानी आपणास राज्याभिषेक करून घेतला. हा समारंभ मोठया थाटाचा होता. ज्या पदाविषयों महाराजांची वारंवार निराशा झाली होती, व ईश्वराच्या कृपेवांचून निवारण व्हावयाचीच नाहीत अशी महत संकटें मध्ये आडवीं आली होती, ती सर्व निवारण होऊन निःसंदेहपणे ते आतां बडोद्याचे राजे झाले तेव्हां हा राज्याभिषेकाचा दिवस महाराजांस व त्यांच्या मंडळीस किती हर्षजनक झाला असेल तें काय सांगावें ! हा समारंभ साजरा करण्याकरितां व नामदार गवरनर जनरल साहेव यांचे तर्फे वस्त्रे देण्याकरितां मुंबई सरकारानी आपल्या सेक्रेटरी साहेबांस पाठविले होतें. हा विधी आटपल्यानंतर महाराजानी त्याच महिन्यांत राज्यकारभारांत फेरफार केला. मागे लिहिलेच आहे की, गोपाळराव मैराळ हे नुसते नामधारी दिवाण असावेत अशी महाराजांची इच्छा होती, आणि सर्व राज्यकारभार त्यांस बळवंतराव राहुरकर यांचे नांवाने चालवावयाचा होता. तो त्यांचा फार दिवसांचा संकल्प त्यानीं आतां शेवटास नेला.