पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३५० ) मल्हाराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. स्थान रचलें होते असा जो अपवाद आला होता त्याबद्दल त्यास त्यांच्या बंधून सा- त वर्षे कारागृहांत ठेविलें होते. महाराजांचा एकुलता एक पुत्र ही स्थिति महाराजांस प्राप्त होण्यापूर्वी नुकताच वारला होता; नंतर त्यांच्या मियपत्नीचा वियोग होऊन तो स्वर्गवासी झाली. ते कारागृहांत असतां खंडेराव महाराज यांच्या अनुयायांकडून त्यांस पराकाष्ठेचा त्रास होत असे, व हलकीं मनुष्यें देखील खंडेराव महाराज यांचें आवडते व्हावें ह्मणून महाराजांची निर्भर्त्सना करीत असत असें ह्मणतात, आणि त्यांच्या मंडळीवर नाना प्रकारचे आरोप आणून त्यांचा छळ होत असे. महाराजांचे संबंधी आणि सगे सोयरे यांस देशोधडीस लाविलें होतें. अशा स्थितींत महाराज असतां त्यांचे सहचर कायतें त्यांचें असंस्कृत मन. आपल्यास राज्यपद प्राप्त झाले तर आपली कर्तव्यकर्मे कोणतीं याविषयीं चिंतन करण्यास त्यांस कारागृहवासांत सात वर्षांचा प्रशस्त काळ मिळाला होता. आणि महाराजांस राज्यपद प्राप्ति व्हावी आणि त्यांच्या कपाळावर अपयशाचें खापर फुटावें आणि शेवटी एका भाग्यशाली : पुरुषाचा उत्कर्ष व्हावा असा ईश्वरी संकेत होता. सयाजीराव महाराज यांच्या पांच पुत्रांपैकीं शेवटी एक मल्हारराव महाराज विद्यमान असावें. त्यांचे तीन ज्येष्ठ बंधू अपुत्रिक मरण पावावें आणि त्यांस खंडीभर कन्या असून पुष्कळ पुत्र होऊन त्यां पैकी एकही बांचं नये. यास ईश्वरी संकेत ह्मणूनये तर ह्मणावें तरी काय ? सारांश एखाद्या सिंहास पुष्कळ काळपर्यंत पिंजऱ्यांत कोंडून ठेवावें, त्यास नानाप्रकारचे उपद्रव द्यावे, उपाशी मरावें, आणि नंतर त्याजपासून होणाऱ्या नाशाविषयों कांहीं एक काळजी न ठेवितां व बंदोबस्त न करितां त्यांस एकाएकी पिंजऱ्यांतून मोकळे करावें त्याममाणे मल्हारराव महाराज यांस सर्व प्रकारचे अपकार होऊन त्यांचें मन अगदी संतप्त झाल्यावर खंडेराव महाराज एकाएकी मरण पावले आणि महाराज हे कारागृहांतून निघून राज्यपदावर आरूढ झाले आणि सात वर्षेपर्यंत कारागृहांत त्यांनी जे जे संकल्प करून ठेविले होते ते ते सर्व यथासांग सिद्धीस नेले. याविषयी या इतिहासांत विस्तारपूर्वक सांगितलें आहेच आणि याबद्दल मल्हारराव महाराज यजिकडे दोष तरी काय ? त्यांस बाळपणापासून जें शिक्षण मिळाले होते त्याचा तो स्वाभाविक परिणाम होता. परंतु इंग्रज सरकारच्या संबंधाने त्यांचें वर्तन फार पवित्र असून निर्मळ मनानें ते त्यांचे उपकार स्मरत होते व त्यांच्या न्यायावर त्यांची पराकाष्ठेची निष्ठा होती. आपल्या देशांत जीं देशीं राज्ये आहेत त्यांत इंग्रज सरकाराबरोबरील निर्मळ स्नेहांत बडोद्याच्या राज्याची बरोबरी करील असें एकही राज्य नाही. वडिलांनी आपल्या मुलास सन्मार्ग लाविला म्हणजे तो कसा अस्खलित चालतो त्याचें हें प्रमाण आहे. मल्हारराव महाराजांचे पूर्वज इंग्रज सरकाराबरोबर एकीनें वागले तो कित्ता यांनी 'अगदी बरोबर उचलला. बडोद्याच्या राज्याची मागील स्थिति आणि मल्हारराव महाराज यांची आशक्षित अवस्था ध्यानांत घेऊन आपण महाराज यांजविषयीं विचार केला आहे त्याप्रमाणें