पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपसंहार. ( ३४९ ) लागतात. बाळपणीं सुशिक्षण नाहीं, कौमार अवस्थेत विद्याभ्यास नाहीं, आणि ज न्मप्रभृति संतूसंगतीचें वारेंही लागले नाही, तर मनुष्यप्राण्याने काय करावें आणि न्याय ह्मणजे काय व विधेय अविधेय कृत्ये कोणतीं याची त्यास ओळख तरी कशानें व्हावी ? जो अंध मनुष्य आपण अंध आहोत त्यापेक्षा दुसऱ्याच्या तंत्राने आपल्यास वागळेच पाहिजे, असे समजून वागतो त्याचा काहीं तरी निभाव लागतो. परंतु जो अंध आपणास दिसतें असा डौल घालून स्वतंत्रपणानें बागतो, त्याजवर अ- नेक अनर्थ पदोपदीं गुदरतात. अज्ञानांध राजपुत याची स्थिति त्या दुसऱ्या अंध ळ्याप्रमाणे असते. तो आपण शहाणा असे समजून स्वतंत्रपणे वागावयास जातो, आणि त्यांत त्यास पदोपदीं ठोकरा लागतात, तरी दुसऱ्याच्या तंत्राने वागलों तर म ला लोक मूर्ख ह्मणतील असा त्याच्या अंगीं दुरभिमान असतोच. विषय सेवनें करून जसें शरीर तसें दुष्टसहवासानें मनही दुर्बळ होऊन जाते. आणि ईप्सित अर्थाची आसिद्धि झाली म्हणजे त्यास अनावर क्रोध चढतो, आणि मग सत्ता हातांत अस ल्यामुळे कर्तव्याकर्तव्याचा विचार फारसा रहात नाहीं. राजधर्म आणि न्याय ह्मण- जे काय, सत्याची योग्यता किती मोठी आहे, दया, शांति, क्षमा, आणि विनय यांपासून किती चांगले परिणाम घडतात, व सदाचरणापासून लौकिकांत मान वाढून त्यापासून किती लाभ होतात आणि आपले सर्व आयुष्य सुखाचें माहेर घर कसे बनून जातें, ह्या गोष्टी मनांत ठसण्यास सुशिक्षण आणि सत्संगति असलीच पाहिजे. नुसता सशांत जन्म झाल्यानें त्या गोष्टी आपल्या आपण मनांत येत नाहीत. आणि मल्हारराव महाराज यांस चांगले सुशिक्षणही देतां आलें नाहीं, व सत्संगतीही घढ- ली नाहीं तेव्हा त्या बिचाऱ्याचा दोष तरी कोणता ! ! याप्रमाणे बाळपणांत आणि कौमारअवस्येंत महाराजांचा काळ गेला होता आणि तेव्हां पासून त्यांस लोक अवलीया राजा ह्मणूं लागले. यावरून हा राजपुत चांगला राजा निवडेल, न्यायानें प्रजेचे पालन करून तिच्या राजभक्तीस पात्र होईल आणि सद्यशाचा त्याचे माळीं तिळक लागेल अशी आशा करण्यासारखी पूर्वीची कांहीं एक शुभलक्षणे नव्हतीं इतकें सांगितलें ह्मणजे त्यांत सर्व कांहीं आलें. मोठे सयाजीराव महाराज वारले तेव्हां मल्हारराव महाराज पंधरा वर्षांच्या वयाचे होते. सन्मार्ग लावण्याचा आणि विद्याभ्यास करविण्याचा काळ निघून गेला होता. गणपतराव महाराज याजबरोबर विग्रह करण्यांत मल्हारराव महाराज पांस कांहीं अ र्यलाभ नव्हता; कारण की गणपतराव महाराज अपुतीक मरण पावले असतां गादी. चा वारसा खंडेराव महाराज यांचा होता. गणपतराव महाराज यांचा मृत्यू खंडेराव. महाराज यांस राज्यपदमाप्तीस कारण झाला हे पाहून मल्हारराव महाराज यांचे म नांत खंडेराव महाराजांविषयों द्वेषभाव उत्पन्न होणे स्वाभाविक होतें. राजलक्ष्मीच्या संबंधाने उभयता बंधूंमध्यें पराकाष्ठेचें वैर वाढलें होतें. खंडेराव महाराज यांचे का- रकिर्दीत मल्हारराव महाराज यांजवर दोन अपवाद आले होते. सन १८६३ च्या सालीं खंडेराव महाराज यांचा प्राणनाश करण्याविषयों मल्हारराव महाराजांनी कार-