पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३४८) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. राजानें उग्र तप करून स्वगंगा मूलोकावर आणली अशी पुराणांतरी कथा आहे. तें काय असेल तें असो परंतु युरोपखंडांतून निघालेल्या विद्यारूप जान्हवीचा प्रशस्त प्रवाह, आपण काही प्रयत्न केले नसतां यहच्छेकरून आपल्या देशांत लक्षावधि मुखाने वाहत आहे. त्या योगानें मानसिक मलापकर्ष होऊन आपणास उत्तम प्रकार- ची अवस्था प्राप्त होत असून मूलोक संबंधी सर्व अर्थ साधून घेण्यास आपण योग्य होत आहोत. त्यांत आणखी विशेष गुण असा आहे की, या विद्यारूप जान्हवीला पंक्तिप्रपंच मुळींच नाहीं. तिचें सेवन करणारा कोणत्याही जातीचा आणि कोणत्या- ही वर्णाचा आणि कोणत्याही धर्माचा असो ती त्यावर अनुग्रह करण्यास परिकर बां. धून तयार आहेच. आपल्या देशांतील इतर संपत्तीचा अन्यदेशस्थ धूर्त लोकांनीं किती जरी अपहार केला तरी विचारी लोक त्याविषयों परवा करीत नाहीत. त्यांची समजूत अशी आहे कीं, साम्य करून पाहिले असता इंग्रजलोक आपल्या देशांतून संपत्ति नेतात तिचा मोबदला प्रमाणापेक्षा जास्त देत आहेत आणि ती त्यांची समजुत खरी आहे. ज्याजपाशीं विपुल ज्ञानभांडार आहे तो नष्ट वस्तूचा खेद करीत नाहीं कारण ज्ञानाच्या योगानें ती त्यास सहज प्राप्त करून घेतां येते. । महाराजांच्या बाळपणांत त्यांस कांहीं वाईट संवयी जडूं नयेत, यासाठी त्यांच्या मातापितरांनीं कांहीं कमी काळजी ठेविली होती. असें नाहीं. आपढ़ें मूळ सद्गुणी असावें, आणि त्यास कांहीं वाईट साईट सवयी लागूं नयेत, यासाठी दुष्ट आईबाप देखील काळजी वाहतात आणि आपल्या ज्ञानाप्रमाणे आपल्या मुलास शिक्षण देता. त. मग सयाजीबांवा सारख्या सुज्ञ बापाने मल्हारराव महाराज यांस सन्मार्गी ला वण्याविषयीं यत्न केला असेल यांत नवळ काय? परंतु मल्हारराव महाराज यांचा स्वभाव लहानपणापासून अंमळ विशेष छांदिष्ट असल्यामुळे शिक्षणापासून काही चांगला अर्थ निष्पन्न झाला नाहीं. राजपुत्रास विद्याभ्यास करविण्याची पद्धत त्याकाळी बडोद्यांत कोणत्या प्रकारची होती या विषयीं या ग्रंथाच्या पहिल्या भागांत सांगितले आहेच. महाराजांच्या सहवासांत जी मंडळी होती त्यांत एकही असा नव्हता की त्यापा- सून महाराजांस कांहीं शहाणपण प्राप्त व्हावें. त्यांहून उलट त्या मंडळीचे दुर्गुण मा. व महाराजांच्या मनांत शिरण्याचा विशेष संभव होता. आणि राजपुत्र एकदां दुष्ट लोकांनी वेष्टिला म्हणजे त्यांपासून त्याची सुटकाच होत नाहीं. मोवताळची मंडळी त्यास ज्या गोष्टी वाईट त्या चांगल्या, आणि चांगल्या त्या वाईट असे त्याच्या मनां- त भरवून ठेवतात. आणि ते जें सांगतात तें खरें किंवा खोटें याचा पडताळा पाह- ण्यास त्यास संधीच सांपडत नाहीं. या मनुष्यप्राण्यावर ईश्वराची इतकी खपा मर्जी. कां आहे की, त्याच्या मनोवृत्ति नेहमी वाईट गोष्टींकडे धावाव्या हे कळत नाहीं. त्यांबद्दल त्यास शिक्षण नको, शाळा नको आणि दुसरें कांहीही नको. दुष्ट गुण त्यास सहज जडतात. आणि सद्गुण लावण्याकरितां पराकाष्ठेचे आयास करावे