पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपसंहार (३४७ ) मार्गास लागळे होतें यांत कांहीं संशय नाही. परंतु चांगली सुधारणा होण्यास ब प्याच काळाची अपेक्षा होती आणि मध्यंतरीं भाऊ शिंदे यांची दिवाणगिरी आणि . मल्हारराव महाराज यांचा राज्यकारभार यांनी मोठेंच विघ्न आणिलें. आतां मल्हारराव महाराज राजगादीनशीन झाले तेव्हां त्यांची स्थिति कोणत्या प्रकारची होती याविषयीं विचार करतांना पुष्कळ गोष्टी ध्यानांत घेतल्या पाहिजेत. १ मल्हारराव महाराज यांचा जन्म झाल्यापासून ते राजगादीवर येईपर्यंतचे या देशांतील राजपुत्रांच्या संबंधानें मन्वंतर कोणत्या प्रकारचें होतें. २ महाराजांच्या बाळपणीं त्यांस शिक्षण कोणत्या प्रकारचे मिळाले होतें. ३ महाराज यांस समजूं लागल्यावर त्यांजकडून विद्याभ्यास कोणत्या प्रकारें कर- विण्यांत आला होता. 8 त्यांस मौढदशा प्राप्त झाल्यावर त्यांची स्थिति कशी होती. ५. जन्मापासून राजगादीवर येईपर्यंत त्यांच्या सहवासास जे ढोक होते ते कोणत्या योग्यतेचे होते. इतक्या गोष्टी विचारांत घेऊन मग महाराजांस बरें किंवा वाईट झटले पाहिजे. मल्हारराव महाराज यांचा जन्म झाला तेव्हांपासून ते राजगादीवर आले तोपर्थ- तचा काल आत घेऊन काळाच्या संबंधानें विचार केला असतां राजपुत्राच्या सं- बंधानें तो काळ फार वाईट होता. राजपुवास सुशिक्षण मिळावें अशी कांहीं दे- खील योजना नव्हती; या संबंधाने आतांचें मन्वंतर फारच उत्तम आहे. राजपुत्रांस विद्याभ्यास करविण्यासाठी विद्यालयें स्थापित झालीं आहेत. मोठे मोठे विद्वान लोक राजपुतांचे विद्यागुरु असतात. आणि मुत्सद्दी लोक. राजनय शिकवितात; त्यांत एलियट साहेबांसारखे विद्यागुरू आणि राजा सर टी माधवराव साहेबांसारखे मुत्सद्दी राजनय शिकविणारे मिळाल्यावर त्या राजपुत्राच्या सुशिक्षित अवस्थेत उणेपणा क- शाचा ? राजापुत्राचे स्वाध्यायीही तसेच सत्कुळांतील आणि प्रतिष्ठित घराण्यांतील असतात, आणि दुःशील मुलांची तर राजपुत्रांवर सावलीही पडू देत नाहींत. आपल्या देशाचे अधिपत्य इंग्रजलोकांकडेस असल्यामुळे आपल्यास जे अनंत लाभ झाले आहेत त्यांत विद्याळाभ हा फार मोठा आहे. आज आपल्या देशांतील संपत्ति अनेक मार्गांनीं युरोपांत जाते ह्मणून आपल्यास वाईट वाटतें; परंतु योग्य वि चार केला तर त्या खंडांतून आपल्या देशांत एक प्रकारच्या संपत्तीचा ओघ वहात आहे तिची किंमत फार मोठी आहे. अनेक पर्वतांच्या दयांतून निघालेल्या वाहि न्या निरनिराळ्या मार्गांनीं, निरनिराळ्या प्रमाणांनी व भिन्न भिन्न गुणांच्या व वर्णांच्या उदकांनी चतु:सागरांस जाऊन मिळतात त्याप्रमाणें अनेक देशांतील प्रकारच्या सं पत्तीचे प्रवाह इकडून तिकडे आणि तिकडून इकडे चालूंच आहेत व तसेच चाल. ले पाहिजेत असा सृष्टिनिर्माणकर्त्याचा उद्देश दिसतो. भरतखंडस्थ लोकांचें पापक्षालन करून त्यांस सत्पदमाप्ति व्हावी एतदर्थ भगिरथ ४१