पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपसंहार या जगावरील एकंदर राष्ट्रे एक वेळा अगदी रानटी अवस्थेत होती आणि ती हळुहळु सुधारत आली असून आज देखील प्रत्येक राष्ट्रांत पूर्वीच्या रानटी अवस्थे- चीं धर्माच्या संबंधानें वगैरे अनेक लक्षणे आहेत; आणि जगावरील सर्व राष्ट्रे सुधा- रणुकीच्या पूर्ण अवस्थेला येऊन पोहचण्यास अनंत काळाची अपेक्षा आहे. हल्ली जी राष्ट्रे अगदी रानटी अवस्थेत आहेत, ती देखील आपल्या आपण हळुहळु सुवार णुकीच्या मार्गास लागली आहेत. मनुष्य प्राण्यासारखा ज्ञानसंपन्न प्राणी, याची उत्पत्ति एक प्रकारच्या वानर जातीपासून झाली असा अर्वाचीन तत्वज्ञान्यांनीं सि.. द्धांत केला आहे. यावरून हे जग एकाकाळीं अज्ञानांधःकारात निमग्न होते याविषयीं संशय कसचा ? आणि अनुभवावरून आपल्यास असे दिसून येतें कीं, प्रत्येक प्रा. ण्यास बाळपण, तारुण्य, वृद्धावस्था आणि मरण नेमलेलेंच आहे, तेच धर्म या जगाः सही लागू आहेत. तेव्हां त्याबरोबर प्रत्येक राष्ट्रास देखील हे धर्म लागू होतात. जी. राष्ट्रे अगदी बाल्यावस्थेत होती ती तरुण अवस्थेस प्राप्त झाली आहेत. जी तरुण अ वस्थेत होतीं तीं वृद्धावस्थमत प्राप्त होऊन मरणाच्या पंथास लागली आहेत आणि काही अगदीं बाल्यावस्थेत असून कांहीं मरून गेल्यासही हजारों वर्षे झाली असे आपल्यास या जगावरील राष्ट्रांच्या इतिहासावरून स्पष्ट समजून येतें. त्या न्यायानें बडोद्याच्या राष्ट्राविषयी विचार करतांना मल्हारराव महाराज यांच्या हातांत बडोद्याचे राज्य आलें तेव्हां ते कोणत्या स्थितींत होते याचा आणि खुद मल्हारराव महाराज कोणत्या स्थीतीत होते याचा विचार केला पाहिजे. बडोद्याचें राज्य कधीतरी अत्युन्नत दशेस आले होते आणि ज्या रीतीने आज सुधारलेल्या राष्ट्रांचा कारभार चालतो त्याप्रमाणे ह्या राष्ट्राचा कधी कोणी चालवि छा होता असे कोणाच्यानेही ह्मणवणार नाही. ह्या राज्याचे आजपर्यंत जे राजे झाले खांस कांहीं उत्तम प्रकारचें शिक्षण मिळाले नव्हतें व त्यांच्या दरबारांतील कारभारी मंडळी देखील साळी भोळी व त्यांचें ज्ञानही सामान्यच असल्यामुळे त्यांचा राज्य- कारभारही तसाच साळामोळा होता. मल्हारराव महाराज यांची कारकीर्द सुरू झाली तेव्हां हें राज्य सुधारणुकीच्या उत्तम मार्गाला काळाची अपेक्षा होती ही गोष्ट सर्वांस मान्य आहे. यांच्या राज्यकारभाराविषयी चौकशी करून ज्यांनी त्यांचे देखील असेच ह्मणणे भाग पडलें कीं, चालत होतो, त्यांत मल्हारराव महाराज लागण्यास बऱ्याच मल्हारराव महाराज दोष काढिले त्यांस ह्या राज्यांत पुष्कळ वर्षांपासून अव्यवस्था यांनी वाईट रीतीने राज्यकारभार चालवून जास्त भर घातली. आतां सृष्टिधर्माप्रमाणे बडोद्याचे राज्य हळुहळु सुधारणुकीच्या ●