पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विषप्रयोगाच्या खटल्याबद्दल सारासार विचार. से कबूल करून त्याबद्दल शिरस्तेप्रमाणे राजपुत्राच्या जन्मकाळीं जो मान देण्याचा सांप्रदाय आहे तो देण्याविषयी हुकूम दिला होता; परंतु विषपयोगाचे खटले उपस्थित झाल्यामुळे ती गोष्ट तशीच राहिली याविषयीं पंधराव्या भागांत सांगितलेंच आहे. त्या मुळाच्या हक्काविषयों हिंदुधर्मशास्त्राप्रमाणे अथवा ज्ञातिचालीप्रमाणे कांहीं प्रश्न उत्पन्न होईल तर त्याबद्दल देखील ब्रिटिशसरकारांनीं निवाडा केला आहे असे महाराजांनीं समजू नये. अशी महाराजांस सूचना करण्याविषयीं गवरनर जनरल यांणी हुकूम दिला होता. यावरून त्या मुलाच्या हक्कांत मोठें व्यंग होतेंच. त्यांत सौ० लक्ष्मीबा ईसाहेब यांच्या पूर्व स्थीतीकडे लक्ष दिलें म्हणजे त्याजपासून झालेल्या संततीस ब- डोद्याच्या गादीचा वारस ठरावणे सर्वथैव अश्लाघ्य होतें. पूर्वी राजेलोक गांधर्वविवाह करीत होते, ह्मणून मल्हारराव महाराज यांनी केलेला गांधर्वविवाह शास्त्रसंमत आहे अखें शास्त्री लोकांनी अभिमाय दिले व त्यांस दुष्यंत आणि शकुंतलेच्या गांधर्षवि वाहाचे प्रमाण दाखवि. परंतु त्या विवाहाशी या विवाहाचा कांहीं तरी मेळ आहे का ? कोठें तो तपोवनांतील कण्वाश्रम आणि कोठें तो हरीभाई चिनीवाल्याचा सुरत येथील कापसाचा कारखाना!; कोठें ती कण्वाश्रमांत वाढलेली पवित्र राजार्षीकन्या शकुंतला आणि कोठें ती अप्रसिद्ध कुलोत्पन्न लक्ष्मीबाई!, कोठें तो महापवित्र दुष्यंत राजा आणि कोठें आमचे मल्हारराव महाराज ! ! ! त्या उदाहरणाचा येथें संबंध काय ? पूर्वीचे क्षत्रिय राजे किती हो पवित्र होते!! शकुंतला ही ऋषिकन्या आहे असें दुष्यंत यास सांगितलें होते आणि तिचे सौंदर्य पाहून तो तर मोहित झाला तेव्हां त्यांस मोठा विस्मय झाला आणि ज्यापेक्षा माझें मन तिजकडेस गेलें आहे त्यापेक्षां ती क्षात्र परिग्रहा आहे त्यांत कांहीं संशय नाहीं असा त्याच्या मनाचा सिद्धांत झाला आणि तीच गोष्ट खरी झाली. तसा मनाचा पवित्रपणा येथें कोठें होता. लावण्य दृष्टिगोचर झाले की प्रथम मनानें आणि साधेल तर कर्मे द्रियांनीं तेथें धाड घातलीच. विधेया विधेयाचा, पातापात्राचा व ग्राह्याग्राह्याचा मुळीं विचारच नव्हता. वास्तविक पाहिले असतां मल्हारराव महाराज यांच्या परिग्रहास लक्ष्मीबाईसाहेब कोणत्याही रीतीनें यो- ग्य नव्हत्या, आणि ह्मणून त्याजपासून झालेली संतति राजपदानाह ठरविण्यांत कांहीं अन्याय झाला नाही. श्रीमंत सौ० राणी माळसाबाई साहेब यांस पुत्र असता तर इंग्रजसरकार यांनी कधीही त्याचा हक्क नाकबूल केला नसता. आणि नाकबूल केला असतो तर त्यांनी एक मोठा अन्याय केला असे सर्व जगांनी झटले असते; परंतु तसा प्रकार लक्ष्मीबाईसाहेब यांच्या मुलाविषयीं नाहीं. येथे मल्हारराव महाराज यांच्या कारकीर्दीच्या इतिहासाची समाप्ति झाली. आतां पुढें एक उपसंहार लिहून व हलींच्या बडोद्याच्या राज्यकारभाराविषयीं थोडा विचार करून हा ग्रंथ पूर्ण करण्यांत येईल.