पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३४४ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास- अब्रू आणि मालमत्ता ज्याच्या इच्छेच्या आधीन आहे त्यास राज्य कारभारांतील पराकाष्टे: च्या अव्यवस्थेबद्दल क्षमा करणे झणजे प्रजेला पीडा देण्याविषयी अनुमत देणे होय... तेव्हां एका मागून एक अशाच चुका करणे बडोद्याच्या प्रजेच्या हितास अपायकारक होते. त्याचप्रमाणे आपल्या रेसिडेंटास विषप्रयोग करण्यांत मल्हारराव महाराज. यांचे अंग असावे असा संशय उत्पन्न झाल्यावर त्याच्या बरोबर मित्रपणाच्या नामा.. ने निर्मळ मनाने वागणूक होणें ही गोष्ट ब्रिटिश सरकारास दुरापास्त होती. मल्हा- रराव महाराज सुधारलेकी राज्यव्यवस्था पहाण्यास पराकाष्ठेचे उत्सुक होते अशी सर लुईस पेली यांनी कमिशापुढे साक्ष दिली. त्याजवर मल्हा.. रराव महाराज यांच्या पक्षाचे लोक टिरी बडवून मल्हारराव महा-: राज यांस दिलेली मुदत पुरी झाल्यापूर्वी राज्यकारभारांतील अव्यवस्थेबद्दल त्यांस प दभ्यत केळे हा मोठा अन्याय केला असा इंग्रजसरकारास दोष देतात, परंतु मल्हार राव महाराज यांस वाईट राज्यकारभार चालविल्याबद्दल अनुताप होऊन सुधारलेली राज्यव्यवस्था पाहण्यास ते उत्सुक झाले होते किंवा त्यांजवर लार्ड नार्थ ब्रूक यांनी सच दाब घातल्यामुळे ते लाचार होऊन राज्यकारभारांत सुधारणूक करण्यास तयार झाले होते. हा मुख्य विचार आहे. कचाटीत सांपडल्यावर व्याघ्रही गायी सारखा गरीब होतो. विषमयोगाचे प्रकरण उपस्थित झाले नसते तर मल्हारराव महाराज राज्यका रभार चालविण्यास अगदी नालायक आहत अशा अक्षता सर लुईस पेली यांनी त्यांच्या कपाळी थोड्याच दिवसांत लाविल्या असत्या दादाभाई नवरोजीसारख्या पवित्र मनाध्या व मामाणीक आणि परम हिनेच्छु सत्पुरुषास, सर लुईस पेळी आपल्यास अनुकूल आहेत असा भ्रम झाल्याबरोबर जो वाटाण्याच्या अक्षता देण्यास जरा दे- खीळ मागे सरत नाहीं, तो राजा अठरा महिन्यांच्या मुदतीत राज्यकारभारांत सुधार णुक करून आपल्या प्रजेच्या भक्तीस आणि इंग्रजसरकारच्या कृपेस पात्र झाला अ सता, हा लोकांचा पोकळ भ्रम आहे ज्यास महाराजांच्या स्वभावाचा बालबाल अनुभव आहे त्याच्याने असे विचारशून्य मत कर्धीही देववणार नाही. महाराजांस गादीवरून दूर करून नवा राजा निवडण्याचा प्रसंग अपरिहार्य होता आणि तो छां. बणीवर नेला नाही ही गोष्ट फारच उत्तम झाली. कुजलेल्या अवसव चा लोभ धरून त्यास बरें करण्याच्या खटपटीत पडून जीवास हानी करून घेण्याच्या धोक्यांत पड ण्यापेक्षां तो तडकाफडकी कापून टाकून त्यापासून मुक्त होणे हें बरें. आणि त्या दृष्टीने पाहिले असतां लार्ड नार्थ ब्रूक यांनी जे केले ते अगदर्दी वाजवी के. आ णि त्यापासून आज बडोद्याच्या प्रजेस कसा सुदीन माप्त झाला आहे. ही गोष्ट मनांत आणिली म्हणजे लार्ड नार्थ ब्रूक यांनी बडोद्याच्या राष्ट्रावर जे उपकार केले सांबद्दल योग्य स्तुति करण्यास शब्दाचा देखील तोटा पडतो. मल्हारराव महाराज यांस सौ० लक्ष्मीबाईसाहेब यांजपासून पुल झाला होता,. त्याचा गादीवरील हक्क रद्द करण्यांत फार अन्याय झाला असे लोकांचे दुसरे एक ह्मणणे आहे. इंग्रजसरकारांनी तो मुलगा मल्हारराव महाराज यांचा औरस पुल अ-