पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विषप्रयोगाच्या खटल्याबद्दल सारासार विचार. ( ३४३ ) छिद्रे काढण्यास तरी त्यांनी कां अवकाश दिला ? याविषयीं कांही उमज पडत नाहीं. INI एकंदर वरील विचारावर असा कोणी आक्षेप घेऊं शकेल कीं, मल्हारराव महा- राज यांजवर अपराध तर शाबीत होत नाहीं, फक्त कांहीं संशय मात्र राहतो असे तुझी ह्मणतां, आणि संशयाचा फायदा आरोपी यास द्यावा अशी एक न्यायाची पद्धत पडून गेली आहे, त्याप्रमाणे पाहिले असता मल्हारराव महाराज यांस पदच्युत करण्यांत उघड अन्याय झाला असें तुझीं कबूल केलें पाहिजे; तर त्याविषयों उत्तम रीतीनें उत्तर देतां येईल असे वाटतें मल्हारराव महाराज यांच्या व्यक्तीच्या संबं धानें आणि ते बडोद्याचे रजे यासंबंधानें नामदार गवरनर जनरल लार्ड नार्थ ब्रूक पांनी कोणत्याही प्रकारचा अन्याय केला नाहीं, असे विचारांती आपल्यास दिसून येतें. मुकदम्यांतील पुराव्यावरून मल्हारराव महाराज यांजवर ठेविलेले आरोप शार्ब त आहेत, असें लिहून त्यांनी आपल्या लेखणीचा टाक विटाळला इतकीच का यती त्यांची चूक आहे. महाराजांवर निदान संशय तरी राहातो असे त्यांनी सेक्रेट. रो यांस लिहिलेल्या पत्राच्या तेविसाव्या कलमांत लिहिले आहे त्या पलीकडे त्यांनीं जावयाचें नवतें; परंतु शेवट परिणाम महाराजांस निरपराधी ठरविल्याप्रमाणेच झाला. विषप्रयोग करविण्यांत मल्हारराव गायकवाड यांचें अंग होते असे गृहीत करून त्याबद्दल त्यांस कांहीं उपद्रव झाला नाही तेव्हां संशयाचा फायदा त्यांस मिळालाच असे होतें. आतां त्यांस गादीवरून पदच्युत केलें हेच त्यांस शासन केलें असें कोणी ह्मणेल तर ती मोठी चूक होईल. कारण की, जाहीरनाम्यांत पदच्युत करण्याचे कारण त्याची राज्यकारभार चांगलेरी तोनें चालविण्याविषयी नालायकी दर्शविली आहे. त्यांस अपराधी मानून गादीवरून काढावें, असें लार्ड नार्थब्रुक यांच्या मनांत होतें, परंतु न, मदार स्टेट सेक्रेटरी यांनी त्यांजपासून तशी चूक होऊं दिली नाही. आतां काय तो मोठा प्रश्न हा आहे कीं, राज्यकारभार चालविण्यास ते नालायक आहेत असे तर सर रिचर्डमडिव्या कमिशनच्या रिपोर्टावरून शाबीत झाले असतांही त्यांस अठरा महिन्यांची मुदत दिली होती, आणि ती पुरी झाल्यावांचन त्यांस त्याच कारणावरून पदच्युत कसें केलें ? आतां या संबंधाने अगदी निर्मळ मनानें आणि निःपक्षपातानें जर वि. चार केला तर मल्हारराव महाराज यांच्या सत्तेस कांहीं मर्यादा न करितां त्यांस खंडे. राव महाराज यांचे मरणानंतर बडोद्याच्या गादीवर आणून बसविलें, यांतच इंग्रज सर कारच्या अधिकाऱ्यांची मोठी चूक झाली होती, आणि मल्हारराव महाराज यांचा निग्रह करण्याविषयीं आह्मास अधिकार होता असे इंग्रजसरकारांनी कबूल केल्यामु ळे तर मल्हारराव महाराज यांजपासून झालेल्या अनर्थाचे इंग्रजसरकार स्वतःच्या कबुलातीनें विभागी झाले आहेत. आतां त्याबद्दल त्यांस कोणी जबाबदार धरणारा नाही ह्मणून काय झालें. सर रीचर्ड मीडच्या कमिशनच्या रिपोर्टीवर लार्ड नार्थ ब्रुक यांचा ठराव मल्हारराव महाराज यांच्या संबंधाने जसा क्षमापन्न आहे तसा ब डोद्याच्या प्रजेच्या हिताच्या संबंधाने अनुपयुक्त आहे. पंचवीस लक्ष प्रजेचें जीवित,