पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

राहुरकर ( ३४२ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. म्हणजे अगदीं योग्य न्याय झाला असता. बळवंतराव तो काय ? आणि सांस दहा लक्षांची देणगी ती काय? रमजु आणि बुट्टा पहिलवान ते काय! आणि त्यांस लक्षावक्षी रुपयांच्या देणग्या ते काय? अशी अनेक उदाहरणे दाखवितां येतील. गवरनर जनरल यांनीं नामदार स्टेट सेक्रेटरी यांस तारीख २९. एमिल सन १८७५ नंबर ७९१ चे पत्र लिहिलें, त्यांतील बाराव्या कलमांत मल्हार- राव महाराज यांनी राजद्रव्याचा अविनयानें विनियोग केल्याविषयीं लिहिले आहे. गेल्या वर्षाचें सगळें उत्पन्न चौऱ्याण्णव लक्षांचे असून मल्हारराव यांनी एकशें एक हत्तर लक्ष रुपये खर्च केले. त्यांत चाळीस लक्ष रुपये तर त्यांनी आपल्या कृती मंडळीस आणि कसबिणीस देहेनगी देण्यांत खर्च केले. व तीस लक्ष रुपये इ. भारतीकडे खर्च केलें. असा त्या कलमांतील मजकूर आहे. ह्या त्यांच्याच लेखावरू न मल्हारराव महाराज हा पराकाष्ठेचा उधळ्या राजा होता, त्यास पैक्याची मुळींच पर्वा नव्हती हैं शाबीत होते. त्यांनीं नरसू आणि रावजी यांस त्यांच्या एक वर्षा- घ्या पगाराच्या चौपद देणगी दिली यांत तें आश्चर्य कोणते ? आणि अशा देणगी- वरून गायकवाड यांचा रेसिडेन्सीतील नौकर लोकांचा लोभ संपादन करावा असा हेतु नव्हता; परंतु कांहीं महत्वाचे काम करण्याकरितां त्यांस लांच देण्याचा विचार होता, असे गवरनर जनरल यांणीं खातरजमेन ह्मणावें यापेक्षा मोठी चूक ती कोण- ती असावयाची.? त्या दोन राजांस या देणगीच्या संबंधानें कांहीं देखील अपूर्व वा टले नाहीं; तेव्हां अर्थात त्यांच्याच्यानें गवरनर जनरल यांजप्रमाणे भलताच सिद्धांतही करवला नाहीं. अशा रीतीने पाहिले असतां मल्हारराव महाराज यांजवरील आरो- पाचा न्याय करण्याविषयीं त्या दोन राजांची आणि रावराजे दिनकरराव यांची यो-' ग्यता कांहीं कमी नव्हती. त्या तीन युरोपियन कमिशनरांचें कायद्यासंबंधी ज्ञान, पुराव्याची खरी योग्यता समजून त्यापासून अनुमान करण्यामध्ये मोठे प्राविण्य व त्यांची विद्वत्ता, आणि त्या एतद्देशीय कमिशनरांचा देशी राजांच्या दरबारांतील री.. तीभाति आणि राजांचे स्वभाव व समजूत यांविषयीं अनुभव यांचें एकीकरण करून या मुकदम्याचा न्याय केला असतां तर मल्हारराव महाराजांवर विषप्रयोग करण्या विषय फूस दिल्याचा कांहीं संशय राहतो या पलीकडे कांहीं दुसरा अभिप्राय देतां आला नसता. साहा कमिशनरांनी एकत्र बसून या मुकदम्यांसंबंधीं भवति न भवति केली होती असे दिसत नाहीं; व असे का करण्यांत आले नाहीं याविषयीं कांहीं कारण ही समजत नाहीं. न्याय सभेत एकत्र बसून जसा साक्षी पुरावा घेतला त साच त्याबद्दल विचारही एकत्र बसून झाला पाहिजे होता. बरें, साहा कमिशनर एकत्र बसून विचार झाला नाहीं तर नाहीं, पण तीन युरोपियन कमिशनरांप्रमाणें तीन नेटिव्ह कमिशनर एकत्र बसून त्यांनी एकच अभिप्राय कां लिहिला नाहीं ?? मल्हारराव महाराज यांजवर दोष लागू होत नाहीं याविषयीं तर त्यांचे एक मत होते. मृग एकत्र बसून त्याबद्दल विचार करण्यास व एकच अभिप्राय लि- हिण्यास कोणती हरकत होती ? निरनिराळे अभिप्राय लिहून त्यांतून . 5