पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विषप्रयोगाच्या खटल्यावद्दल सारासार विचार. (३४१) का- देशांतील तीन कमिशनरांनी त्यांस अपराधी ठरविलें असते तर युरोपियन अधिका व्यांचा अभिप्राय एका बाजूस ठेऊन देशी कमिशनरांच्या अभिमायाप्रमाणे या मुक दम्याचा शेवट निकाल झाला असता, आणि तसेंच होणे योग्यही होतें. कारण की, युरोपियन लोक किती जरी विद्वान असले व अनुभवाविषय त्यांनी किती जरी डौल घातला तरी आपल्या देशांतील लोकांच्या रीतिभाति आणि त्यांचे स्वभाव याविषय आपल्या लोकांस जी माहिती आणि अनुभव आहे तसा त्यांस नाहीं. ते किती झा ढे तरी परदेशस्थ लोक. त्यांतून त्यांस आपल्या लोकांत मिश्र होऊन त्यांजबरोबर द.. ळणवळ ठेवण्याचा परकाष्ठेचा कंटाळा. त्यांनी आह्मांस हिंदुस्थानवासी लोकांच्या रीतिभाति आणि स्वभाव माहीत आहेत आणि ह्मणून आझी त्यांचा न्याय करण्यास जास्त योग्य आहोत असे ह्मणावें यांत कांहीं अर्थ नाहीं. जवाहोरखान्यांतून हिरे घे- ण्यापेक्षा जव्हेरी याजकडून नवे हिरे खरेदी करणे ज्यास्त सुरक्षित होते असा एकम त झालेल्या तीन युरोपियन कमिशनरांनी बेलाशक अभिप्राय दिला; पण वास्तविक झटले झणजे पाबद्दल अभिमाय द्यावयाचा तो राजे लोकांनींच द्यावा. रण त्यांचा जवाहीरखाना असतो व त्यांत लक्षावधि रुपयांचे जवाहीर असते, आणि त्यांतील जवाहिरांचा गुप्त रीतीने उपयोग करायाचा असला तर तो कसा करावा या- विषय त्यांस माहिती असते, तशी युरोपियन कमिशनरांस होती कां ? अगदी नाहीं. जमनाबाई साहेब मसूत होऊन पुत्र झाला असता जवाहिरांत केलेल्या अव्यव स्थेचा ठिकाण लागू नये यास्तव मल्हारराव महाराज यांनी जवाहीरखान्याच्या हिशेबांत पराकाष्ठेचा घोटाळा बुद्धि पुरःसर केला होता असे ह्मणण्यांत आहे. आणि राजा सर. टी. माधवराव साहेब यांनी दागीन्याचे फोटोग्राफ घेऊन व एक कमेटी नेमून जशी व्यवस्था केली आहे तशी काही पूर्वीची व्यवस्था नव्हती कीं त्याबद्दल दफ्त रीं दाखला ठेविल्याषांचून एक हिरकणी देखील राजास घेतां आली नसती. न समजूं देतां मल्हारराव महाराज यांस पाहिजेल तितके हिरे जवाहीरखान्यांतून घेता आले असते, आणि त्याबद्दलचा कधींही मागमूस लागला नसता. रेसिडेन्सींतील नौकर लोकांस मल्हारराव महाराज यांजकडून जी देणगी मिळाली ती युरोपियन कमिशनर यांनीं व गवरनर जनरल यांनीं लांच ह्मणून कल्पिली आहे. गवरनर जनरल म्हणतात की या देणग्या त्या नौकरांच्या स्थितीशीं तोळून पाहि- ल्या असतां फारच मोठ्या होत्या. उदाहरणार्थ, रावजीस दिलेली फक्त एक देण- गी त्याच्या वर्षाच्या पगाराच्या चौपट होती. पण महाराज शिंदे अलिजा बाहादर- आणि जयपूरचे महाराज यांस याबद्दल कांहींच नवल वाटले नाहीं. त्यांनी बेधडक असा अभिप्राय दिला कीं, अशा देणग्या नेटिवराजांच्या दरबारांतून देण्याची चाळ आहे. ही त्यांनी आपल्या अनुभवांतील गोष्ट सांगितली. गवरनर जनरल, मल्हार. राव महाराज यांची देणगी नौकर लोकांच्या स्थीतीशीं तोखून पाहतात; आणि तसे फरण्यांतच मोठी चूक झाली आहे. मल्हारराव महाराज यांच्या देणगीची तुलना त्यांनी खुद्द मल्हारराव महाराज यांच्या स्थीतीशीं तोळून पहावयाची होती. त्याच प्रमाणे