पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३४०) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. कलमाच्या शेवटी असे लिहिले आहे की, हिंदुस्थान सरकारास असे झणण्यास कांहीं. च हरकत दिसत नाहीं कीं, सालम व यशवंतराव यांची साक्ष देऊन त्यांचे कडून खरी हकीकत सांगविण्याचें व रावजी, नरसू आणि इतर लोक यांस गोंधळून टा. कविण्याचे गायकवाड तर्फेच्या लोकांनी नाकबूल केले ही गोष्ट गायकवाडांवर आ 'छेले आरोप खरे व संभवनीय आहेत असे दाखवितें. या ह्मणण्यावर उत्तर देणे फार कठीण आहे. साळम आणि यशवंतराव हे पोलिसच्या पाहयांत नवते आणि गायकवाडांविरुद्ध केलेल्या बेतांत लष्करी लोकही सामील होते असे ह्मणणे कठीण आहे. महाराजांच्या सालिसिटरांस रावजी आणि साळम यांची गुप्त भेट घेण्याची सवड मिळाली असून व त्यांनी त्यांच्या भेटी घेतल्या असून त्यांस कोर्टापुढे साक्षी देण्याकरितां आणण्याचा मांस हिय्या झाला नाही. यामुळे त्यापासून असे दृढ अनुमान निघाले की, त्यांच्या साक्षी दिल्या असतां महाराजांचा सुरक्षितपणा जास्त धोक्यांत पढेल, असे महाराजांच्या तर्फे खटला चालविणारांस भय वाटले होतें. सारांश - मल्हारराव महाराज यांजवर विषप्रयोग करण्याची फूस दिल्याबद्दल जो आरोप ठेविला होता, तो शाबीत करण्यास या मुकदम्यांतीळ पुरावा अगदर्दी कच्चा होता. तशा पुराव्यावरून एखाद्या भामट्यास देखील अपराधी ठरवितां येणार नाही असे सारजंट बालंटाइन यांनी आपल्या भाषणाचे शेवटी सांगितले आहे ते अगदी बरोबर अहो, परंतु त्याबद्दल मल्हारराव महाराज यांजवर अगदी संशय देखील घेता येणार नाही असे झणणे फारच कठीण आहे. त्या हतभाग्य राजाच्या भोवतालच्या मंडळीने क र्मळ फेर यांजपासून त्यांची सुटका करण्यासाठीं कांहीं कारस्थान करून शेवटीं तें महाराजांवर लोट असो अथवा महाराजांच्या शत्रूचे कांही कारस्थान असो, पण महाराजांच्या कपाळी हा कलंक लागला आणि तो सर्वांशीं पुसून टाकणे शक्य झाले नाही ही गोष्ट निर्विवाद आहे. नीच मनुष्यांनी खोट्या साक्षी व बनावटी पु रावा देऊन पुष्कळ लोक सुळावर चढविल्याची अनेक उदाहरणें आहेत आणि त्या पैकींच हेंही एक अघोर कृत्य नसेल असे कोणी ह्मणावें ? परंतु जोपर्यंत महाराजांवर हे सर्व तुफान घेत होतें आणि अमुक रीतीनें त्याबद्दल कारस्थानें झाली होतीं असें स्पष्ट होणार नाही तोपर्यंत ही गोष्ट तशीच संदिग्ध राहणार, आणि इंग्रजसरकार या मुकदम्याचे फिर्यादी आणि न्यायाधिश असल्यामुळे खरोखर ते कांही कार- स्थान असले तर तें कधींही बाहेर फुटून येण्याचा मुळींच संभव नाहीं. या कमिशनांतील दोन राजे आणि तिसरे एक मोठें नामांकित मुत्सद्दी यांचे अ भिप्राय मल्हारराव महाराज यांजवर ठेविलेले आरोप शाबीत नाहींत असे आहेत. यांची किंमत जी खरोखर असावयाची ती आहे. त्यांस इंग्रजी कायद्याचें ज्ञान नाहीं व राजे लोक अशा कामास लायक नसतात असे ह्मणणारे खुशाल ह्मणोत. यांनीं मल्हारराव महाराज यांस जर अपराधी ठरविलें असतें तर त्यास मोठे शहाणे आणि अनुभवी बनवून ठेविलें असतें. फार तर काय पण एकमत झालेल्या तीन युरोपियन अधिकायांनी मल्हारराव महाराज यांस निरपराधी ठरविलें असतें आणि आपल्या