पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विषप्रयोगाच्या खटल्याबद्दल सारासार विचार. ( ३३९ ) चार किंवा पांच दिवस अगोदर मिळाली. सारजंट बालंटाइन यांचे भाषण चाळूं अस. तांहा कुपीचा विषय निघाला तेव्हां कमिशनचे अध्यक्ष सर रिचर्ड कौच साहेब देखील म्हणालें कीं, कुपी दिल्याचे काळाविषय रावजी आणि नरसू यांच्या सांग- ण्यांत तफावत आहे, पण त्यापासून महाराजांस कांहींच फायदा झाला नाहीं. नेटिक लोक यांस तारखांचें बरोबर स्मरण नसते असा दोष काढून त्या विरोधाचा परिहार केला, आणि सर्व विरोधांचा अशीच काहीं कारणे सांगून निरवाहा केला आहे. अ मुक एक विरोध आहे परंतु तो महत्वाचा नाही असे जसें एकास ह्मणतां येतें तसाच तो विरोध फार महत्वाचा आहे असे दुसऱ्यासही ह्मणतां येतें व त्याबद्दलची कारणे ही सांगता येतात. पट्टयांतून निघालेल्या सोमलाच्या पुडीविषयी सर्व लोकांचा असा काहीं दृढ समज आहे की, प्रत्यक्ष सत्य हातांत गीता घेऊन जर अशी साक्ष दे- ईछ कीं, यांत पोलिसाचें कांही कारस्थान नाहीं तरी देखील लोक ती साक्ष खरी- मानतील किंवा नाही याविषयी संशय वाटतों; पण तीन कमिशनर आणि गवरनर जनरल यांच्या मनांत कारस्थानाविषयी संशय देखील येत नाहीं अशी भिन्न भिन्न समजूत आहे: , आतां सारजंट बालंटाइन यांनी महाराजांच्या तर्फे कांहीं पुरावा दिला नाहीं हो गोष्ट चांगली केली नाही. सालम, यशवंतराव, नुरुद्दीन बोहरी, आणि दुसरे लोक यांची एकांतांत भेट घेण्याविषयीं महाराजांच्या सालिसिटरास परवानगी होती, आणि त्यांनी त्या लोकांच्या भेटी देखील घेतल्या होत्या असे असता त्या लोकांस महारा. जांच्या तर्फे साक्षीकरितां कोर्टापुढे आणण्यास सारनंट बालंटाइन मांगें कां सरले याविषयीं कांही कल्पनाच करितां येत नाही. महाराज यांजवर ठेविलेले आरोप शाबीत करण्यास जसा पुरावा पाहिजे तसा नाही अशी त्या विद्वान शिरोमणीची खातरजमा होती, आणि ती खरी होती; परंतु महाराजांवर ठेविलेल्या आरोपाविषयीं अगदी सं- शय निवृत्ति झाली पाहिजे होती हे मुख्य धोरण होतें, आणि त्यासाठी महाराजांच्या तर्फे पुरावा झाला पाहिजे होता है अंगदीं अवश्य होतें. सारजंट वालंटाइन यांनी पुराव्यांतील प्रत्येक मुद्याचे खंडन केले आहे यांत संशय नहीं; लक्ष रुपये रोख आणि शिवाय जाता येताचा खर्च देणे ही रक्कम त्यांच्या योग्यते पलिकडे होती असें नाहीं, परंतु त्यातील काही मुद्दे असे जबर होते कीं, याविषयींचे उत्तम रीतीचे खंडन करण्यास त्यांस देखील मोठें जड गेले परंतु कर्मल फेर हे महाराजांचा पराकाष्ठेचा द्वेष करीत होते आणि बुद्धिपुरःसर छळ करण्याचे हेतूने त्यांच्या राज्यकारभारात त्यांनी अडथळे आणिले होते, हा पुरावा सहज देतां आला असता. दादाभाई नवरोजी वगैरे खरे साक्ष देण्यास मागें सरले नसते, परंतु महाराजांच्या तर्फे आपल्यास काही पुरावा देण्याची गरज नाही असा सारजंट बालटाइन यांनी कृतसंकल्पच केला होता, आणि तो त्यांनी शेवटास नेऊन महाराजांवरील संशयांस अमळ बळकटी आणिली. महाराजांच्यातर्फे पुरावा न दिल्यामुळे गवरनर जनरल यांस महाराजांवर दोष लागू करण्यांस एक मोठे कारण सांपडले. त्यांनी अपल्या ठरावांतील चौतिसाव्या 3 ४०