पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३३८ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास- दळणवळण ठेविल्यासून आपल्याविषयी त्यांच्या मनांत काय येईल कोण जाणे यावि. षय महाराज यांच्या मनांत शंका उत्पन्न होणे हें स्वाभाविक होते. आतां तारीख ९ रोजीं विषप्रयोग झाला असता त्याबद्दलची यादी तारीख १४ रोजी इतक्या उ शिराने लिहिली ही मोठी चूक झाली; पण यांत महाराजांचा कांहीं दोष नाही. या बदचा सर्व दोष दादाभाई नवरोजी आणि त्यांचे सोबती यांचा आहे. यादी कशी लिहेली पाहिजे होती आणि केव्ह पठविली पाहिजे होती है काम त्यांचें होतें. वि- षप्रयोगाच्या संबंधानें तारीख १४ रोजी जी यादी लिहिली ती निदान तारीख १२ रोजी महाराज कर्नल फेर यांस भेटले त्या दिवशी तरी लिहावयाची होती. या का. मांत फार ढील झाली आणि त्यामुळे एकमत झालेल्या कमिशनरांस दोष काढण्यास जागा झाली ते चांगले झाले नाहा; आणि हा दादाभाई यांच्या अननुभवाचा परिणाम होय. त्याचप्रमाणे जी यादी लिहिली ती देखील जशी लिहिली पाहिजे होती तशी नाही. लिहिलेल्या यादींतील भावार्थ असा आहे कीं, आपली व माझी परवांचे दिवशीं भेट झाली तेव्हां आपल्यापासून मला, आपल्यास कोणी वाईट मनुष्यानें विषप्रयोग कर ण्याचा प्रयत्न केल्याबद्दलची विशेष हकीकत समजली त्याबद्दल मला फार वाईट वाटतें, परंतु त्याचा दुष्ट बेत सिद्धीस गेला नाहीं ही ईश्वराची कृपा झाली. ह्या गु. न्ह्याचा पत्ता लावण्याकरितां माझे मदतीची गरज लागेल तर ती देण्यांत येईल हें आपल्यास कळावयास लिहिले आहे. आतां या यादींत निर्ममत्व दर्शक शब्द ते कोणते आणि यापेक्षा जास्त तें काय लिहिले पाहिजे होते; असे कोणी विचारूं लागला तर त्याबद्दल उत्तर देणारास बरेंच जड जाईल. कारण त्या यादीत " त्याब इल मला फार वाईट वाटतें "" तो दुष्टबेत सिद्धीस गेला नाही ही ईश्वराची कृपा झाली " ही वाक्यें ममत्वदर्शक आहेत; परंतु सामान्य प्रकारचं दुःख झाले असतां ज्याप्रमाणे लिहिण्याची पद्धत आहे त्या पद्धतीने ती यादी लिहिली आहे. विषमयो. गासारख्या अघोर कृत्यापासून कर्नल फेर सुरक्षित राहिले त्या कृत्यास शोभेल अस त्या यादीचा लेख नाहीं. त्यांत " मदत देण्यांत येईल " असे वाक्य आहे ते अग दी उदासीनपणासारखे आहे त्याबद्दल जास्त कळकळीने लिहून आपण सहाय्य क रण्यास पराकष्टेचें उत्सुक आहोत असे दर्शविले पाहिजे होते यांत कांहीं संशय नाही 66 · ज्या मुकदम्याविषयीं महा पंडितानीं विचार केला आहे त्या मुकदम्यांतील पुरा.. व्यावर जास्त चर्चा करणे उगीच पोकळ पांडित्य केल्यासारखे होईल. सबब इतकें ह्मणणे बस्स आहे कीं, मल्हारराव महाराज यांजवर विषप्रयोग करण्याविषयीं फूस दिल्याचा आरोप शाबीत करण्यास जसा निष्कलंक पुरावा पाहिजे तसा हा पुरावा नाहीं आणि ही गोष्ट ज्यांनी मल्हारराव महाराज यांस अपराधी ठरविलें आहे त्यांनी देखील कोठें स्पष्ट आणि कोठें गर्भित रीतीनें कबूल केली आहे. विषाची कुपी रावजीस केव्हां मिळाली याविषयीं रावजी आणि नरसू यांच्या ह्मणण्यांत पराकाष्ठेचा विरोध आहे. रावजी ह्मणतो कर्नल फेर यांच्या कपाळावर गळं झाले तेव्हा ती कुपी मला मिळाली आणि नरसू ह्मणतो की, कर्नल फेर यांस शेवटचा विषप्रयोग झाला त्यापूर्वी