पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विषप्रयोगाच्या खटल्याबद्दल सारासार विचार. ( ३३७ ) तर ठरविलेंच ! तेव्हां सोमलाची खरेदी झाल्याविषयीं पुरावा झाला नाहीं त्याबद्दल गायकवाडांस फायदा द्यावा हें बरें असें जें गवरनर जनरल यांनी म्हटले आहे त्या प्रमाणे गायकवाडांस यापुढें फायदा मिळावयाचा आहे की काय? आणि जर मिळा- वयाचा आहे तर तो कोणता आणि कशा प्रकारचा ? या एकमत झालेल्या कमिशनरांनीं दुसरा एक दोष मल्हारराव महाराज यांजवर स्थापित करून त्यांजवरील आरोपास बळफटी आणिली आहे. ते झणतात कीं, विषप्रयोग झाल्यानंतरचें महाराजांचें वर्तन निरपराधी मनुष्याप्रमाणे नव्हतें. ह्मणण्यास त्यांनी अशी कारणे दाखविला आहेत कीं, कर्नल फेर यांस तारीख ९ रोजी विषप्रयोग झाला, आणि दामोदरपंत याच्या साक्षीवरून ही बातमी महाराज यांस लागलीच कळली होती असे दिसतें. सालम त्या दिवशी प्रातःकाळी रोसडेंसी त होता आणि त्यास रावजीनें विषप्रयोग केला ह्मणून सांगितलें होतें. तो मजकूर सा- लम यानें गायकवाडांस सांगतलाच असेल. महाराज यांस सालम याने त्याच दि. वशीं ही गोष्ट कळविली नाहीं अशी जरी कल्पना केली तरी क्यांप आणि शहर यांमध्ये एक मैलाचें देखील अंतर नाहीं, तेव्हां तारीख ९ रोजीं अस्तमानीं तरी गायकवाड यांस ही बातमी कळलीच पाहिजे. बातमी कळल्या बरोबर गायकवाड यांनी कर्नल फेर यांजकडे धांवत जावयाचें होतें व त्यांजविषयीं आपली काळजी दाखवावयाची होती आणि आपल्या राजधानीत असे अघोर कर्म करणाराविषयीं आपला क्रोध दाखवावयाचा होता, त्याप्रमाणे त्यांनी काहीएक केले नाही. तारीख १२ नोवेंबर रोजी ते कर्नल फेर यांच्या भेटीस गेले आणि विषप्रयोगाचा प्रकार का ल मला समजला ह्मणून ह्मणाले आणि तारीख १४ नोवेंबर रोजी त्याबद्दल एक मम त्वरहीत शिष्टाचाराची यादी पाठविली. अशा प्रकारच्या वर्तणुकीवरून विषप्रयोग करविण्यांत महाराजांची फूस होती याखेरीज दुसरी कल्पना करूं शकवणार नाहीं. आणि ह्मणून गायकवाड यांचा अपराधाविषयीं नकार विश्वास ठेवण्यास अपात्र आहे असे ह्मणणे आह्मास भाग पडले आहे. तारीख ९ रोजी विषप्रयोगाचा प्रयत्न झाला असतां तारीख ११ पर्यंत महारा जांस समजला नाही ही गोष्ट आश्चर्याची आहे, यांत संशय नाहीं. कर्नल फेरवि षयीं महाराजांनी करुणा दाखवावी असें कर्नल फेर यांचे मुळींच वर्तन नव्हते. क र्नल फेर यांच्या मनांत महाराजांविषयीं कोठें करुणा होती तर त्यांजविषयों महाराजां- च्या मनांत करुणा असावी. परंतु विषप्रयोगांत आपलें अंग नांहीं अशी शुद्ध मना- ची महाराजांची वर्तणुक असली पाहिजे होती, पण तशी त्यांची नव्हती यास प्रमाण काय ? कर्नल फेरविषयीं त्यांनी फार कळवळा दाखविला असता व वारंवार त्यांच्या बंगल्यास जाऊन त्यांच्या तबियतीविषयीं चौकशी केली असती तर तिकडूनही असे झटलें असतें कीं, आपला दोष छपविण्याकरितां महाराज हे वाजवीपेक्षा जास्त कळ- वळा दाखवीत होते. कर्नल फेर यांचा आपल्यावर मोठा कटाक्ष आहे हे महाराजां- स माहीत होते आणि विषप्रयोगाचा प्रयत्न झाल्यावर नेहमींच्या सांप्रदायापेक्षा जास्त