पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३३६) महारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. तिजवर विश्वास ठेवण्यास मोठा विचार पडला असता. कारण की, त्याचा महारा. जांनी फार छळ केला होता त्याच्या मेव्हण्यास अपराधावांचून फटक्याचा मार दिला होता व त्याजपासून पांच हजार रुपये दंड घेतला होता. तो सूड उगविण्याकरितां तो खोटी साक्ष देत आहे असा संशय उप्तन्न झाला असता, व अशा कट्टया दु. घ्मनापासून सोमल मागविण्याची कशी छाती झाली ही एक मोठी शंका उप्तन्न झाली असती. अशी स्थिती असता त्या प्रामाणीक मनुष्यानें आपला इमानीपणा राखला. आणि गजानन विट्टल यानें जेव्हां दामोदरपंताशी त्याचा मुकाबला करवून त्याजकडून त्यांचे मन वळविण्याचा यत्न केला तेव्हां तो प्रामाणीक बोहरी दामोदर- पंत याच्या तोंडावर थुंकला आणि त्याने त्याची पराकाष्ठेची निर्भर्त्सना केली. ही हकीकत नुरुद्दीन यानें नामदार गवरनर जनरल यांजकडे अर्जी केळी त्यांत त्यानें लिहिली आहे. दामोदर्पत यानें नुरुदीन याजपासून सोमल खरेदी घेतल्या बद्दलचा पुरावा देणें महत्वाचें असते तर नुरुद्दीन यास साक्ष देण्याकरितां कोर्टात आणिला असता असे गवरनर जनरल यांच्या ह्मणण्यांत आहे. जर त्याचा पुरावा महत्वा चा नव्हता तर त्यास साक्ष देण्याकरितां पोलिसांनी कशासाठी कैदेत ठेविला होता! व त्याने महाराजांविरूद्ध साक्ष द्यावी असे त्याचें मन वळविण्याचा प्रयत्न कशासाठी केला? पराकाष्ठेचा प्रयत्न केला असतां ही त्याने महाराजांविरुद्ध साक्ष दिली नाही हा महारा- जांच्या निरपराधीपणाचा एक मोठा पुरावा आहे. सारजंट बालंटाइन यांनी महा. राजांतर्फे साक्ष देण्यास त्यास कां आणिले नाही त्याचे कारण त्यांनी सांगितले आहे. पोलिसच्या ताब्यांतील लोकांविषयीं त्यांस अगदी भरवसा नव्हता. आपल्यातर्फे ह्मणून पोलीसच्या ताब्यांतील कोणी साक्षीदार बोलाविला आणि त्याने आपल्याविरुद्ध साक्ष दिली तर मोठी अडचण पडेल असे त्यांस वाटल्यामुळे ते महाराजांचे तर्फे पुरावा देण्यास मागें सरलें असे दिसतें. परंतु नुरुदीन यास कोटीपुढे आणून महाराजांच्या तर्फे त्याजकडून साक्ष देवविण्यापासून जो परिणाम झाला असता तोच परिणाम व्यास फिर्यादीतर्फे साक्ष देण्यासाठी आणिला नाही यापासून झाला पाहिजे होता. म्हणजे महाराजांच्या विरुद्ध सोमलाच्या संबंधाची सर्व गोष्ट खोटी अहे असा निर्णय झाला पा हिजे होता. कारण महाराजाच्याविरुद्ध त्याची साक्ष देण्याविषयी फिर्यादीचें धैर्य झालें नाहीं यावरून तो साक्षीदार महाराजांच्या अनुकूलतेचा होता आणि त्याच्या साक्षीवरून आपला खटला बुडेल असें फिर्यादी यांस मय वाटल्यावरून त्यानी त्यास साक्षी करितां आणिलें नाहीं, हे अगदी दृढ अनुमान आहे. नुरुद्दीन याची साक्ष झाली नाहीं त्यापेक्षां सोमलाची खरेदी झाली नाही असे मानून त्याबद्दल गायकवाड स फायदा द्यावा हें बरें असे गवरनर जनरल यांच्या ठरावांत वाक्य आहे. यावरून दे- खील महाराजांवर अपराध लागू होण्यास सोमलाच्या खरेदीविषयीं पुरावा झाला पाहिजे होता. हें अगदीं अवश्य होते असे सिद्ध होतें. आणि त्याप्रमाणे खरेदीचा पुरावा तर झाला नाहीं, तेव्हां गवरनर जनरल यांच्या ह्मणण्याप्रमाणे गायकवाडांस फायदा तर मिळाला पाहिजे आणितो तर कांहींच मिळाला नाही. त्यांनी त्यांस अपराधी