पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विषप्रयोगाच्या खटल्याबद्दल सारासार विचार. ( ३३५ ) " यासंबंधानें एकमत झालेल्या कमिशनरांचे मत कांहींस चमत्कारिक आहे. त्यांनी आपल्या अभिमायांतील आठेचाळिसावे कलमांत याबद्दल विचार केला आहे* दा. मोदरपंत यानें नुरुद्दीन बोहरी याजपासून सोमल मिळविल्याबद्दल काहीं देखीळ पुरावा नाही असे ते ह्मणतात. त्यांच्या लेखांतील "काहीं देखील पुरावा नाहीं " हें शब्द त्यांच्या मोकळ्या मनाचें प्रदर्शन करितात; परंतु त्यांचें ह्मणणे असे आहे की, दामोपंत यांचे जबानोवरून आणि त्याने फौजदारींत सोमलाबद्दल चिठ्ठी लिहिली होती त्यावरून गायकवाडांनीं सोमालाची इच्छा केली होती है शाबीत होतें. आणि दामोदरपंत यानें तो सांगतो त्या मार्गाने वीष मिळविले ही गोष्टही चांगली संभव- नीय दिसते; आणखी शेवटी ते असेंही ह्मणतात कीं, कर्नल फेर यांच्या सरबतांत रावजी यानें जो सोमल कालावेला तो नुरुद्दीन बोहरी याजपासून दामोदरपंत सोमल मिळविला ह्मणून ह्मणतो तोच असे मान्य करण्यास अह्मी सिद्ध नाहीं कारण दामोदरपंत याच्या झणण्यास पुष्टी देणारा पुरावा नाहीं. कर्नल फेर यांचा प्राणनाश करण्यासाठी ज्या सोमलाचा उपयोग केला तो सालम याज- पासून प्राप्त झाला असे नरसू व रावजी यांचे पुराव्यांवरून शाबीत आहे, आणि दामोदरपंत यानें सालम यांस सोमल दिला त्याचाच विषप्रयोग करण्यांत उपयोग केला हें विशेष संभवनीय आहे असे ही कमिशनरांचे म्हणणे आहे. याप्रमाणे सो मलाचे संबंधाने त्यांचे मत धरसोडीचें आहे. ह्या मुकदम्यांत सोमल ही वस्तु मु- ख्य मुद्याची आहे. कर्नल फेर यांच्या सरबतांत सोमल सांपडला नाहीं अशासा दोन तत्ववेत्यांनी (डाक्टर सीवर्ड आणि ग्रे) साक्षी दिल्या असत्या तर या मुकदम्यांतील दुसरा सर्व पुरावा अविश्वसनीय झाला असता, मग तो किती ही बळकट असो असे मला वाटतें. एकमत झालेल्या कमिशनरांच्या मताविरुद्ध अभिप्राय देणारास असें सहज ह्मणतां येईल कीं, दामोदरपंत यांस सोमलाची प्राप्ति झाली होती किंवा नाहीं ही गोष्ट मुख्य मुद्याची आहे आणि ज्यापेक्षां तो बेअब्रूचा मनुष्य आणि गु. न्ह्याचा साथी आहे, आणि त्यास सोमल मिळाल्याबद्दल कांहीं एक पुरावा नाही. त्यापेक्षां सोमळाचे संबंधाने सगळीच इमारत अगदी पायापासून ढासळून पडते. आतां तसे मत देणारास कोणी असे विचारील कीं, सरबतांत सोमल निघाला अशा तत्ववेत्यांनी साक्षी दिल्या आहेत, आणि नरसू व रावजी यांचा ही पुरावा झाला आहे त्याविषयीं तुम्ही काय ह्मणाला ? तर तो सारजंट बालंटाईन सारखे खाडकन उत्तर देईल कीं, या मुकदम्यांत कोणी कांहीं कपट केले असे मानूं नये; परंतु तसे करण्याची या जगांत तिळमात्र देखील अडचण ह्मणून नाहीं, आणि या मुकदम्यांत आरंभापासून शेवटपर्यंत अशी कोणती गोष्ट आहे कीं, ती संभवनीय किंवा असं भवनीय नाहीं? नुरुद्दीन बोहरी यानें महाराजांच्या विरुद्ध साक्ष दिली असती तरी देखील had been material, and as he is not called, the Gaekwar is entitled to the benefit of the observation that the purchase has not been proved. Beyond that the non-produc. tion of Nuradin Borah dose not affect the case, ( See Blue Book No. 5 Page 40.) पहा ब्ल्यू बुक नंबर ५ पान १९.