पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३३४ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. आणि नरसू यांनी विषप्रयोग करण्याच्या कर्माचा अंगिकार केला. तेव्हां आतां आ पण कोणत्या मतास वजन द्यावें, हा येथें विचार कर्तव्य आहे. पेशव्याच्या दरबारां- तील बातमी मिळविणे ही क्षुद्र गोष्ट देखील नेटिव लोक अगोदर हातांत पैसा पडल्यावांचून करणार नाहीत असे ढयुकआफू वेलिंगटन यांचें ह्मणणें असून त्यांची योग्यता, विद्वत्ता, शहाणपण, शौर्य आणि अनुभव किती मोठा होता है सर्व जगास माहीत आहे. ह्या अर्वाचीन काळांत मुत्सद्दीपणा आणि शौर्य यांच्या योगानें विख्या- तीस आलेल्या महापुरुषांत यांची गणना आहे. त्यांच्या योग्यतेकडे आणि कार्या. च्या महत्वाकडे लक्ष दिले झणजे एकमत झालेल्या कमिशनरांचा या कामांत फार दुराग्रह दिसतो. नुख्या कांहीं क्षुद्र बातम्या देण्यांत देखील नरसू आणि रावजी यांनी पैसा उपटला मग तो लग्नाच्या निमित्तानें असो अगर दंणगीबद्दल असो किंवा बातमी देण्याबद्दल लांच ह्मणून असो, (येथेंच डयूक आफ वेलिंगटन यांच्या अ. नुभवाचा ताळा मिळतो.) त्याच लोकांनी फक्त वचनावर विश्वास ठेऊन अतिशय भयंकर काम करण्याचा पतकर घेतला ही गोष्ट, ज्या कांहीं अतिशय असंभवनीय गोष्टी या मुकदम्यांत आहेत त्यांपैकीच एक आहे. • आतां सोमलाच्या प्राप्तीविषय देखीळ तसाच मोठा संशय आहे. फौजदारीच्या कारकुनाच्या साक्षीवरून फौजदारीतून सोमल मिळण्यास काही हरकत नसता, म हाराजांचा कट्टा दुष्मान नुरुद्दीन बोहरी याजपासून सोमल मागविण्याची जरूर कां पडली ? या शंकेचा कोणीही उलगडा करीत नाही. तसेच नुरुद्दीन बोहरी याज- पासून जर खरोखर दामोदरपंत यास सोमल मिळाला असता तर नुरुद्दीन यानें त्याबद्दल बेलाशक साक्ष दिली असती पण ज्यापेक्षा त्यास कोर्टापुढे साक्ष देण्यास आणिलें नाहीं त्यापेक्षा तो साक्ष देण्यास सिद्ध नव्हता, हे स्पष्ट होते. आणि यावरून दामोदरपंत यास सोमलच मिळाला नाहीं ही गोष्ट निर्विवाद सिद्ध असतां कर्नल फेर यांच्या सरबतांत जो सोमल निघाला तो दरपंत यानें दिलेला सोमल असे जें सिद्ध करण्यांत येतें त्यास प्रमाण काय ? दामेदरपंत याची साक्ष खरी पटण्याकरि. तां नुरुद्दीन बोहरी याची साक्ष पटलीच पाहिजे होती. नामदार गवरनर जनरल सा हेब यांनी आपल्या ठरावाच्या पंचेचाळिसाव्या कलमांत याबद्दल विचार केला आहे. ते ह्मणतात कीं, नुरुद्दीन बोहरी याजपासून दामोदरपंत यानें सोमल खरेदी घेतला ही गोष्ट दुसऱ्या पुराव्यावरून शाबीत झाली नाहीं. दामोदरपंत यानें नुरुद्दीन याजपा- सन सोमल खरेदी घेतल्याबद्दलचा पुरावा महत्वाचा असता तर नुरुद्दीन बोहरी याजला साक्षी देण्याकरितां आणिला असता, परंतु ज्यापेक्षा तसें केले नाहीं त्यापेक्षां सोमलाची खरेदी झाली नाहीं असे मानून त्याबद्दल गायकवाडांस फायदा द्यावा हें बरें परंतु या पलीकडे नुरुद्दीन याची साक्ष न घेतल्याने या खटल्यास कांहीं बाघ येत नाहीं. *

  • “ His assertion that he purchased arsemi of Nurudin Borah is not sustained by

any other evidence. Nurudin Borah should have been called upon to prove it if that