पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विषप्रयोगाच्या खटल्यावद्दल सारासार विचार. (३३३). कां ठेऊं नये! ही एकमत झालेल्या कमिशनरांची कल्पना फारच आपात रमणीय आहे. * परंतु त्यास एक विरोध आहे आणि तो असा तसा सामान्य नाहीं. विषप्रयोगाचा परिणाम तात्काळ क हीं होणार नाही, क्रमाने हळुहळु लागू होऊन तीन चार महिन्यांनी इच्छित हेतु शेवटास जाईल, असे महाराजांनी रावजी व नरसू यांस सांगितल्याव- रूम त्यांनीं तें कर्म करण्याचा पतकर घेतला, आणि रावजी यानें त्याबद्दल फार सा. वधगिरी ठेविली. जी वस्तु त्यास विशेष घातक वाटली ती सर्वत्याने उपयोगास आ मिली नाही, यास पट्टयांतून निघालेली विषाची पुढी हे प्रमाण दाखविलें आहे. व एक कुपीतील प्रवाही पदार्थ घातक वाटला तो त्याने फेंकूनही दिला होता, अशी सांगितली आहे. तर मग तारीख ९ नवंबरच्या पूर्वी दोनचार दिवस अगोदर रावजी आणि नरसू यांची महाराजांनी भेट घेऊन त्यांनी काही केले नाही ह्मणून त्यास लच्या झटले व आणखी एक जबर रानटी शिवी दिली. आणि रावजीने उत्तर दिलें कीं, तुमच्या औषधींत ( दवा ) काही सामर्थ्य नाहीं त्यास मी काय करावें ? तेव्हां महाराजांनीं दुसरें विष देतो असे सांगितलें, आणि त्याप्रमाणे विषाची पुडी रावजीकडे नरसच्या द्वारे पाठविली. आणि तींतील सर्व वीष त्यानें सरबतांत काळ विले अशी हकीकत सांगण्यांत आली आहे तिची विल्हेवाट काय ? तात्काळ कांहीं एक होणार नाहीं. क्रमानें व हळुहळु त्या विषाचा परिणाम तीन चार महिन्यांनीं होईल असे रावजी व नरसू यांच्या मनांत भरवून देऊन त्यांस तें अवोर कृत्य करण्यास प्रवृत्त केल्यावर तात्काळ त्याचा परिणाम न झाल्याबद्दल त्यास महाराजांनीं टपका दिला कसा? व तो त्यांनी ऐकून घेऊन महाराजांनी दिलेल्या विषांत तसा गुण नाहीं त्यास मी काय करावे असे रावजीने उत्तर दिले कसे ? व महाराजांच्या मनांत तात्काळ परिणाम व्हावा असे होते आणि त्यांनी आपल्यास कालांतराने परिणाम होईल अशी उगीच मुलधाप दिली होती असे महाराजांच्या बोलण्यावरून स्पष्ट झाले असता पुनः रावजी सरबतांत वीष काळविण्यास तयार झाला कसा ? याविषयीं विचार करूं लाग. लों ह्मणजे काहीं अक्कल काम करीत नाही आणि असंभवनीयतेच पर्वत बुद्धीचे आड येऊन उभे राहतात. ड्यूक आफ वेडिंगटन यांनी पेशव्याच्या दरबारांतील रेसिडेंट क्लोज यांस प लिहिले आहे; त्यांतील कांहीं बेंचे या ग्रंथाच्या २८३-८४ पानांच्या टीपेंत लिहिले आहेत. त्यांतील भावार्थ असा आहे कीं, लांच दिल्यावांचून तुझी फक्त वचन देऊन पेशव्याच्या दरबारांतील लोकांपासून आपले कार्य साधून घेण्याविषयीं शक्त झाला. असाल याबद्दल मला मोठे ताजुब वाटतें. माझी अशी खातरजमा आहे की हिंदु: स्थानवासी ढोक वचनावर कवीही विश्वास ठेवीत नाहीत. आता आपल्यापुढें परस्पर विरुद्ध अशीं दोन मतें आहेत; डयूक आफू बेलिंगटन यांचा अनुभव असा आहे कीं, नेटिव लोक वचनावर कधीं विश्वास ठेवीतच नाहींत, आणि एकमत झालेल्या कामशनारांचे ह्मणणे असे आहे की गायकवाडांच्या वचनावर विश्वास ठेऊन रावजी, ब्ल्यू बुक नं० ५ पान २५ कलम ५१.