पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३३२ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. दफ्तरांत लिहावा आणि त्याजकडूनही व्याच्या चोपड्यात खोटा जमाखर्च करवावा; यापेक्षां जवाहीरखान्याच्या हिशेबांत जास्त खटपट करावी लागली असती काय ? माहीं झणण्यापैकी ती एक मुद्याची शिशी मात्र सांपडली नाही, आणि तीच ठेवि लेल्या ठिकाणाहून कशी नाहींशी झाली हे समजत नाही. बाकीचा सर्व पुरावा य थासांग जेथील तेथें अगदीं तयार होता, आणि त्यास बळकटी येण्यासाठी आणखी नवा पुरावा तयार करून ठेविला होताच. अशा प्रकारचा ज्या मुकदम्यांत पुरावा सांपडेल त्याविषयों दोन कल्पना करितां येतील. एकतर अपराध करणाराच्या मनांत आपल्यावर अपराध लागू व्हावा यासाठी सर्व पुरावा त्यांनी यथासांग जुळून ठेवावा है, आणि दुसरें सरकारी सर्व लोक एकमत होऊन खोटा पुरावा करून ठेवावा है, येथें तिसरा कल्पनाच नाही. ब्रिटिश सरकारच्या रेसिडेंटास विषप्रयोग करण्यासारख्या भयंकर आणि पराकाष्ठेच्या घातक कर्माचा मल्हारराव महाराज अगदर्दी बाजारच मांडून बसले होते. त्यांनीं अमीना आया ईस विषप्रयोगाविषयी विचारलें, आणि पेद्र यास तर पहिल्याच भेटीबरोबर तूं तुझ्या धन्यास विषप्रयोग करून मारशील काय ? - णून एकदम विचारलें, आणि त्यांने ती गोष्ट हूं कां चू केल्यावांचून कबूल केली तेव्हां लागलीच विषाची पुडी त्याच्या हातांत दिली. असा या मुकदम्र्म्यातील पुरावा आहे. कितीही मोठा विरोध आला तरी त्याचा निवाडा करण्याचे एकमत झालेल्या कमिशनरांचे अंगी विलक्षण चातुर्य होते. त्यास विवरणाशक्य अशी कोणतीच गोष्ट आढळली नाही. विषप्रयोग करण्यासारखें अघोर कर्म करण्यास रावजी आणि नरसू यांस महाराजांनीं पूर्वी कांहीं दिलें नसतां ते हें कर्म करण्यास कसे प्रवृत्त झाले ही या कामांत मोठी शंका आहे. महाराजांच्या मर्जीप्रमाणे कार्यभाग उरकल्यावर त्यांनी जर आपले वचन पाळिलें नाही तर रावजी आणि नरसू यांनी त्यांचें करावयाचे काय ? ही गोष्ट मनांत आणिली असतां अगोदर काहीं पैका उप- टल्यावांचून असे कर्म करण्याचा कोणीही अंगिकार करणार नाही, हें स्पष्ट आहे. परंतु एकमत झालेले कमिशनर ह्मणतात कीं, गायकवाडांनी या दोघांस बातम्या दिल्याबद्दल काही पैसा देऊन आपले बंदे करून ठेवि. ले होते. आणि त्यांनी त्यांस मोठें बक्षीस देण्याचें कबूल केले होतें, ही गोष्ट या गरीब मनुष्यांस मलोभन करण्यास बस्स होती. त्यांत विषप्रयोगाचा परिणाम कर्नल फेर यांजवर क्रमाने व हळुहळु लागू होणार होता. विषाचा तात्काळ परिणाम होऊन लागलीच संकटांत पडण्याचे त्यांस भय नव्हते. कर्नल फेर विषापासून तात्काल मरणार नाहीत. त्याचा परिणाम तीन चार महिन्यांनीं होईल असें महाराजांनीं रावजी व नरसू यांस सांगितलें होते, असें जें ह्मणण्यांत आले आहे त्यास अनुलक्षून हैं शेवटी लिहिलेले वाक्य आहे असे दिसतें; ह्मणजे जें कृत्य सद्यःफलप्रद नाहीं तें किती जरी भयंकर असले तरी नुस्ख्या वचनावर विश्वास ठेऊन करण्यास काय हर कत आहे? सफळ होऊन बक्षिस मिळाले तर बरेंच मोठे मिळेल व न मिळाले तर आपल्या पदराला कांहीं खार लागत नाहीं, मग महाराजांच्या वचनावर तरी विश्वास