पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विषप्रयोगाच्या खटल्याबद्दल सारासार विचार, ली अर्से कबूल करण्यास कर्नल फेर यांनी पुष्कळ आढेवेढे घेतले, आणि सारजंट बालंटाइन यांनी त्यांजवर खूप सती केली तेव्हां त्यांनी त्याचे नांव सागितलें. कर्नल फेर यांचें अंतःकरण त्या अरोबियन नाइटांतील एका विलक्षण प्रकारच्या आर्शाप्रमा णे बनून राहिले होतें. भाऊ पुणेकर जसे प्रतिबिंब उठवील तसे त्यांत उठावयाचें आणि कर्नल फेर यांची तदाकारवृत्ति व्हावयाची. भाऊ पुणेकर यानें सांगितलें कीं, तुमचे सरबतांत तांबें घातले होते की कर्नल फेर यांच्या तोंडास कळकट चव लाग- लीच. कर्नल फेर हे या मुकदम्यांत एक नायक होते. त्यांच्या साक्षीवर काय तो या मुकदम्याचा आधार होता. आणि "तुझी जर दादाभाई यांस दिवाण नेमाल तर तुमचा आमचा लढा सुरु होईल आणि तीन महिन्यांत तुमचें नुकसान होईल. अ. से महाराजांस बजाविले होते. आणि ती दुस्तर प्रतिज्ञा पार पाडण्याचे निमित्त सां पढल्यावर दीर्घ प्रयत्न करण्यास ते चुकतील असे नव्हते. तो दृढसंकल्पी शूरसरदार हातांत समशेर घेऊन एकदां रणसंग्रामांत शिरला ह्मणजे जय मिळविल्यावांचन जसा कधीं मागे सरळा नाही तसाच मल्हारराव महाराज यांजबरोबरील वागणुकीत त्यांची निर्विकल्पता दृष्ट झालेली आहे, ह्मणून त्यांच्या साक्षीतील सर्व मुद्यांस उत्तम कसो- टीने खरेपणा आल्यावांचून हा मुकदमा योग्य पुराव्यानें खरा करुन दिला आहे अ से मानणे योग्य नव्हते. " या मुकदम्यांतील पुरावा असा कांहीं चमत्कारिक आहे की, हे कृत्य करणारांनी गुन्ह्यांची शाबिती व्हावी यासाठी जसा काय तो सर्व पुरावा अगोदरपासून यथासांग जुळून ठेविला होता. अमीना आया इन मुंबईहून पत्र्ने लिहिलीं तीं झाडा घेतेवेळ स सालम आरब याच्या घरांत सांपडलींच, सोमलाची पुडी रावजीच्या पट्ट्यांतून नि घालीच, दामोदरपंत याने शाई सांडून खरात्र केलेले कागद महाराजांच्या विरुद्ध पु- रावा देण्यास तयार होतेच, महाराजांच्या जवाहीर--खान्यांत पुष्कळ हिरे असतां हे- मचंद याजकडून हिरे मागवून व त्याजबद्दल त्यास रुपये देऊन दफ्तरांत खोटा जं- मारखर्च करून ठेविला होताच. महाराजांच्या जवाहीरखान्यांत विपुल हिरे असतां हेमचंद याजपासन खरेदी करण्याची गरज का पडली ? या प्रश्नाचा एक मत झाले ल्या कमिशनरांनी असा उलगडा केला आहे की जव्वाहिरखान्याच्या हिशेबांत त्या- बद्दलचा दाखला ठेवावा लागेल ह्मणून हेमचंद याजपासून नवे हिरे खरेदी घेतळे. दामोदरपंत यानें वह्या फिरविल्या होत्या आणि त्याबदल त्यास कर्नल फेर यांचे भय होतें ह्मणन त्यानेच कर्नल फेर यांस विषप्रयोग करविला असेल अशी सारजंट बाळंटाइन यांची कल्पना जशी विलक्षण आहे तशीच या हिप्याच्या खरेदीच्या संबंधाने एकमत झालेल्या तीन युरोपियन कमिशनरांची आहे. जवाहीरखान्याच्या हिशेबावि षयों त्यांस कांहीं देखील माहिती नव्हती. त्यांत मल्हारराव महाराज यांनी आपल्य कारकीर्दीत तर पराकाष्ठेचा घोटाळा केला होता. अमुक रति हिरे अमुक एक वस्तूला मडले असा दाखळा लिंहिला असता ह्मणजे बस्स झाले असते. जवाहिन्यापासून नये हिरे खरेदी करावे, त्याबद्दल त्यास किंमत द्यावी, त्याचा खोटाखर्च खाजगोच्या