पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३३० ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. टाइन यांनी कोर्टीस सांगितले असून त्याच्या साक्षीनें प्रासिक्यूशनचा खटळा अ गदी धुळीस मिळाला आहे असे झटले आहे ते तात्काळ मनांत भरतें. हा मुकदमा चालत होता तेव्हां पेडूच्या साक्षीकडे सर्वांचे एकसारखें लक्ष्य लागले होते. पेद्रूनें महाराजांच्या विरुद्ध साक्ष दिली झणजे मग माहाराजांचा कोणत्याही रीतीने बचाव होत नाहीं; पण त्याने जर महाराजांस अनुकूल साक्ष दिला तर मग महाराज निर्भय आहेत असें लोकांस वाटत होते, आणि पेट्र् याने साक्ष दिल्याबरोबर महाराजांच्या सुरक्षितपणाविषयीं लोकांची खातरजमा झाली होती. इतकी ही महत्वा- ची साक्ष असतां एकमत झालेले कमिशनर ती अगदी क्षुद्र मानितात, ही गोष्ट विचारी लोकांच्या मनाला काही थोडी चमत्कारिक वाटत नाहीं. गवरनर जनरल या साक्षीविषयीं आपल्या ठरावांतील चव्वेचाळीसावे कलमांत असे लिहितात कीं, पेद्र याची साक्ष रावजी याच्या साक्षीशी एकाच मुद्याविषयीं विसंवादी आहे. विषप्रयोगाच्या कृत्यांत गायकवाडांस तो गुंतवीत नाही इतकीच त्याची साक्ष गाय- कवाडांस अनुकूल आहे; परंतु त्याखेरीज रेसिडेंटाच्या नौकर लोकांबरोबर महाराजां- चें दळणवळण होतें, ह्या रावजीच्या साक्षीस त्याच्या साक्षीने बळकटी येते. तो कबूल करितो कीं, गायकवाडांपासून मला कांहीं पैसा मिळाला आणि दुसरें असेंही झणतो कीं, सालम यानें मला गायकवाडांस भेटण्याविषयी आग्रह केला होता परंतु मी नाकबूल केले. कोणत्याही पुराव्यांतून महाराजांच्या विरुद्ध जितकें कोरून काढवेल तितके काढावयाचेच असा एकंदर अधिकाऱ्यांचा कृतसंकल्पच दिसतो. रावजी इतकापाजी मनुष्य आहे कीं, तो पाहिजेल त्यास या विषप्रयोगाच्या कृत्यांत गुंतविण्यास काहीं मागेपुढे पाहत नाहीं. त्यानें त्या बिचाऱ्या फैजू चोपदारावर आळ घेतला होताच. आणि कर्नल फेर यांच्या पंचवीस वर्षांच्या जुन्या आणि इमानी चाकरास देखील या प्रकरणांत गुंतविण्यास त्याने मागेपुढे पाहिले नाही, इतका तो लवाड मनुष्य आ हे. तेव्हां त्याच्या साक्षीवरून महाराजांस आपण दोषी कसे ठरवावें है कोणी च आणीत नाहीं. लबाड मनुष्याची साक्षी प्रामाणिक मनुष्याचे साक्षीनें खोटी प डत असली तरी त्या पुराव्यावरून अमुक एक भाग खोटा पडतो अशी योजना क रून तितक्याच भागापुरता त्यास लचाड मानून इतर गोष्टींत व्यास प्रामाणिक माना- वयाचें, हा न्यायाधिशांच्या कल्पनेचा एक विलक्षण प्रकार आहे. कर्नल फेर यांच्या सरबतांत सोमल आणि हिऱ्याची मुकी या दोन पदार्थांशिवाय तिसरा पदार्थ नव्हता हैं तत्ववेत्यांच्या साक्षीनों सिद्ध झाले असून ह्या दोन्ही पदार्था स रुची नाहीं असे असतां कर्नल फेर यांस सरबताची कळकट चव लागली क शी ? आणि तारीख ५-६ रोजी विषप्रयोग करण्यांत आला नसतां तारीख ९ रोजीं त्यांस ज्या भावना झाल्या, त्याच त्यांस त्या दिवशीही झाल्या कशा ? याविषयों व सरबतांतील पदार्थाच्या रंगाविषयीं युरोपियन कामेशनरांनींही निर्णय केला नाहीं व गवरनर जनरल यांनीही केला नाही. हे दोन महत्वाचे मुद्दे तसेच अनिर्णित राहूं दिले. सरबतांत तांबें मिश्र केले होते ही बातमी आपणास भाऊ पुणेकर यानें दि-