पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३२८ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. आप गवाणी झाल्यावांचून लोकांची कधींही खाली होणार नाहीं कीं, यांत पोलिसाचें कांहीं करस्थान नव्हते. रावजी यानें, जें वोष मला मिळालें तें भी सर्व उपयोगांत आणले असे सांगितल्यावर त्यांपैकी काहीं तरी शिल्लक राहिले असेल. असे अकबर अली यांचे मनांत यावे कसें ? व विषाचा नाश करण्याविषयीं रावजीस सूचना झाली असतां व त्यास पुष्कळ सवड असतां ती सोमलाची पुढी त्या पट्ट्यांत तशीच राहवी कशी ? रावजी यास तिजविषयीं विस्मृति का पडावी ? सूटर साहेब हे पट्टा तपासण्याच्या वेळेस गैरहजर कां असावे ? अकबर अल्लीने त्या पट्टयाच्या कप्यांत आपढ़ें बोट शिरकवावे आणि नंतर त्यांतून कांहीं निघते असे वाटल्यावर ल्यावर कारस्थान केल्याचा दोष येऊं नये यासाठीं सूटर साहेब यांस बो- ●ळावून मग त्यांतून तो सोमळाची पुडी काढावी आणि नंतर रावजीने असे सां- गावें कीं, मला जो सोमल मिळाला होता त्यांपैकी कांहीं भी पट्टयाच्या कप्यांत ठेविला होता, त्याचें मला स्मरण राहिले नाही. ह्या गोष्टी अशा कांहीं विलक्षण आहेत की, त्याविषयी कांहीं अक्कल काम करीत नाहीं. अकबर अल्ली यास तर आपल्या मामा- णिकपणाविषयीं देखील संशप उत्पन्न झाला होता. सूटर साहेब यांच्यापरोक्ष पट्टयांतूम जर मी सोमळाची पुडी काढली तर मजवर कारस्थान केल्याचा दोष येईल याविषयी त्यांस भय वाटून ते सूटर साहेब यांस बोलावितात आणि मग आपले शिरकवलेल बोट त्या सोमळाच्या पुडीसह त्या कप्यांतून बाहेर काढितात तर बुधर याजजवळून पट्टा घेण्यापूर्वीच सूटर साहेब यांस कां बोलाविले नाही, आणि त्यांच्याच हाताने का तो तपासला नाहीं ! आपले बोट अगोदर त्या पट्ट्याच्या कप्यांत कशासाठी शिरका. वून ठेविलें होतें ? ही पुडी सांपडल्यापासून महाराजांवरील आरोपास जास्त बळकटी आली असें ह्मणणारे खुशाल ह्मणोत, आणि त्यांस तसे झटळेच पाहिजे. या कृत्यांत पोलिसचे काही कारस्थान होतें असे त्यांनी स्पष्ट मान्य न करतां, नुस्ते या पुराव्यावर आमचा भरंवसा नाही असे झटलें कीं, सर्व खटला अगदी बुडून जातो. तेव्हां त्यांच्याने तसे कसें ह्मणवतें !! या मुकदम्यांतील पुराव्याची सांकळी अशी कांहीं च- मत्कारिक आहे की, तिची एक कडी मधून काढून टाकिलो कीं सगळी सांकळी अगदीं अस्ताव्यस्त होऊन जाते. यामुळे प्रत्येक पुराव्यांतील दोषाकडेस डोळेझांक करून त्यास खरेपणाचें रूप देणें भाग पडलें आहे. नरसू ह्मणतो कीं, मी काहीं छ. ज्जैन जीव देण्यासाठी विहिरीत उडी टाकिली नाही, व त्याने बुद्धिपुरस्सर उडी टाकली असा पुरावाही झाला नाही. याबद्दल सारजंट बालेंटाइन यांनी उत्तम टी- का केली आहे; परंतु याने लज्जेने बुद्धिपुरःसर उडी टाकिली असें एकमत झाले. ल्या कमिशनरांस ह्मणावयाचे आहे, आणि त्याबद्दल पुरावा तर कांहीं नाहीं. तेव्हां ते असें ह्मणतात कीं, ती विहीर आझी पाहिली त्यावरून त्याचें तिजमध्ये पतन स्वाभा विकपणे झाले असेल असे मानणे कठीण आहे. तो आपण होऊन तींत पडला अ- से ह्मणण्यास चांगले कारण आहे. आपण होऊन उडी टाकण्यास विहीर कशी अ सली पाहिजे आणि स्वाभाविकपणें तींत पतन घडण्यास तिची आकृती कशी अस