पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गवरनर जनरल यांचा ठराव.: ( ३२७ ) ण्याची खटपट चालू असून मध्येच आपण खलिता लिहीत आहोत; तेव्हां त्याचा परिणाम काय होतो तो पाहून मग जरूर पडल्यास विषप्रयोग करण्याच्या उद्योगास लागावयाचे किंवा इकडे खळिताहा ल्याहावयाचा आणि इंकडे विष प्रयोग करावयाचा ? विषप्रयोग करण्या विषयींची अगोदर पासून सर्व तयारी करून ठेविली होतो आणि विषप्रयोग करण्याचा प्रयत्न चालू असून त्याच संघीत खलिता लिहिला असता तर पहिला बेत थांबविण्यांत कदाचित हेळसांड झाली असती. अशी कुत्सीत कल्पना करता येईल परंतु तसेंही झाले नाहीं. पूर्वी विषप्रयोग करण्याचे जे प्रयत्न झाले होते असे ह्मणण्यांत आहे ते निष्फळ होऊन चुकले होते; आणि खलिता लिहिल्यानंतर विषप्रयोग करण्याविषयीं नवा प्रयत्न झाला. तारीख २ नवंबर नंतर आणि तारीख ९ नवंबर पूर्वी रावजी आणि नरसू यांची महाराजांनी पुनः भेट घेतली. त्यांनी विष देण्याचा बरोबर प्रयत्न केला नाही म्हणून त्यांस एक जब्बर रानटी शिवी दिली आणि त्यांस नवे विष दिले, असा पुरावा देण्यांत आला असून त्याजवर कायतें या मुकदम्याचें अवसान आहे; तेव्हां खलिता लिहिल्यावर असे करणें संभवतें किंवा नाही हा मुख्य विचार आहे. खलिता लिहिल्यानंतर विषप्रयोग करण्याविषयीं ताजा विचार करण्याचे प्रयोजन काय ? या प्रश्नाचे समर्पक उत्तर देतां आलें नाहीं. कर्नल फेरयां- नीं सिंधमध्ये असतांना कांहीं गैर वर्त्तन केल्यावरून त्यांस सरकाराकडून ठपका मिळाला होता है महाराज व दादाभाई यांस समजलें होतें व त्याबद्दलचा एक दस्तऐवज त्यांच्या हातांत आला होता त्यावरून कर्नल फेर यानी बडोद्याचे दरबाराशीं असभ्यपणाची आणि अन्यायाची वागणूक केला होती त्याबद्दल फिर्याद झाली असतां तिजकडे त्यांचे वरिष्ठ लौकर ध्यान देतील अशी दरबारची पक्की खातर जमा झाली होती. विषप्रयोग करणे हें कर्म मोठे धोक्याचें होतें. दुसरें कायदेशीर प्रयत्न निष्फळ झाल्यावांचून असे पराकाष्ठेचें घातक कर्म सामान्य विचाराध्या मनुष्यापासून देखील होण्याचा संभव नाहीं. मग कर्नल फेर यांनी मल्हारराव महाराज यांस तर दूरवर विचारी आणि का वेबाज म्हटले आहे, व अशा कामांत ते फार प्रवीण आहेत असे मानले आहे. तेव्हां त्यांच्या हातून असा अविचार तर कर्धी हो होऊंनये आणि एकमत झालेल्या कमि.. शनरांस या प्रश्नाचा बरोबर खुलासा सांगता आला नाही तरी तारीख २ नवंबर रोजी खलिता लिहिला आणि त्यानंतर विषप्रयोग करण्याविषयीं पुनःमसलत केली आणि नवेंवाष दिलें, आणि तारीख९नवंबर रोज विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला असें ते मानतात. सारांश तारीख २ नवंबरचा खलिता हा महाराजांचेतर्फेचा एक उत्तम पुरावा आहे. आणि या पुराव्याने महाराजांचे विरुद्ध जो पुरावा झाला होता तो बराच हाणून पाडला आहे यांत कांहीं संशय नाही. त्याचप्रमाणे ती पट्टयातून निघालेली सोमलाची पुडी ही या मुक दम्याचें स्वरूप अगदर्दी फिरवून देते. या पुडीच्या संबंधाने पोलिसचें कांहीं कारस्थान नाहीं असे एकमत झालेले कमिशनर ह्मणतात आणि गवरनर जनरल यांचे मत ही तर्सेच आहे, आणि तसेंही असेल, परंतु ह्या पुढीचा वृत्तान्त असा कांही चम कारिक आहे कीं, तिच्या संबंधाने पोलिसानी कहीं कारस्थान केलें नाही अशी स्व-