पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३२६ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. चिन्हें कर्नल फेर यांच्या पायापुढे ठेऊन त्यांस शेवटचा सलाम करावा आणि ते कृपाकरून जी नेमणूक करून देतील ती खाऊन आयुष्याचे दिवस काढावे आणि तसे जर न करवेल आणि राजलक्ष्मीचा वियोग दुःसह वाटेल तर विष भक्षण करून सर्व दुःखांतून एकदम मुक्त व्हावें. या खेरीज आपली अब्रू बचावण्यासाठी मल्हा. रराव महाराज यांस चवथा उपाय उरलाच नव्हता. अशी त्या दुर्देवी राजाची स्थिति झाली होती. राज्यकारभारांत सुधारणूक करून देखील आपलें राज्यपद राखून ठेविणें त्यांस शक्य नव्हते. पंचवीस लक्ष प्रजेच्या स्वामीनें रेसिडेंटाच्या एका दासीस बोला. वून तुझे साहेब मजविषयीं कांहीं चांगळें बोलतात काय ? मडमसाहेब यांस दोन गोष्टी सांगून साहेबांची मजवर कृपा होईल असे तू कांहीं करूं शकशील काय ? असे दीन होऊन विचारावें यासारखा दुःखद, अपरायस्कर व बेअब्रूचा प्रसंग दुस- रा तो कोणता असावयाचा ! व ब्रिटिशसरकारच्या रेसिडेंटाचा याहून मोठा अ न्याय तो कसा असावा! कर्नल फेर यांस काढण्याविषयीं खलिता लिहिल्यावर त्यापासून काय परिणाम होतो याची वाट पाहिल्यावांचून विषप्रयोग करण्याचे प्रयोजन तरी काय ? या प्रश्ना- चा योग्य रीतीनें उलगडा झाला नाहीं. हा प्रश्न कांहीं कमी महत्वाचा नाहीं. कर्नल फेर माझे दरबारांत नसावें हाच महाराजांचा हेतु होता, त्यांचे प्राण हरण केल्या- बांचन तो हेतु सिद्धीस जात नाहीं, अशी खातरजमा झाल्यावर देखील अशा अघोर कर्मास प्रवृत्त व्हावयाचें नाह। मग सैौम्य उपायाने आपला हेतु साधत असेल तर कोण बरें असे दुष्ट कर्म करण्यास प्रवृत्त होईल ? तारीख २ नवंबर रोजीं खलिता लिहिला आणि लागलाच तारीख ९ रोजी विषप्रयोग केला हें जुळतें तरी कसें ? विषप्रयोग करून कर्नल फेर यांस मारावयाचेंच असतें तर तारीख २ नवंबर रोजीं खलिता लिहिला नसता, आणि सौम्य प्रयत्न करून पाहण्याचा असता तर त्यांची असि झाल्यावांचून विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला नसता. ह्या प्रश्नाचा उलगडा करितांना एकमत झालेल्या कमिशनरांस पराकाष्ठेचें कठीण पडलें असें त्यांच्या लेखाव रून दिसतें. त्यांनी आपल्या अभिप्रायांतील ७३व्या कलमांत वर लिहिल्याप्रमाणे शंका घेऊन त्याजविषयीं असे लिहिले आहे कीं, खलिता लिहिण्याविषयों दादाभाई यांनीं महाराजांस मसलत दिली असेल, कारण, विषप्रयोगसंबंधीं खटपटीविषयी यांस अ. ज्ञान होते यांत कांहीं संशय नाहीं, आणि ती सल्ला महाराजांनी तात्काल कबूल. केली असेल इतकेंच या प्रश्नाचे उत्तर देऊं शकवेल. दादाभाई यांणी स्खलिता लि. हिण्याविषयों महाराजांस सल्ला दिली होती ही गोष्ट खरी आहे व विषमयोगसंबंधी खटपट चालली असेल तर त्याविषयीं दादाभाई यांस माहिती नसावयाचीच ही गोष्ठहा खरी आहे. तो सद्गृहस्थ अशा प्रकारच्या खटपटीत पड- णारा नव्हता यांत तर नक्ल काय, पण महाराजांच्या खासगत वर्त्तणुकीवर त्यानें कांहींच नजर ठेविली नव्हती. आपण भले आणि आपला राज्यकामार मला पण कमिशनरांचे ह्मणण्याप्रमाणे महाराजांस तर माहीत होते ना की विषमयोग कर-