पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गवरनर जनरल यांचा ठराव. ( ३२५ ) काही देखील पुरावा मिळाला नव्हता तो रिपोर्ट फक्त वृत्तांत विज्ञापनाबद्दल होता असें असतां त्यांनी महाराजांवर अकसखोरीनें किती जबर हल्ले केले अ हेत ते ध्यानात घेतले ह्मणजे सहज समजून येतें कीं, कर्नल फेर यांच्या मनांत महाराजांविषय पराकाष्ठेचें वैर होते. मल्हारराव महाराज यांचे विषप्रयोगांत अग होते असा पुराव्यावरून संशय उत्पन्न झाल्यावर व ते अपराधी आहेत असे वाटल्यावर तरी कर्नल फेर यांनी मल्हारराव महाराजांची दुःश्राव्य शब्दांनीं निर्भर्त्सना केली आहे तशी कोणी तरी केली आहे काय ? नाही. तर मग कर्नल फेर यांच्या मनांत महाराजांविषयीं पराकाष्ठेच वैर होतें. असे दाखविण्यास दुसरा कोणता पुरावा पाहिजे ? आ कर्नल फेर यांनी तरी असें कोठें झटलें होतें कीं महाराजांचे मनांत माझेविषयीं खःसगत द्वेष होता. त्यांनीं तर पदोपदीं अस झटले आहे की, मल्हारराव महाराजांनीं जे कांहीं अपकार केले ते ब्रिटिशसरकारास केले हेत, मला केले नाहीत. 'खासगत द्वेष कांहों या कृत्याचा उद्देश नव्हे' असे तर व्यांच्या तारीख १७ नवंबरच्या रिपोटीत एक स्पष्ट वाक्य आहे. मग मल्हारराव महाराज यांच्या मनांत कर्नल फेरविषयों खासगत द्वेष होता आणि ह्मणून त्यांनी आपल्या प्रतिज्ञालेखांत त्याजविषयीं माझे मनांत खासगत द्वेष नव्हता ह्मणून लिहि- लें आहे ते आह्मांस मान्य नाहीं, अर्से एकमत झालेल्या तीन कमिशनरांस बळेंच कशासाठी स्थापित करावें लागले ? त्यांनी याबद्दलच्या प्रमाणास तारीख २ नवंबर- च्या खात्यातील वाक्यें घेतली आहेत. त्यांत खासगत वैरद्योतन व्हावे असा कोण- ता मजकूर आहे ? कर्नल फेर यांच्या वर्तनापासून राज्यकारभार चालविण्यांत ज्या अडचणी आल्या होत्या त्या त्यांत दर्शविल्या आहेत; त्याजवरून जर खासगत वैर- द्योतन होत असेल तर तो खलिता लिहिला तरी कसा पाहिजे होता ? " वर लिहि ले आहे त्यावरून कर्नल फेर साहेब आपले कर्तव्यकर्म न स्मरून पाहिजे ते करि- तात असे माझें बिलकुल ह्मणणे नाहीं; परंतु त्यांचे व आमचे विचार व भतें यांजम- ध्ये फारच जबरदस्त अतर आहे," असे महाराजांच्या खात्यांत एक वाक्य आहे. हें वाक्य किती सुंदर त्याचें वर्णन देखील करितां येत नाहीं. या वाक्यांत त्यांचा माझा खासगत कांही द्वेष नाहीं राज्यकारभाराच्या संबंधानें मतभेद आहे, असे स्पष्ट दर्शित केले असून एकमत झालेल्या कमिशनरांनी त्या खलित्यावरून म ल्हारराव महाराज यांच्या मनांत कर्नल फेरविषयी खासगत द्वेष होता असे ह्मणावें हे मोठेच चमत्कारिक दिसते. या विषप्रयोगाच्या प्रकर णांत कर्नल फेर यांनी कांहीं कारस्थान करून मल्हारराव महाराज यांजवर बु. द्विपुरःसर खोटा आळ घेतला असे कोणाच्यानें ही ह्मणूं शकवणार नाही, पण इत के तर स्पष्ट ह्मणता येईल की कर्नल फेर यांनी महाराजांचा इतका छळ केला आणि त्यांच्या अविचाराच्या वर्तनापासून महाराजांची पदोपदी इतकी प्रतिष्ठा झाली होती की, महाराजांनी त्यांस आपल्या दरबारांतून काढण्याविषयीं नामदार गवरनर जनरल यांस विनंति करावी आणि ती अर निष्फळ झाली तर सर्व राज.