पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३२४ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास- बाडाच्या मनांत कर्नल फेर विषयीं अतिशय द्वेषभाव होता असें ह्मणतात ! कर्नल फेर यांच्या मनांत महाराजाविषयी खासगत द्वेष होता असे जर या कमिशनापुढे दाखविण्यांत आळें असतें तर तीन युरोपियन कमिशनरांच्या मनाचा झोंक कांहीं निराळाच झाला असता, आणि या मुकदम्यास कांहीं निराळेंच रूप आले असतें अशी कितीकाची समजूत आहे व कर्नल फेर महाराजांचा पराकाष्ठेचा द्वेष करीत होते असें कमिशनास सांगण्यांत आलें नाहीं व त्याबद्दल पुरावाही देण्यांत आला नाहीं, हें ही खरें आहे. महाराजांच्या तर्फे काहींच पुरवा देण्यांत आला नाहीं हो जी मोठी चूक झाली त्यांत या चुकीचाही अंतरभाव होतो; पण मल्हारराव महाराज यांच्या मनांत कर्नल फेर विषय खासगत द्वेष होता असा पुरावा देण्यांत आला नाही, तसा कर्नल फेर यांच्या मनांत महाराजां- विषयों खासगत द्वेष होता असा महाराजांकडूनही पुरावा देण्यांत आला नाही. ता- रोख २ नवंबरचा खलिता आणि तारीख १७ नवंबरचा कर्नल फेर यांचा रीपोर्ट है दोन्ही कागद मुकदम्यांत होते आणि सारजंट बालटाइन यांनीं कमिशनरांस विनंति केली होती कीं, भीं जीं कारणे सांगितली आहेत त्यांजकडेच आपण लक्ष्य देऊं नये, पण मुकदम्यांतील हकीकतीकडे लक्ष्य द्यावें ह्मणजे आपल्यास मल्हारराव महाराज निरपराधी आहेत अशी आणखीं कारणें सांपडतील; तर कमिशनर यांचें लक्ष्य कर्नल फेर यांच्या रिपोर्टाकडे कां गेलें नाहीं ? ज्यापेक्षां ते असे ह्मणतात कीं, कर्नल फेर यांच्या मनांत महाराजांविषयी खासगत द्वेष होता असे दाखविण्यांत आ लें नाही त्यापेक्षा हा मुद्दा विशेष महत्वाचा होता हें स्पष्ट आहे; आणि त्याविषयीं तारीख १७ नवंबरच्या रिपोटांत विपुल प्रमाणे असून दुसरी हो अनेक प्रमाण सांपडण्यासारखी होती. असे असता त्याबद्दल कमिशनरांनी विचार केला नाही व महाराजांच्यातर्फे काम चालविणारांनी त्याबद्दल पुरावा दिला नाही याचा दोष दोघांकडेसही समान वेंकरून राहतो. परंतु जर ता० १७ नवंबरचा कर्नल फेर यांचा रिपोर्ट कमिशनाच्या नजरेत आलाच नसेल तर मात्र महाराजांच्या तर्फे काम चालविणाराकडेसच मोटा दोष येतो पण तो रिपोर्ट कमिशनच्या पाहण्यांत आला नसेल असे मन घेत नाही, कारण विषमयोगसंबंधी आद्यवृत्तांत काय तो त्यांत होता. कर्नल फेर यांस बडोद्याच्या दरबारांतून काढिले त्यासंबंधानें हिंदुस्थान सरकार आणि मुंबईसरकार यांजमध्ये चुरस चुरशीचा पत्रव्यवहार झाला त्यांत कर्नल फेर यांची फजिती उडविण्यांत कांहीं बाकी ठेविली नाही. परंतु विषप्रयोगाचे प्रकरण उपस्थित झाल्यावर त्यांस अगदी पवित्राचरणी बनवून ठेविलें. त्यांच्या अयोग्य वर्तनाविषयी लिहितांना त्यांची गैर समजूत झाली व त्यांनीं हुकुमाविरुद्ध वर्तन केलें असें कांहीं सौम्य शब्द मात्र दृष्ट होतात. गायकवाडाचा त्यांनी पराकाष्ठेच छळ केला, व त्यांजवर नाना प्रकारचीं बालंटें आणिलीं असतां त्याबद्दल कोठें एक शब्दही सांपडत नाहीं; तारीख १७ नवंबर रोजी कर्नल फेर यांणी रिपोर्ट केला त्यावेळेस विषप्रयोगाच्या प्रकरणांत महाराजांचें अंग होते असा त्यांस