पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गवरनर जनरल यांचा ठराव. ( ३२३ ) सदहू खलित्यांतील कर्नल फेर विषयों महाराजांच्या मनांतील अतिवेरसूचक वाक्ये कायतीं हैं।. मल्हारराव महाराज यांचे मनांत कर्नल फेर विषयों पराकाष्ठेचा वैर- भाव होता है दाखविण्याकरितां एकमत झालेल्या तीन कमिशनरांनी दोषदृष्टानें तो खलिता पाहिला तेव्हां फायती वर लिहिलेली वाक्यें सांपडली. यावरून तो लेख किती सभ्यपणानें लिहिला आहे व त्याची वाक्ययोजना किती प्रौढ असून किती रास्त आहे हे स्पष्ट समजते. त्या खलित्यांतील वर लिहिलेली वाक्ये आपल्या अभि- प्रायांत घेऊन मल्हारराव महाराज यांच्या मनांत कर्नल फेर विषयीं राजकीय संबंधीं व खासगत वैर होते, आणि मल्हारराव महाराज यांजविषयीं कर्नल फेर यांच्या मनां, त कांहीं खासगत वैर नव्हते असे मोठे विद्वान आणि अनुभवी तीन युरोपियन कमिशनर स्थापन करितात !! काय हे मल्हारराव महाराज यांच्या दुर्दैवा चें माबल्य ! ! कर्नल फेर हे मल्हारराव महाराज यांचा पराकाष्ठेचा द्वेष करीत होते याविषय त्यांनी तारीख १७ नवंबर सन १८७५ रोजी विषप्रयोग संबंधी रिपोर्ट केला त्यांत शेकडों प्रमाणे असतां, ते तीन युरोपियन कमिशनर ह्मणतात की, कर्नल फेर यांच्या मनांत महाराजांविषयीं खासगत द्वेष होता असे या चौकशीत दाखविण्यात आलें नाहीं. हे काय ? तारीख २ नवंबरचा महाराजांनी लिहिलेला खलिता त्यांच्या दृष्टी- समोर येऊन उभा राहिला, आणि तारीख १७ नवंबरचा कर्नल फेर यांचा रिपोर्ट असा कोठें अंधारांत पडला होता कीं, तो त्यांस दिसला नाही! 'हा हिंदुस्थानांतील राजा, विचारपूर्वक कावेबाजी, दूरवर अवलोकन आणि गुप्तपणा यांच्या योगानें कोणत्या रीतीनें अपल्या मसलती सिद्धीस नेत आहे, आणि आपल्या कृपेंतील लोक आणि मारेकरी यांच्या साधनांनी आपले नीच विचार कसे साधीत आहे आणि आजपर्यंत त्याबद्दलच्या शासनाला कसे चुकवीत आहे हे कळून येईल. आतां मात्र तो बचावून जाणार नाही'. अशा अर्थाचें कर्नल फेर यांच्या सदई रिपोर्टात एक वाक्य आहे. १ दुसरे एक वाक्य अशा अर्थाचें आहे की, 'सन १८५७ चे सालांत हा राजा पंचवीस किंवा सव्वीस वर्षांचा होता, तेव्हां त्यानें पातक करण्यास आरंभ केला. याच रीपोटीच्या शेवटीं असें एक वाक्य आहे कीं, " यास्तव मी सरकारास असें विचारतों कीं, जो राजा पराकाष्ठेचा खुनशी आणि दुष्ट बुद्धीचा आहे असे हिंदु- स्थानांत प्रसिद्ध आहे, आणि जो क्षीण बुद्धीचा आहे सबब त्याच्या कृत्यांची ज बाबदारी त्याजवर ठेवितां येत नाही असे मानले आहे. त्या राजाच्या दरबा- रांत ब्रिटिश सरकारच्या प्रतिनिधीनीं अशा संकटांत कोठवर राहवें ?" ह्यांखेरीज त्या रीपोटीत वैरद्योतक अशीं पुष्कळ वाक्यें असून सदरी लिहिलेली वाक्ये फार कठोर आहेत. त्यांवरून कर्नल फेर यांच्या मनांत महाराजांविषयीं पराकाष्ठेचें वैर होतें असें स्पष्ट दृष्ट होत असतां त्या एकमत झालेल्या कमिशनरांनीं त्याबद्दल कांहीं लिहिले नाहीं, आणि मल्हारराव महाराज कर्नल फेर विषयीं द्वेष बाळ- गीत होते असा ज्या वाक्यांतून मुळींच अर्थ निघत नाही त्या वाक्यांवरून गायक