पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३२२ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. द्धीस नेण्यास कर्नल फेर यांची हरकत असल्यामुळे त्यापासून आपली सुटका करून घेण्यासाठी मल्हारराव महाराज यांनी विषप्रयोग करविण्याचा प्रयत्न केला असे त्यांनी मानिले आहे, हे पाहिले पाहिजे. त्यांच्या अभिप्रायांतील साहसष्ट पासून एकुण- सत्तर पर्यंतची कलमें यासंबंधाने आहेत. तारीख २ नवंबर सन १८७५ रोजी मल्हारराव महाराज यांनी नामदार गवरनर जनरल यांस आपल्या दरबारांतून कर्नल फेर यांस काढण्याविषयीं खलिता लिहिला. त्यांतील काही वेंचे वेऊल एक मत झालेल्या कमिशनरांनी असे लिहिले आहे कीं, गायकवाडाच्या संबंधाने कर्नल फेर यांनीं कांहीं असभ्यपणाचें वर्तन केले होते, असे काहीं या चौकशीत दाखविण्यां त आलें नाहीं. राज्यकारभाराचे संबंधाने उभयतांचीं भिन्न मतें असल्यामुळे या दोघांमध्ये वैर उप्तन्न झाले होते. परंतु कर्नल फेरविषयीं महाराजांचे मनांत राजकीय संबंधाने द्वेष असून आणखी खासगत वैर होतें यांत कांहीं संशय नाही. आणि स शन कनल फेर यांजबरोबर माझे कांहीं खासगत वैर नव्हते असे महाराजांनी आप- ल्या लेखी हकीकतीत सांगितले आहे ते आमच्यानें कबूल करवत नाही. असे एक मत झालेले कमिशनर ह्मणतात. तारीख २ नवंबर रोजी महाराजांनी गवरनर जनरल यांस खलिता लिहिला. त्यां तील जे वेंचे एकमत झालेल्या कमिशनरांनी आपल्यावरील अभिप्रायाच्या बळकटी. स घेतले आहेत त्यांतील एका वाक्याचा भावार्थ असा आहे की, कर्नल फेर ज्या री- तीनें मजबरोबर वागतात त्या रीतीकडे आपले लक्ष लावण्याविषयों मी आपल्यास विनीत करावी किंवा नाहीं, आणि माझ्याविषयीं त्यांच्या मनांत जर कळवळा नाहीं तर ते मजबरोबर शुद्ध रीतीने वागतील अशी अशा करावी काय, याविषयों आप ल्यास विचारावे किंवा नाहीं असे माझे मनांत प्रथम आलें होतें. दुसऱ्या वाक्याचा भावार्थ असा आहे कीं, कर्नल फेर यांनी मला आणि माझ्या राज्यकारभाराला हरकत करावी असा पहिल्यापेक्षाही ज्यास्त दृढनिश्चय केला आहे. तिसऱ्या वाक्या- चा भावार्थ असा आहे कीं, ह्या दोन उदाहरणांवरून कर्नल फेर यांजपासून मला किती उपद्रव व त्रास होत आहे तें सहज ध्यानांत येण्यासारखे आहे. चौथ्या वा- क्याचा भावार्थ असा आहे कीं, ब्रिटिश सरकारच्या प्रतिनिधीच्या अशा प्रकारच्य वर्तनापासून मला अतिशय काळजी उप्तन्न होणे हें स्वाभाविक आहे. अशा समयास अपस्वार्थी लोक आपला अर्थ साधून घेण्याकरितां माझ्याविषयीं भलत्याच गोष्टी सांगण्यास व माझ्या प्रजेला माझ्या सत्तेस हरकत करण्याविषयीं उत्तेजन देण्यास मागे पुढे पाहणार नाहीत, आणि याचा परिणाम असा होईल कीं, ह्या वर्षांत सरकारची जमा वसुल होणार नाही आणि लोकांची मनें अस्वस्थ राहतील. अशा प्रकारची स्थिती असल्यामुळे ●राज्यकारभारांत सुधारणूक करण्यास मला किती अडचणी आहेत त्या ध्यानात येणे कांहीं कठीण नाही. मला जें काम करावयाचे आहे त्याचें महत्व आणि कर्नल फेर यांनी जर अशाच रीतीने मजबरोबर व माझ्या कामदारांबरोबर वागणूक केली तर त्यांचे वास्त व्य माझे प्रयत्नास किती निष्फलद होईल हे आपल्या ध्यानांत आहे.