पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गवरनर जनरल यांचा ठराव ( ३२१ ) जमाणे गवरनर जनरल यांणी जर मानिलें तर हिंदुस्थानचें राज्य एक दिवस देखील चागल्या रीतीने चालवितां येणार नाहीं. या कामाशीं ज्यांचा संबंध होता त्यांनी हें सर्व कारस्थान केले अस ग्राह्य केल्यावांचून तर मल्हारराव महाराज अगदी निर्दोष आहेत असें मानितांच येत नाही, असा हा मुकदमा विलक्षण प्रकारचा आहे. बे- अब्रूच्या साक्षीदारांच्या पुराव्याला ज्या पुराव्यावरून बळकटी आली आहे ते लोक ब्रिटिशसरकारच्या नौकरींतील असून मोठ्या अब्रूचे होते. रावजी याने सरबतांत विष कालविलें आणि त्या विषाचे अंगभूत पदार्थ सोमल आणि हिऱ्याचा भुकी हे होते. हा रावजीचा पुरावा डाक़तर सिवर्ड आणि ग्रे यांच्या साक्षीने गृहीत झाला. जर त्या डाक्तरांनी अशी साक्ष दिली असती कीं, त्या सरबताचा जो अंश शिलक राहिउ' होता त्यांत विष नाहीं; तर रावजीची साक्ष अगदी लटकी पडली असती. तेव्हा अशा लोकांच्या साक्षीवर गवरनर जनरल यांणी अगदी भरंवसा न ठेवितां त्यांस सारजंट बालनटाइन यांच्या दृष्टीने पाहिले पाहिजे होतें असें ह्मणणे फार कठी. ण आहे. गवरनर जनरल यांणी आपल्या ताब्यांतील अधिकारी यांस त्यांच्या हुद्या. च्या प्रमाणानें प्रानाणीक मानलेच पाहिजे. अकबरअल्ली याने पट्टयांतून सोमलाची पुढी माझे समक्ष काढिली अशी सूटरसाहेब यांणी साक्षी दिल्यामुळे त्यांत अकबर- अल्लीचे काही कारस्थान नाही असे गृहीत करणे भाग झाले. कारण कीं, अकबर- अल्लीपेक्षां मूटरसाहेब यांचा हुद्दा मोठा आहे, त्याप्रमाणानें ते अकबरअल्लीपेक्षा जा स्त प्रामाणीक आहेत असे मानणें भागच येतें, आणि प्रामाणीकपणांत तसे अंतरही असते. वरील म्हणणे मल्हारराव महाराज यांविषयीं संशय उत्पन्न झाला होता त्या संबं धाचे आहे. अपराधाच्या शाबितीच्या संबंधाने नाही ही गोष्ट वाचकांनी चांगली लक्ष्यांत ठेविली पाहिजे, नाही तर भलतीच समजूत होईल. ज्या पुराव्यावरून संश- य उत्पन्न होतो तो पुरावा आरोपाच्या शाबिदीस बस्स होतो असे नाहीं. अगदीं निर्दोष पुराव्यावरून अपराधाविषयी खात्री झाली पाहिजे; आणि त्याप्रमाणे पाहिलें असतां मल्हारराव महाराज यांजवर ठेविलेले आरोप शाबीद आहेत असें ह्मणण्यास योग्य पुरावा नाहीं, इतकेच नाही पण ज्या पुराव्यावरून त्यांजवर संशय उत्पन्न झा ला होता तो पुरावा सारजंट बालेनटाइन यांणीं पुष्कळ फिक। पाडला आणि महा- राज यांजवरील संशयाची अगदीं निवृत्ति झाली नाहीं तरी संशयाविषयीं संशय उ त्पन्न होण्यासारखें या मुकदम्यास रूप आळें यांत तर कांहीं संशय नाही. एक मत झालेल्या तीन युरोपियन कमिशनर यांनी मल्हारराव महाराज यांस अप- राषी ठरवितांना त्यांजबरोबर कर्नल फेर यांची वागणूक कोणत्या प्रकारची होती या विषयीं विचार केला आहे की नाही आणि केला आहे तर तो काय, हें प्रथम पाहिले पाहिजे. कर्नल फेर यांजकडून मल्हारराव महाराज यां झालेले अपकार असह्य होऊन ते त्यांस विषप्रयोग करविण्यास सिद्ध झालें असें कमिशनर यांनी गृहीत केले आहे, किंवा मल्हारराव महाराज यांचे मनोरथ सि-