पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जमनाबाई साहेब यांच्या संबंधाने घडलेल्या गोष्टी. (३९) महाराज स्वतःही प्रसूतकाळ जवळ आला तेव्हां कापांत जाऊन राहिले होते. महाराजां- च्या भावजया राधाबाई साहेब व रेऊबाई साहेब यांचे मुक्काम बंगल्याच्या अगदी जवळ दिलेल्या तंबूत होते, आणि त्यानीं वारंवार जमनाबाई साहेब यांची भेट घेऊन तेथील हालचाल पहावी, अशी महाराजांची त्यांस ताकीद असे. महाराजांची कन्या कमाबाई साहेब यांस मात्र कर्नल बार साहेब यानी तेथे जाण्याची बंदी केली होती. राणी बण्यास गेल्या तेव्हांपासून त्या प्रसूत होईपर्यंतचा वेळ मोठा विलक्षण होता. दोन्ही पक्षांच्या लोकांची व प्रजेच्या मनाची स्थिति अगदी भिन्न- भिन्न होती. राणी साहेब यांच्या पक्षांचे लोकांस ते जरी जात संशय होते, तरी त्यांस अशी आशा उत्पन्न झाली होती की, राणी साहेब यांस पुत्र झाला म्हणजे आपल्या शोचनीय दशेचा अंत होईल. मल्हारराव महाराज यांजपासून प्राप्त झालेल्या सुखाच्या चिरस्थायी- पणाविषयीं त्यांच्या मंडळीचे नैराश्यही तसेच होते. प्रजेच्या मनांतील विचार याहून अगदीच निराळे होते. राणी साहेब यांस पुत्र व्हावा अशी त्यांची मनापासून इच्छा होती, परंतु तसे झाले असतां बडोद्याचा राज्यकारभार इंग्रज सरकारच्या हातांत जाण्याचा विशेष संभव असल्यामुळे त्या इच्छेविषयों ते बरेच गतादर झाले होते. इंग्रज लोकांची राज्य करण्याची शैली उत्तम, आणि प्रजेस हितकारक, व सुखदायक असतां नेटिव राज्याच्या प्रजेस तिचा इतका तिटकारा कां ? हें एक दुर्जेय गूढ़ आहे. युरोपियन लोकांस देखील ही गोष्ट मान्य कर्नल बार साहेब याणी सन १८६७ च्या वार्षिक रिपोर्टात खाली लिहिल्याप्रमाणे लिहिले आहे. आहे. " नेटिव लोकांच्या राज्यरीतीपेक्षां ब्रिटिश सरकारची राज्य करण्याची रीति बहुत उत्तम आहे यांत कांही संशय नाहीं. जरी आपल्या राज्याची व्यवस्था चांगली आहे, तथापि हिंदुस्थानांतील लोकांस नेटिव संस्थानांची रीत पसंत पडते. याचे कारण ती संस्थाने नेटिव लोकांची आहेत ह्मणून त्यांस आवडतात, किंवा त्यांजवर रेहेम नजर राखतात ह्मणून नकळे." जमनाबाई साहेब यांचा प्रसूत समय समीप आला असे समजले तेव्हां मल्हारराव महाराज, दिवाण आदिकरून कामदार लोक व आपली प्रिय मंडळी यांसह रेसिडेन्सीच्या बंगल्यांत गेले होते. जमनाबाई साहेब यांचे बंधु व त्यांच्या पक्षाची मंडळी तेथे हजर होती. कापांतील दुसरे साहेब लोकांसह रोसडेंट साहेब तेथे आले होते. राणी साहेब प्रसृत होऊन बाहेर काय वर्तमान येतें याजकडे सर्वांचे चित्त लागले होतें. संवत १९२८ आषाढ वद्य २ तारीख ५ जुलई सन १८७१ रोजी प्रातःकाळी राणी साहेब प्रसूत होऊन कन्या झाली, आणि मल्हारराव महाराज त्या वेळेपर्यंत जे राज्याचे प्रतिनिधि होते ते एका क्षणांत राजे झाले. हे वर्तमान सूतिका गृहांतून बाहेर आले नाही तोच कोल्स साहेब यांची मडम त्या कन्येस घेऊन बाहेर आली, आणि महाराजांस म्हणाली " महाराज आपका नशीब बहोत बडा है. उस लिये राणी साहेबकू लडकी हुवी " असे ह्मणून ती कन्या महाराजांस दाखविली. त्या वेळेस मल्हारराव महाराज व त्यांच्या