पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ८. जमनाबाई साहेब यांच्या संबंधानें घडलेल्या गोष्टी. राणी साहेब जमनाबाई यांचें कापांत गमन-त्यांच्या प्रसूतीचा परिणाम- त्यांचें पुण्यास प्रयाण-त्यांच्यासाठी मुंबई सरकारा- नीं महाराजांस केलेल्या शिफारशीची निष्फलता, राणी साहेब जमनाबाई गरोदर होत्या, आणि त्या प्रसूत होईपर्यंत मल्हारराव महाराज बडोद्याच्या राज्याचे राज प्रतिनिधि होते, असे मागे सांगितले आहे. आतां जमनाबाई प्रसूत होईपर्यंत त्यांच्या संबंधाने ज्या काही महत्वाच्या गोष्टी घडून आल्या त्या येथे निरू- पण करावयाच्या आहेत. सन १८७१ च्या मार्च महिन्यांत मेहेरबान टक्कर साहेब, गवरनर साहेब यांचे मंत्री, बडोद्यास आले, आणि त्यानीं राणी साहेबांस राजवाड्यांतून नेऊन रेसिडेंट साहेब यांचे बंगल्यांत ठेविले, व त्यांच्या संरक्षणासाठी ब्रिटिश सरकारचे नौकरीतील पोलीस सुपरिंटें डेंट कोल्स साहेब व त्यांची मडम यांची नेमणूक करून व त्यांच्या हाताखाली अमदाबा- दचे प्रसिद्ध फौजदार गजानन विठ्ठल यांस नेमून साहेब बहादूर मुंबईस परत गेले. राणी साहेब यांचे स्थलांतर मल्हारराव महाराज यांच्या उपहासास कारण झालें, व राणी साहेब यांस पुत्र झाला असतां महाराजांच्या भावि स्थितीविषयों वाईट कल्पना कर- ण्यास लोकांस जागा झाली. मल्हारराव महाराज यांस असे भय उत्पन्न झाले कीं, राणी साहेब यांच्या प्रसूतीचा कांही वाईट परिणाम झाला, किंवा त्यांस कन्या झाली, तर कृत्रिम पुत्राची योजना करून आपले राज्यपद हरण करून घेण्याचा प्रयत्न करण्यांत येईल. राज्य लोभानें या जगांत जीं अघोर कर्मों व कारस्थाने घडलीं व घडत आहेत त्या दृष्टीने पाहिले असतां, मल्हारराव महाराज याणी तशी कल्पना करणे काही आश्चर्यजनक नाहीं, परंतु जमनाबाई साहेब यांस कन्या झाली असतां राज्य लोभाने त्यांनी आपल्या एकुलत्या एक अपत्याचा अव्हेर करून त्या ठिकाणीं कृत्रिम पुत्राची योजना केली असती, अशी कल्पना करणे भयंकर दिसते. राणी साहेब, रेसिडेंट साहेब यांचे बंगल्यांत ब्रिटिश सरकारच्या अम्मलदारांच्या देख- रेखीखाली असतांही मल्हारराव महाराज यांस तेथे काही कारस्थान होणार नाहीं असे वाटले नाहीं. सबब त्यानी मोठ्या सावधगिरीने बंगल्याच्या भोवताली आपल्या भरंवशा- च्या लोकांचा सदां जागरुक असा पहारा ठेविला होता, आणि बंगल्यांत जाण्यास व येण्यास अवश्य पाहिजेत तितके दरवाजे मोकळे ठेवून बाकीची सर्व दारे बंद केली होती. दिवाण आदिकरून कामदार मंडळी यांचा मुक्काम कापांत ठेविला होता, व मल्हारराव