पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३२० ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. स्पिड करितांना जो जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे त्यांतील आटकिडे प्रथम लक्ष दिले पाहिज. कर्नल फेर यांस विषप्रयोग करण्याचे प्रयत्नास मल्हारराव महाराज यांनी फूस दिली असा पुरावा दाखविण्यांत आला आहे. यास्तव याबद्दलची उघड चौकशी क रून मल्हारराव महाराजांस त्यांजवर आलेल्या अवोर संशयांतून मुक्त होण्यास हर- एक संधी देणें जरूर आहे, अशी त्या जाहिरनाम्यांतील वाक्यरचना आहे. त्यावरून ज्या पुराव्यावरून मल्हारराव महाराज यांजवर संशय उत्पन्न झाला होता, तो पुरावा जर चौकशी करण्यासाठी नेमलेल्या कमिशनापुढे कायम राहिला तर त्यापासून उ. त्पन्न झालेला संशय निवृत्त करण्याकरितां मल्हारराव महाराज यांच्या तर्फे पुरावा देऊन संशयनिवृत्ति केली पाहिजे होती, असें सिद्ध होतें, आणि त्याप्रमाणे महारा जांच्या तर्फे तर कांहीएक पुरावा देण्यांत आळ नाहीं. ही या मुकदम्याविषयी विचार करितां विचारात घेण्यासारखी मुख्य गोष्ट आहे. अमीना आया वगैरे रोसडेंन्सींतीळ नौकर लोक यांजबरोबर महाराजांचा रात्रीच्यावेळीं गुप्त व्यवहार झाल्याबद्दल जो पु- रावा झाला आहे तो लटका पडला आहे असे दिसत नाहीं. आतां त्या पुराव्यावरून विषप्रयोग करण्यामध्ये महाराजांचें अंग होते असे शाबीत जरी होत नाही तरी रोसडन्सींतील नौकर लोकांबरोबर अशा प्रकारचा गुप्त संबंध खुद्द जातीनें महाराजांनी ठेवला होता त्यावरून त्यांचा उद्देश त्या नौकर लोकांपासून एक अद्भुत कार्य करून घ्यावयाचें होते असा त्यांतून अर्थ काढितां येतो. विषप्रयो- गाच्या संबंधानें नरसू आणि रावजी यांनी पूर्वी जी हकीकत सांगितली, त्या हकीक तींचा कमिशनापुढे सांगितलेल्या हकीकतीशी कांहीं विशेष विरोध आला आहे, व ज्या पुराव्यावरून महाराजांवर मोठा संशय आला होता तो पुरावा विद्वान ब्यारि- स्टराच्या उत्तम चातुर्ययुक्त उलट तपासणीत अगदी लटका पडला आहे असे कोणत्याही रीतीनें ह्मणतां येत नाही. आतां सूटर साहेबांपासून तो शेवट अकबर अल्ली, अबदुलअल्ली, आणि गजानन विठ्ठल पर्यंत सर्व लोकांनी ही केवळ बनावट केली असे सारजंट बालंटाईन यांनी स्पष्ट लटलें आहे. नरस जमादार याची जबानी सुटर साहेब लिहून घेत होते, परंतु सर लुइस पेली यांणी लिहून घेऊं दिली नाही, आणि त्यांत काहीं इंगित होते असे स्पष्ट बोलण्यांत देखील ते मागे सरले नाहीत. मग सूटर साहेब यांची आणि त्यांचे तीन इन्स्पेक्टर यांची तर कथाच काय? त्यांत दोन डाक्तर यांचा तर त्यांनी पराकाष्ठेचा फजिता उडविला आहे. परंतु ते त्यांचे विचार गृहीत करतां- ना आपल्यास फार विचार केला पाहिजे. “पराकाष्ठेच्या बेअब्रूच्या साक्षीदारांनी आपल्यापुढे येऊन बाष्कळ आणि असंभवनीय गोष्टी सांगितल्या आहेत, आणि पोलिसांना निःसंशय प्रत्येक प्रसंगी त्यांस फितवून आपल्यापुढे आणिलें, व पोलिसां. कडून तसे करविण्याचा अतिशय बळकट हेतु होता." अशा अर्थाचें सारजंट बाले टाईन यांच्या भाषणांत एक वाक्य आहे. पोलिसांकडून तसे करविण्याचा अतिश य बळकट हेतु होता.' या वाक्याचा अर्थ पाहिजे तितका लांब नेतां येतो; पण त्या