पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गवरनर जनरल यांचा ठराव. ( ३१९) राजावर अशा इंग्रजसरकारास अधिकार आहे किंवा नाही याबद्दल कमिशनापुढे काही प्रश्न काढि- ला नाहीं असे कितीएक लोकांचें ह्मणणे असून त्यासमयीं वर्तमानपत्रांतही चर्चा झाली होती, व महाराजांच्या तर्फे कमिशनापुढे ज्यांनी काम चालविले त्यांच्या शहाणपणास दोष देण्यात आला होता. परंतु माझ्या मतें या समजुतींत पराकाष्ठेची चुक होती. बडोद्याच्या प्रकारचा अघोर आणि अपयशस्कर आरोप आला असतां काय करावें याविषयों का- हीं तहनाम्यानें निर्णय झालेला नाहीं, किंवा दुसरी एखादी रीत स्थापन झालेली न ही; तेव्हां इंग्रजसरकारास जर देशी राजाकडून अशा प्रकारचा अपकार झाला तर त्यांनी असे करूं नये तर करावें काय ? असा जर कोणी प्रश्न विचारला तर त्याच- दल कोणाच्याने काहीं समर्पक उत्तर देववेल असे वाटत नाही. आपण अशी कल्प- ना करूं कीं, दोन समबळ आणि अगदी स्वतंत्र राजे आहेत, आणि परस्परांच्या दरबारांत परस्परांचे रोसडेंट राहवें असा करार आहे, आणि त्यामध्यें येका राष्ट्राच्या रेसिडेंटास दुसऱ्या राष्ट्राच्या खुद राजाने विषप्रयोग केल्याचा संशय उत्पन्न झाला, तर त्या अपकाराबद्दल एका राजास दुसऱ्या राजापासून जबाब तर घेतला पाहिजे तेव्हां तो घेण्याचा राष्ट्राच्या धर्मशास्त्राप्रमाणे मार्ग कोणता ? तर राजाने जर सामो- पचारानें समाधान केलें नाहीं तर त्याबरोबर लढाई करून वैरोद्धार करावा हा, किंवा त्याजबरोबरचा स्नेहसंबंध तोडावा हा; त्याप्रमाणे पाहिले असतां बळानें तर नाहीं च पण हक्कानें गायकवाड हे इंग्रजसरकारच्या बरोबरीचे राजे आहेत अशी जरी कल्प- ना केली तरी (या कल्पनेत काही अर्थ नाहीं.) लढाईवर किंवा स्नेहभंगावर गोष्ट येते, तर इंग्रजसरकारांनी तसे केले असते तर गायकवाडाच्या राज्याची काय बरें दशा झाली असती ? ही गोष्ट मनांत न आणितां अधिकाराव्या संबंधानें कमिशनापुढे एक शब्द देखील कोणी काढिला नहीं अशी त्यावेळेस एक सारखी ओरड चा ली होती, त्यांत कांहीं अर्थ नव्हता हे स्पष्ट आहे. व्यक्तांच्या अपराधाबद्दल राष्ट्रा स जबाबदार धरलें नाहीं हा बडोद्याच्या राष्ट्राविषयीं इंग्रजसरकारांनी अत्युत्तम न्याय केला असून या कमिशनांत दोन देशी राजे आणि एक मोठ्या योग्यतेचा मुत्सद्दी यांची योजना करून जी रीत प्रचारांत आणिली आहे ती फारच प्रशंसनी- य आहे. आतां या त्रिवर्ग नेटिव्ह कमिशनरांस जे यश मिळाले पाहिजे होतें तें मिळाले नाही याबद्दल वाईट व.टण्यासारखे आहे. परंतु हा मुकदमाच तसा घाणेरडा आहे, आणि त्यास जें कांहीं यश मिळाले त्यापेक्षां त्यांत जास्त यश मिळण्याचा स भवही नव्हता.

आतां आपण या मुकदम्याच्या संबंधानें गुणावगुण विवेचन करूं. हे विवेचन आपल्यास जी रीत प्रचारांत आहे तीस अनुसरूनच केले पाहिजे ह्मणजे इंग्रज सरकारास देशी राजांच्या अपराधाबद्दल न्यायकरण्याचा पूर्ण अधिकार आहे असे गृहीत करून केले पाहिजे. -गवरनर जनरल यांनी मल्हारराव महाराज यांस राजगादीवरून सं