पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३१८) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास... होता यावरून ती मिळकत राजाची खासगत होती आणि त्यावर त्याच्या वारसाचा दावा होता, हे तर सिद्ध होतेच; पण त्या मिळकतीसंबंधी ब्रिटिश सरकार या नात्यानें इंग्रजसरकारच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या अन्यायापासून बचाव करण्यास दे- रखील जेथें कांहीं उपाय राहिला नाहीं तेथें राज्य आणि राजकीय हक्क संरक्षण कर ण्यासाठी काहीं देखील उपाय नहीं, यांत विशेष आश्चर्य तें कोणतें ? 3 • इंग्रज सरकारांनी आपल्या रयतेच्या हक्कास जर बाध आणिला तर त्यांस न्यायाच्या कोर्टात फिर्याद करता येते, व ते न्यायाधीश स्वतंत्र असल्याने सरकारावर हुकुमनामा करि तात. इतकेच नाही पण त्यांच्या जुलमी वर्तनावर सक्त टीका करितात व त्यांचा सरकारा. वर मोठा दाब असल्यामुळे सरकाराच्यानें सहसा जुलूम करवत नाही. त्याप्रमाणे देशीराजांच्या हक्कांचे संरक्षण करण्याकरितां कांहीतरी उपाय आहे काय ? किंचित देखील नाहीं. . मल्हारराव महाराज यांजवरील आरोपांची चौकशी करण्याकरितां नेमलेलें कमि शन हा एक नवा मासला होता. पूर्वी कध असे झाले नव्हतें. परंतु गवरनर न नरल यांनी शेवटचा फैसला करण्याचा अधिकार आपल्या हातांत ठेविल्यामुळे या योजनेपासून टिकाऊ असा कांहीं अर्थ निष्पन्न झाला नाहीं. गवरनर जनरल असें ह्मणतात की, त्या कमिशनांतील साहा कमिशनर जरी येकमत झाले असते तरी मला प्रशस्त वाटलें असतें तसा मो न्याय केला असता. परंतु हे त्यांचे ह्मणणे स्टेट सेक्रेटरी यांणीं शेवटीं जो हुकूम दिला आहे त्यावरून योग्य नाहीं असे स्पष्ट झाले आहे. नामदार स्टेटसेक्रेटरी यांणीं हिंदुस्थान सरकारास तारीख ३ जून सन १८७५ रोजी पत्र लिहिले आहे, त्याच्या चौदाव्या कलमांत स्पष्ट लिहिले आहे कीं, तीन कमिशनर यांणी मल्हा- रराव यांस अपराधी ठरविलें नाहीं सबब त्यांजवर विपयोगसंबंधी अपराध लागू झा ला आहे असे समजून त्यांच्याविषयी काही करणे योग्य नाहीं. यावरून कमिशन. नेमून कमिशनरांच्या अभिप्रायांस महत्व न देणें हें कांहीं वाजवी नाही असे स्पष्ट होते, आणि लोकमताची ज्यांस खरी किंमत आहे त्यांचे विचार असेच असावयाचें. तेव्हां या देशांत निदान जर्मनदेशांतील राज्यव्यवस्थेप्रमाणे कांहीं व्यवस्था झाल्या- वांचन इंग्रजसरकाराकडून देशीराजांस यथार्थ न्याय मिळतो असे म्हणता येणार नाही. कारण कीं, "आपणास कोणी शासन करील असे ज्यास भय नाहीं, आणि जुलूम करण्याची शक्ति आहे तर त्यास जुलम करण्याची इच्छा आहे व त्याच्या मनाचा झोंक तसा आहे अशी हमेषा बहुतकरून कल्पना करण्यात येते. हें मनुष्यप्राण्या- न्ये मोठे दुर्दैव आहे. ' हे एका महापंडिताच्या लेखांतील वाक्य आहे. त्यास कोणा च्यानेही हरताळ लाववणार नाहीं. इंग्रेजलोक कितीका न्यायनिष्ठ असेनात, देशी राज्यावरील त्यांच्या सत्तेस जोपर्यंत कांहीं मर्यादा होणार नाही तोपर्यंत देशोराजांची राज्यें, त्यांचे हक्क, त्यांच्या खासगत मिळकती आणि त्यांची आब्रु सुरक्षित आहे असें ह्मणणें केवळ वाक्पांडित्य होय. मल्हारराव महाराज यांजवर जे आरोप आणिले होते त्यांबद्दल न्याय करण्याचा