पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. नादारीच्या संबंधाने कायदे करण्याचा, नाणे पाडण्याचा, वजनाचीं प्रमाणे ठरविण्या चा, पोस्ट हपीसें स्थापित करण्याचा व पोस्टाचे मार्ग नियमित करण्याचा, ग्रंथकार व नवीन शोध करणारे यांच्या हक्काविषयीं नियम करण्याचा, महा समुद्रातील चांचे लोकांस, बोर सास करणारांस, व राष्ट्राच्या कायद्याविरुद्ध अपराध करणारांस शासन करण्याचा, लढाई प्रसिद्ध करण्याचा, नवे सैन्य उभारण्याचा, ए. कंदर सैन्याचा खर्च चालविण्याचा, आरमार ठेविण्याचा, आणि खुष्कोवरील आर, मारावरील फोजेंसंबंधी नियम करण्याचा अधिकार आहे. सर्व किल्ले, शस्त्रागारे, तोफरवानें, आणि गोया यांजवर कायतें स्वामित्व कांग्रेस सभेचें, आणि त्यासंबंधी जे कांहीं कायदे करावयाचे ते तिने करावे. सारांश, सार्वजनिक हिताशीं ज्यांचा अनिकट संबंध आहे असे राजकीय सर्व अधिकार कांग्रेस सभेकडे आहेत. अशी लोकमत्ता कराज्यसत्तेसारखा उत्तम राज्यरचना या जगांत दुसरी कोटेंच नाहीं. या सरकारचा राज्यकारभार चालविण्याकरितां आणि कांग्रेस सभेनें केलेले कायदे व नियम अमलांत आणण्या करितां एक प्रेसिडेंट नेमिला जातो, आणि त्या- च्या अधिकाराची यत्ता चार वर्षांची ठरविली आहे. सर्व प्रांतांतील लोक प्रेसिडेंट निवडण्याकरितां कांही मंडळी निवडतात, त्यांस इलेक्टर्स अशी संज्ञा आहे. त्या लोकांच्या बहुमतानें प्रेसिडेंट निवडला जातो. ह्या प्रेसिडेंटाकडे राज्य कारभार चा लविण्याची अप्रतिबंध सत्ता आहे. सन १७७४ मध्ये कांग्रेस सभेची स्थापना झाली तेव्हां तिची रचना जर्मन दे- शांतील डायेट सभेच्या रचनेप्रमाणे होती; परंतु तिजपासून इच्छित हेतु सफळ झाला नाहीं. त्या सभेनें केलेले हुकूम स्वतंत्रपणे अमलात आणण्यास तिजपाशी कांहीं साधन नव्हतें. तिणें कोणत्यातरी संस्थानिकांस आपला हुकूम अमळांत आणण्यास आज्ञा करावी पण त्या संस्थानिकानें तो आज्ञा मान्य केली नाही तर त्याबद्दल पारिपत्य करण्याची कांग्रेस सभेमध्ये शक्ति नव्हती. आज. तरी जर्मन देशांत अशीच व्यवस्था आहे. प्रुशिया आणि आस्त्रिया या देशांच्या रा जांचे प्राबल्य फार मोठे आहे. त्यांचें वजन डायेंट सभेवरही पडतें व इतर संस्थानि- कांवर ही त्यांचें तेज पडतें. अशा प्रकारच्या अडचणी अनुभवास येऊन वासिंगटन आणि दुसरे राजकार्यधुरंधर पुरुष यांच्या मनांत असे आलें कीं, सर्व संस्थानिकां मध्ये नुसतें ऐक्य असण्यांत कांहीं अर्थ नाहीं; यासाठी एक सर्व श्रेष्ठ सरकार स्थापित केले पाहिजे; आणि पुष्कळ वादविवाद होऊन वर लिहिल्याप्रमाणे लोकस- ताक राज्याची स्थापना केली आहे. ह्या दोन देशांतील राज्यरचना लक्षांत घेतल्या असतां आपल्या देशांतील राजे- रजवाडे यांची स्थिति फार दुःखदायक भासते. इंग्रजसरकार हे या देशाचे सार्वभौम राजे असून त्यांच्या आणि इतर संस्थानच्या मध्ये कां- हीँ लढा पडला ह्मणजे याबद्दल इंग्रज सरकारचे अधिकारी करतील तोच न्याय अशी स्थिति असल्यामुळे इंग्रजसरकारच्या लहरीवरच काय