पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गवरनर जनरल यांचा ठराव. ( ३१५ ) रण्याविषयीं डायेट सभेस प्रार्थना करावी आणि लेहभावाने जर त्या तक्रारींचा निका ल करणे अशक्य वाटेल तर त्या सभेनें तो कज्जा निकालाकरितां न्यायसभेकडे-- स द्यावा. या एकसंवा संस्थानिकांमध्ये ज्यांची चार संमतें मानली जातात अशीं साहा, ती. न संमतें मानली जातात अशीं पांच, दोन संमतें मानली जातात अशीं तीन आणि एक संमत मानले जाते अशीं २५ मिळून एकंदर एकुणचाळीस संस्थानें असून ए कंदर सत्तर संमते आहेत. या एकुणचाळीस संस्थानांत काहीं तर स्वतंत्र शहरें आहेत ह्मणजे एक शहर हेंच स्वतंत्र संस्थान अशी स्थीति आहे. ही राज्यव्यवस्था लक्षपूर्वक अवलोकन केली ह्मणजे डायेट सभेकडे जर्मन देश चें सार्वभौमाधिपत्य, आणि एकंदर संस्थाने ही तिचे मांडलिक असा संबंध स्थापित झाला असून त्या सार्वभौम अधिकारांत सर्व संस्थानिकांचा त्यांच्या राज्याच्या विस्ता- सप्रमाणें व सामर्थ्याप्रमाणे अंश आहेच असे दिसून येतें. अमेरिकेंत युनाइटेट स्टेट्स ह्मणून जी चोवीस संस्थाने आहेत, त्यांच्यामध्येही असेंच ऐक्य झालेले आहे. परंतु जर्मन देशांतील एकसपी संस्थानिकांच्या रच- नेहून त्यांची रचना अगदीं भिन्न आहे. देशांतील किंवा बाहेरील जोर जुलुमापासून देशाचा बचाव व्हावा यासाठी नुसतें सगळ्या संस्थानांचे ऐक्य झाले आहे इतकेच नाही, परंतु सर्व संस्थानांवर एक श्रेष्ठ स रकार स्थापन करण्यात आले असून, त्याचा अमल प्रत्येक संस्थानच्या अधिकाऱ्यावरच चालतो असे नाहीं, पण प्रत्येक व्यक्तीवर आणि मंडळीवरही चालतो. हे सर्व श्रेष्ठ, सरकार संस्थानांचे अधिकारी मिळून स्थापित केलेलें नाहीं तर सर्व संस्थानांमध्ये पूर्ण ऐक्य असावें, योग्य न्याय मिळावा, देशांत शांतता राहावी, सर्वाचे संरक्षण व्हावें, सर्वांच्या कल्याणाची वृद्धि व्हावी, आणि स्वतंत्रपणापासून होणा-या सुखाचा सर्वांनीं योग्य रीतीनें सारखा अनुभव घ्यावा एतदर्थ सर्व संस्थानांच्या लोकांनी तें श्रेष्ठ सर- कार स्थापन केले आहे. या सरकारने केलेले कायदे आण तहनामे हे सर्व संस्था- निकांचे कायदे आणि तहनामे समजले जातात; आणि निरनिराळ्या संस्थानांतील न्यायाधिशांनी या कायद्याप्रमाणें न्याय करावा. मग त्या संस्थानांतील कायदे त्या विरुद्ध असले तरी त्यांचे महत्व नाहीं. INS अनेक संस्थानांतील लोकांचे ऐक्य होऊन स्थापित झालेल्या श्रेष्ठ सरकारचे का. यदे करण्याचा अधिकार कांग्रेस या सभेकडे आहे. या सभेच्या दोन शाखा आहेत, एकोस सेनेट आणि दुसरीस हौस आफू रिप्रेझेंटेटिवज अशी संज्ञा आहे. या सभेच सभासद प्रांतांतील कायदे करणारी मंडळी निवडते आणि हौस आफ रिप्रेझेंटेटिवज या सभेचे सभासद संस्थानांतील लोक निवडतात. कांग्रेस सभेला सारा व जकात वसूल करण्याचा, ऐक्य झालेल्या संस्थानिकांच्या पतीवर कर्ज काढण्याचा व कर्ज वारण्याचा, ऐक्य झालेल्या संस्थानांचा बचाव करण्याकरितां पैसा पुरविण्याचा, व्यापाराच्या संबंधाने परदेशाबरोबर करार करण्याचा, देशजाधिकार प्रापणसंबंधी सारखे नियम करण्याचा,