पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३१४) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. याविषयीं विचार होऊन ज्यांजाविषयीं बहुतमंत पडेल तीं प्रकरणे मोठ्या सभेपुढे सा. दर करण्यांत येतात आणि मोठ्या सभेमध्ये त्या प्रकरणांचा निकाल होतो, पण शेवट ठरावास दोन त्रितियांशमतें पडळीं पाहिजेत असा नियम आहे. संस्थानाचे ऐक्यसं बंधी मूळ कायदे फिरविण्याविषयों अथवा नवे करण्याविषयों अथवा कांहीं नवे नियम स्थापित करण्याविषयों अथवा जो मुख्य उद्देश मनांत धरून हा संप झाला आहे त्यासंबंधी कांही सुधारणूक करण्याविषयी किंवा या समाजांत दुसरे एकादे सं. स्थान दाखल करण्याचें असेल तर त्याजविषयीं अथवा धर्मंसंबंधी प्रश्न असतील तर ते मूळापासून या डायेट नांवाच्या मोठ्या सर्भेतूनच निघाले केले पाहिजेत, आणि शेवट निर्णय होण्याकरितां अगदीं निखालस ऐक्य झाले पाहिजे असा नियम आहे सर्व संस्थानिकांनी परस्परांच्या राज्यांच्या सुरक्षितपणाविषयों जामीनकी केली आहे, आणि सर्व जर्मन देश सुरक्षित ठेविण्यासाठीच नाही पण कोणी हल्ला केला तर त्यापासून प्रत्येक संस्थान सुरक्षित ठेवण्याविषयों देखील करार केले आहेत. एक संप झालेल्या संस्थानिकांनी मिळून कोणाबरोबर लढाई करण्याविषयी जाहीर केल्यावर सर्वांचे अनुमतावांचून शत्रूबराबर तह अथवा सुलेह करण्यास अथवा लढ. ई तहकू- ब करण्यास कोणासही अधिकार नाहीं. एकसंप झालेल्या संस्थानिकांपैकी प्रत्येक. स परकीय राजाबरोबर मैत्री करण्याचा व तहनामे करण्याचा अधिकार आहे. एकसंपी संस्थानांच्या सुरक्षितपणाला अथवा संस्थानाच्या सुरक्षितपणाला धोका लागेल असा मात्र करार करूं नये. एकसपी झालेल्या संस्थानिकांनी आपआपल्यामध्यें लढाई करूं नये. सर्व संस्थानिकांनी आपापल्यामध्ये जे कांहीं वाद उत्पन्न होतील ते डायट या सभेपुढे सादर करावें आणि या सभेमें मध्यस्तपणानें तडजोड करून अ थवा न्याय सभेपुढे याबद्दलची चौकशी करून त्या तक्रारींचा फैसला करावा, आणि तो पक्षकारांनीं कांहीं कांकूं न करितां मान्य करावा. प्रत्येक संस्थानिकाला आपल्या मुलुखांच्या संबंधानें राज्यव्यवस्थेबद्दल नियम करण्याचा अधिकार आहे, आणि कोणत्याही संस्थानिकानें विनंति केली असतां त्या संस्थानिकानें स्थापित केलेल्या राजकरण नियमांविषयीं डायेट सभेनें तिची इच्छा अ. सेल तर जिम्मा ध्यावा, आणि असा जिम्मा घेतल्यावर त्या राजकरण नियमाच्या संबंधानें कांहीं वाद उत्पन्न झाला असता त्याचा निकाल करण्याविषयीं दुसरे कांही नियम स्थापित करण्यांत आले नसतील तर डायेट सभेनें मध्यस्तपणा करून अथवा लवाद नेमून न्यायाच्या रीतीनें फैसला करावा असा तिला अधिकार प्राप्त होतो. एकसंपी संस्थानांपैकी एक अथवा अधिक संस्थानांत कांहीं दंगेधोपे उपस्थित झाले व त्यांपासून एक संपी सर्व संस्थानिकांच्या सुरक्षितपणास धक्का बसण्याचा सं- भव असेल तर या सभेने मध्यस्ती करून अथवा एकसंपो संस्थानिकांच्या फौजेचा उपयोग करून ते दंगे धोपे मोडावे. → कोणी संस्थानिकानें आपल्या प्रजेस अथवा दुसऱ्यास दाद देण्यास विनाकारण विलंब केला अथवा न्याय देण्याविषयीं नाकारलें तर पीडित पक्षकाराने मध्यस्ती क