पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/५४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गवरनर जनरल यांचा ठराव. (३१३) लोकांच्या मनांत मल्हारराव महाराज यांजविषयों फार कळकळ होती आणि त्यांत पुणे हें अग्रगण्य होते असे स्पष्ट दिसून आले होते. इंग्रज सरकारची प्रजा इतकी जरी राजनिष्ठ आणि विचारी आहे व इंग्रज सरकारच्या राज्यापासून तीस जे अप्रतिम फायदे झाले आहेत त्यांविषयों ती जरी पराकाष्ठेची कृतज्ञ आहे तरी तिजविषयीं इंग्रजसरकारच्या कांही अधिकाऱ्यांची अशी कांहीं विलक्षण प्रकारची आणि लाजिरवाणी समजूत आहे कीं, त्याबद्दल आश्चर्य वाटल्या वांचून राहवत नाहीं. आतां या विषप्रयोगाच्या प्रकरणाविषयीं गुण दोष विचार करणे म्हणजे मोठें कठीण काम आहे. हिंदुस्थानांतील राज्यव्यवस्थेसारखा नमुना या जगांतील कोणत्याही देशांत नाही. या देशांत राजेरजवाडे यांचीं अनेक राज्ये असून इंग्रजसरकारचेंही राज्य आहे आणि त्यांजकडे या देशाचें सार्वभौमत्व आहे. त्यांजबरोबर राजेरजवाडे यांचे जे तहनामे झाले आहेत त्यांवरून देशीराजास आपआपला राज्यकारभार चालविण्यास स्वातंत्र्य आहे परंतु त्यांस कोणाबरोबर लढाई करण्याचा अगर तहनामा करण्याचा अधिकार नाही. यामुळे त्यांच्या स्वतंत्रतेस मोठा धक्का बसला आहे. देशी दोन राज्यां- मध्ये कांहीं तक्रार असेल तर इंग्रज सरकारचे अधिकारी त्याबद्दल जो निकाल कर- तीळ तो मान्य करावा अशा कराराने ते बांधले गेले आहेत. आपल्या राज्याचा राज्यकारभार स्वतंत्रपणे चालविण्याचा देशी राजांस जो अधिकार आहे त्यांत देखील इंग्रज सरकारची दखल आहेच. परदेशांतील हल्ल्यापासून आम्ही तुमचें करतो व तुमच्या प्रजेस आम्ही दंगा फितुर करूं देत नाही यासाठी तुमच्या जुलमा- पासून तुमच्या प्रजेचें संरक्षण करणे हे देखील आमचें कर्त्तव्यकर्म आहे असा ते हक्क सांगून आपल्याच तंत्राने देशी राजांस वर्तवितात, तथापि देशी राजांनी आप- ला राज्यकारभार स्वतंत्रपणे चालविण्याचा त्यांस अधिकार आहे कारण की, त्यांस कायदे करण्याचा अधिकार आहे. आणि या अधिकारापासून स्वराज्याच्या कारभा- राविषयीं स्वतंत्रपणा स्पष्ट दर्शित होत आहे. * एका देशांत अनेक राजांचीं राज्ये असून त्यांस परस्परांपासून व इतर दे- शापासून कांही उपद्रव होऊं नये यासाठी सर्वांचा एक संप झालेला अशी राज्य व्यवस्था जर्मन देशांत आहे. त्या देशांत लहान मोठे अनेक संस्थानिक असून प्रत्येक संस्थानिक आपल्या देशाचा राज्यकारभार चालविण्यास स्वतंत्र आहे. परंतु एकंदर देशाच्या संबंधाने जें कांहीं कृत्य करावयाचें तें सर्वांच्या विचारांनी झाले पाहिजे असे नेम केले आहेत, व त्यासाठी डायेट नांवाची एक सभा स्थापन केली असून तिचे दोन भाग केले आहेत. एक साधारण सभा आणि दुसरी मोटी सभा, साधारण सभेत फक्त मोठ्या सभेपुढे कोणतीं प्रकरणे सादर करण्यास योग्य आहेत

  • Every independent State is entitled to the exclusive power of legistation, in

respect to the personal rights and civil state and condition of its citizens, and in respect to all real and personal property situated within its territory, whether be- Longing to citizens or aliens. ( Wheaton's international law, page. 77 Section 77)